Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Pest and disease control | खरीप पिकांवरील किड व रोग नियंत्रण (क्राॅपसॅप) ची उपविभागीय स्तरीय कार्यशाळा भोकर येथे संपन्न -NNL

Pest and disease control | खरीप पिकांवरील किड व रोग नियंत्रण (क्राॅपसॅप) ची उपविभागीय स्तरीय कार्यशाळा भोकर येथे संपन्न -NNL

नांदेड
भोकर| महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय किनवट यांच्यावतीने कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची एक दिवसीय क्राॅपसॅप प्रशिक्षण व कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथे किनवट उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रविकुमार रणवीर यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली. यावेळी या कार्यक्रमासाठी मुख्य तज्ञ मार्गदर्शक म्हणून कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील सहा. कृषी विद् यावेत्ता डॉ.अरविंद पांडागळे व कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे भोकर येथील तालुका कृषी अधिकारी श्री दिलीप जाधव,हदगाव येथील तालुका कृषी अधिकारी श्री सदाशिव पाटील, उमरी तालुका कृषी अधिकारी श्री.शिवाजी मिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथे ही पिकावरील कीड-रोग संरक्षण व सल्ला प्रकल्प 2024-25 ची खरीप कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकावरील कीड व रोगाचे ...
of the Legislative Assembly | नव्या उमेदिच्या उमेदवाराला लागली विधानसभेची चाहूल.. NNL

of the Legislative Assembly | नव्या उमेदिच्या उमेदवाराला लागली विधानसभेची चाहूल.. NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात नव्या उमेदीने आमदारकीचे स्वप्न पाहणारे सचिन नाईक यांनी किनवट माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील भिंती फलक यासह शासकीय मालमत्तेच्या राज्य रस्ता महामार्गावर असलेल्या दिशा दर्शक फलकावर सुद्धा रंगरंगोटीच्या माध्यमातून अतिक्रमण केल्याने आत्ताच या नवीन उमेदवारांनी शासकीय मालमत्तेवर ताबा मिळवल्या ची खमंग चर्चा तालूकाभरातून ऐकावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील मुख्य राज्य रस्त्यावर प्रवाशासाठी दाखवल्या जाणाऱी गावाच्या नावाची ओळख दाखवणाऱ्या दिशा फलकावर सचिन नाईक मित्र मंडळाचे बॅनर दोन्ही तालुक्यातून झळकत असल्याने दिशा फलक ही बाजूला गेली सचिन नाईक मित्र मंडळाची चर्चा गलो गल्ली रंगू लागली. या सर्व बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून गप्प का ?असा सवाल आता जनसामान्यातून पुढे येत आहे? आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण व नव्या उमेदिचे नवीन उ...
fake shindi | इस्लापूर शिवनी भागात बनावट शिंदीची जोमात विक्री -NNL

fake shindi | इस्लापूर शिवनी भागात बनावट शिंदीची जोमात विक्री -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देऊन शेकडो लिटर रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार करून त्या शिंदीची रोज विक्री शिवनी परिसरात मोठ्या प्रमाणात होत होती. त्यातच इस्लापूर पोलिसांनी नारायण रामा गौड यांच्या राहत्या घरी दिनांक 13 जुलै 2024 शनिवार रोजी छापा टाकून रसायन मिश्रित बनावट सिंधी तयार केलेले वीस पॉकेट कॅरीबॅग मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या विकण्याच्या उद्देशाने बनावट सिंधी कॅरीबॅग मध्ये मिळून आल्याने इस्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा एक शिवनी परिसरामध्ये शिंदी उपलब्ध असल्याचा एक पुरावाच म्हणावा लागेल. किनवट तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो अशा या आदिवासी किनवट तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात वाडी तांड्यावर राहणारे अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेकाचे संसार उघड्यावर पडले आहेत तर अशा रसायन मिश्रित बनावट सिंधी पिल्याने अनेकांचे प्राण...
Nanded pattern of digging pits | खड्डे बुजवण्याचा नांदेड पॅटर्न..! या नव्या प्रयोगामुळे अपघातांना आमंत्रण..! -NNL

Nanded pattern of digging pits | खड्डे बुजवण्याचा नांदेड पॅटर्न..! या नव्या प्रयोगामुळे अपघातांना आमंत्रण..! -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड शहरात अनेक ठिकाणी रोड वर मोठ मोठे खडे पडले आहेत अतिशय रहदारीच ठिकाण असलेल यशवंत कॉलेज ते भाग्यनगर या रोडवर हजारो विद्यार्थी ये जा करत असतात या परिसरातील मुख्य रस्त्यावर मागील अनेक महिन्यांपासून मोठ मोठे खडे पडले होते. त्यात पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या नांदेड शहरात अनेक ठिकाणी रोड वरील खड्डे बुजविण्याचे काम केले जात असून त्या खड्यात कोरडी खडी टाकून तात्पुरते समाधान केले जात आहे. कोरडी खडी आणून टाकल्या मुळे गाडीच्या टायरने खडी उडून लागणे किंवा टू व्हीलर घसरणे असे प्रकार रोज घडत आहेत. खडी मुळे गाडी घसरून किरकोळ तसेच गंभीर अपघात होत आहेत स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. आणि खडी सोबत थोडाफार मुरूम त्या खड्ड्यामध्ये टाकला तर समस्येवर समस्या तयार न होता उपाय होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे....
Do not fall prey to the illusion of the broker | दलालाच्या भुलथापास बळी पडू नये; असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल – NNL

Do not fall prey to the illusion of the broker | दलालाच्या भुलथापास बळी पडू नये; असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| रेशनकार्डवरील नावे कमी करणे, नाव वाढविणे व नवीन शिधापत्रिका काढण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व सेतु सुविधा केंद्रामार्फतच करावीत. याकामासाठी कुठल्याही मध्यस्थाच्या, एजेंटच्या दलालाच्या भुलथापास बळी पडू नये, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे. अशा प्रकारचे असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागू केलेल्या कागदपत्रामध्ये राशनकार्ड आवश्यक आहे. यामुळे राशनकार्डात नाव टाकणे, वगळणे व नवीन राशनकार्ड काढणे याबाबत कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालयाच्या आवारात काही दलाल कार्डधारकास भुलथापा देऊन व आर्थिक पिळवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक 11 जुलै रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी कार्डधारक आले असता तहसिलदा...
Annabhau Sathe | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Annabhau Sathe | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी 24 जुलै 2024 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावेत. उशिराने आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे आवाहन जिल्हा कार्यालयाने केले आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने...
MahaDBT Portal | महाडीबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा नोंदणी करण्याचे आवाहन – NNL

MahaDBT Portal | महाडीबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा नोंदणी करण्याचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महा-डीबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा व विद्यार्थी अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील 86 टक्के शाळा नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. यात 3 हजार 827 शाळांपैकी 3 हजार 296 शाळांनी महाडीबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तरी उर्वरित 531 शाळांनी शाळा नोंदणीची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. शिष्यवृत्ती योजना या म्यानुअली/ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येत होत्या. परंतु सन 2024-25 पासून या योजना राबविण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांनी www.prematric.mahait.org/login या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने कार्...
Organ donation public awareness | अंगदान जन जागरूकता मोहिमेस डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रारंभ – NNL

Organ donation public awareness | अंगदान जन जागरूकता मोहिमेस डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रारंभ – NNL

नांदेड
नांदेड| लोकांना अंगदानाचे महत्व सांगणे, समाजामध्ये अंगदानाबाबत जनजागृती करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे यासाठी केंद्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष, यांच्याकडून माहे 15 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अंगदान जन जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे 15 जुलै 2024 रोजी महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागामार्फत पोस्टर व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविक बधिरीकरन शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वैष्णवी ...
Collector Abhijit Raut | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लेखी अर्जाची छाननी करून ठेवा : जिल्हाधिकारी – NNL

Collector Abhijit Raut | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लेखी अर्जाची छाननी करून ठेवा : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्ज ऐवजी ऑफलाइन अर्जाकडे नागरिकांचा कल असून आलेले सर्व अर्ज तालुकास्तरीय समिती पुढे छाननीला जाण्यापूर्वी वर्गीकृत करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज घेतलेल्या संयुक्त बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेला या संदर्भात छाननी करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय छाननी समित्या गठीत होत आहेत. एकदा समित्यांची काम सुरू झाले की त्यांच्यापुढे जाताना आधीच अर्ज वर्गीकृत असले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा हे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे आलेला प्रत्येक अर्...
The villagers stopped the work | नांदेड न्यूज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच ठेकेदाराने सुरु केल्या भेगा बुजविण्याचे काम – NNL

The villagers stopped the work | नांदेड न्यूज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच ठेकेदाराने सुरु केल्या भेगा बुजविण्याचे काम – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| भोकर हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्या भेगा संदर्भामध्ये नांदेड न्यूज लाइव्हने " राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा" या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने भेग बुजविण्याचे काम सुरु केलं. मात्र यातही बोगसपणा आणला जात असल्याने आज सोनारी फाटा ते करंजी परिसरातील युवक, नागरिकांनी सदरचे काम रोखले आहे. जोपर्यंत दर्जेदार पद्दाथीने भेग बुजविल्या जात नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्युचा सापळा बनला असून, इस्लापूर - हिमायतनगर - भोकर दरम्यान सरसम - सोनारी फाटा - याठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी सिमेंट काँक्रेट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या भागांमध्ये दुचाकी वाहनांचे चाक फसून अपघातां...
error: Content is protected !!