Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
absconding accused stuck in telangana state | आठ महिन्यापासून फरारी आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली तेलंगणा राज्यातून अटक – NNL

absconding accused stuck in telangana state | आठ महिन्यापासून फरारी आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली तेलंगणा राज्यातून अटक – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| अल्पवयीन मुलीस फूस लाऊन पळवून नेऊन बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी गेल्या 8 महिन्यापासून फरार होता. फरार मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला हिमायतनगर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील निर्मल भागातील गाजुलपेठ परिसरातुन रविवारी मध्यरात्रीच्या वेळी अटक केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सोमवारी दुपारी दोन्ही आरोपिंना न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश महोदयांनी अधिक चौकशीसाठी आरोपींला एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गु.र.क्र 231/2023 कलम 363,376(2) भादवी व 4,12 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीवर अल्पवयीन मुलीस फूस लाउन पळून नेऊन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याने हिमायतनगर पोलीस गेल्या 8 महिन्यापासून त्यांच्या शोधात होते. सदर गुन्ह्यात फरारी असलेले...
Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL

Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL

नांदेड
उस्माननगर| दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिनी पंढरपूर म्हणून वारकरी सदभक्त मंडळींचे श्रध्दास्थान असलेल्या येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु.)ता.लोहा येथील श्री. संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज संस्थान यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी रथ प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ जूलै २०२४ रोजी सकाळी ६ वा. महापुजा / व अभिषेक, त्यानंतर सकाळी ८ वा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज मंदीरा पासून ते कलंबर खु., भोपाळवाडी. फाटा ते परत मंदीराकडे पायी रथ प्रदक्षिणा करून अगमण होईल. दुपारी ३ ते ४ दरम्यान ह.भ.प. बापुराव महाराज सोनखेडकर यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर चहा, फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी, भजनी मंडळ यांनी पायी रथ प्रदक्षिणा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक यांन...
Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL

Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL

नांदेड, लेख
भक्तीचे काजळ घालुन ज्या संतानी परमेश्वराला पाहिले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते परमेश्वराचे दिव्यत्व काय आहे हे फक्त संतच समजु शकतात. आपली भारत भुमी पावन शुमी झाली या संतानमुळेच अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. संताच्या साधनेमुळे आणि त्यांनी केलेल्या भगवंताच्या किर्तनामुळे आज या सृष्टीचा आणि आपल्या समाजाचा समतोल राखला गेला हे आशा थोर महान आणि दिव्य संताना मी बारंबार प्रणाम करते. साधारण मानवला अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून बावरे हसंत रुप खुप श्रेष्ट आहेत अशा संताची भगवंत पुजा करतात. अशा सर्व श्रेष्ट संताना मी बारंबार प्रणाम करते. अध्यात्माचे ज्ञान सत्संगाचे महत्व वाणीतून आणि कर्मातून फक्त आणि फक्त संतच समजावू शकतात. अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. भागवत, रामायण, आणि गीता हे सर्व श्रेष्ठ ग्रंथ संतानी लिहिले आणि समाजाला समाजवले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. ...
Cross Voting | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांची ओळख पटवण्यात अखेर काँग्रेसला यश -NNL

Cross Voting | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांची ओळख पटवण्यात अखेर काँग्रेसला यश -NNL

Blog
मुंबई| नुकत्याच संपन्न झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांची ओळख पटवण्यात अखेर काँग्रेसला यश आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या त्यां आमदारावर आठवड्याभरात कारवाई होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्यावेळेस या आमदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी महायुतीचे 9, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. यामुळे महाविकास आघाडीतील शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. आता या क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर पक्षाशी ...
Dr. Shankarao Chavan ।  माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत शंकरराव चव्हाण यांना समाधी स्थळी अभिवादन -NNL

Dr. Shankarao Chavan । माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत शंकरराव चव्हाण यांना समाधी स्थळी अभिवादन -NNL

नांदेड
नांदेड। मराठवाड्याचे भाग्यविधाते ,माजी केद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त १४ जुलै रोजी नांदेड तालुक्यातील धनेगाव (वडगाव) येथील समाधी स्थळी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, माजी आमदार सौ.अमिताभाभी चव्हाण,सुजया चव्हाण,श्रीजया चव्हाण व चव्हाण परिवार यांच्या वतीने विधीवत पुजन करून अभिवादन केले. यावेळी आमदार,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या विविध जिल्ह्यातील व नांदेड शहर तालुक्यातुन मोठया संख्येने पदाधिकारी यांनी अभिवादन केले. १४ जुलै रोजी कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने समाधी स्थळी जयंती निमित्ताने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,नांदेड ऊतरचे आ.बालाजी कल्याणकर, भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,देगलूर बिलोली चे आ.जितेंद्र...
ज्वारी खरेदी केंद्राला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ; कृउबाचे संचालक अनुप देशमुख यांच्या प्रयत्नाला यश -NNL

ज्वारी खरेदी केंद्राला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ; कृउबाचे संचालक अनुप देशमुख यांच्या प्रयत्नाला यश -NNL

नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख। किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथील ज्वारी खरेदी केंद्राची शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्याची मुदत 30 जून रोजी मुदत संपली या मुदतीस एक महीन्याची मुदतवाढ मिळावी अशा स्वरूपाची मागणी कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे केली होती. शेतकर्याचे हित लक्षात घेऊन ज्वारी खरेदी केंद्राला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ व 25000 क्किटल वाढीव उदिष्ट मिळाल्याने कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांच्या मागणीला यश आले आहे. किनवट तालुक्यातील ईस्लापूर परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदी करण्यासाठी 735 लाभार्थींनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली त्यापैकी फक्त 130 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्रात खरेदी करण्यात आली आहे. 60 टक्के शेतकर्याची आजही ज्वारी खरेदी करणे बाकी आहे. या अनुषंगाने कृषी उत्पन बाजार समित...
MP Nagesh Patil Ashtikar | हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची तत्परता -NNL

MP Nagesh Patil Ashtikar | हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची तत्परता -NNL

नांदेड, हिंगोली
हिंगोली| सोडेगाव ता. कळमनुरी येथील वारकरी लक्ष्मण मारोती दांडेगावकर वय 50 वर्ष हे दरवर्षी पंढरपूर येथे पायी वारी करत असतात. याही वर्षी ते पायी निवृत्ती महाराज साडेगावकर यांच्या दिंडीत गेले असता बारामती येथे त्याचा दिनांक 12/07/2024 रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने सकाळी पावणे चार च्या सुमारास निधन झाले होते. त्या नंतर मृतदेह वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे नेण्यात आल्याची माहिती त्याचे सहकारी सुरेश दांडेगावकर यांनी खासदार नागेश पाटील यांना दिली. खासदार आष्टीकर यांनी तात्काळ तेथील डीन यांना तात्काळ सोपस्कार पुर्ण करून देण्याची सूचना करून बारामती / इंदापूर चे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांना संपर्क करून स्थानिक पोलीस अधीकारी यांच्या मदतीने मृतदेह दांडेगावकर यांच्या मूळगावी सोडेगाव ता. कळमनुरी पर्यंत पाठवण्याची सूचना करून तातडीने तो मृतदेह स्व खर्चाने मूळ गावी पाठवून दिला आहे. याबद...
Commissioner Dilip Gawde | योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

Commissioner Dilip Gawde | योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| राज्य शासनाने 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागात सर्वत्र नाव नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद दिसून येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी महिलांना सहकार्य करावे तसचे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यंत्रणेला दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ बाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त देविदास टेकाळे, महिला व बाल विकास विभागाचे प्रभारी उपायुक्त गणेश पुंगळे उपस्थित होते. 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक...
Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये : गिरीश महाजन -NNL

Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये : गिरीश महाजन -NNL

नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही समाजातील सर्व घटकांसाठी आहे. यातून एकही पात्र महिला लाभार्थी सुटणार नाही याची काळजी गाव स्तरावर ग्राम समितीने तर शहरात वार्ड समितीने घ्यावी. तसेच यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या, आणि ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांच्या आर्थिक विकासाच्या या महत्त्वपूर्ण योजनेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाज घटकातील गरीब, गरजू, महिला या आर्थिक सक्षमीकरणातून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवणार आहे. राज्य शासनाने या योजनेच्या प्राथमिक अंमलबजावणीत आलेल्या अनुभवावरून अधिक सोपी व सुलभ अशी अर्ज स्वीकारण्याची पद्धत तयार केली आहे. 12 जुलै रोजी काही सुलभ पद्धती नव्या शासन निर्णयात सुचविण्यात आलेल्या आहे. त्याची अंमलबजावणी क...
Mhada | म्हाडाच्या १४९४ गाळे, सदनिका,निवासी भुखंडासाठी १६ जुलै रोजी सोडत -NNL

Mhada | म्हाडाच्या १४९४ गाळे, सदनिका,निवासी भुखंडासाठी १६ जुलै रोजी सोडत -NNL

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर| छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४९४ गाळे, सदनिका, निवासी भुखंडाकरिता फेब्रुवारी-२०२४ च्या जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या सोडतीचे थेट छायाचित्रण यु-ट्युब या समाजमाध्यमावर प्रक्षेपित होणार असून उपरोक्त सोडतीचे प्रक्षेपण पाहण्याकरीता यु-ट्युब या समाजमाध्यमाची ऑनलाइन लिंक अर्जदारांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे (SMS) स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे....
error: Content is protected !!