नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली… ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL
नांदेड। सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक आठ जुलै रोजी नांदेड शहरामधे सकाळी ११.०० राज काॅर्नर तरोडेकर चौक-राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय.टी.आय.चौक-शिवाजीनगर-एस.पी.ऑफीस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर या मार्गाने भव्य शांतता रॅली निघणार आहे व मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातुन संवाद साधणार आहेत.सदरील रॅलीचे नेतृत्व मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत.
मागील पंधरा दिवसापासुन सदरील रॅलीच्या नियोजनासाठी अखंड मराठा समाज नांदेड जिल्हा व जिल्हा नियोजन समिती यांच्याकडुन रॅलीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. २०जुन २...









