Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Name Nana-Nani Park “Mata Ramai Ambedkar Park” | नाना-नानी पार्क ला “माता रमाई आंबेडकर पार्क” नाव द्यावे अशी मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेने केले – NNL

Name Nana-Nani Park “Mata Ramai Ambedkar Park” | नाना-नानी पार्क ला “माता रमाई आंबेडकर पार्क” नाव द्यावे अशी मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेने केले – NNL

नांदेड
नांदेड| शिवाजीनगर औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या नाना नानी पार्क ला त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकरांचे नाव देवून त्या ठिकाणी माता रमाईच्या जीवनातील ठळक घटनांना साकारून उजाळा द्यावा अशी आग्रहाची मागणी नांदेड आयुक्त, मनपा, नांदेड यांचेकडे भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते व जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांनी निवेदनाव्दारे दिली आहे. शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असलेले नाना-नानी पार्क दुर्लक्षितच असून नांदेड मनपा ने जानकीनगर परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या "माँ जिजाऊ सृष्टी" च्या धर्तीवर "माता रमाई आंबेडकर पार्क" मनपाने पुढकार घेवून नागरीकांसाठी विकसित केले पाहिजे. तमाम आंबेडकरी जनतेच्या श्रध्दास्थान असलेल्या माता रमाईचा या प्रकल्पातून यथोचित सन्मान करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना संजय कौठेकर भिमशक्तीचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक रमेश...
Free movement of cattle and donkeys | जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात गुरांचा आणि गाढवांचा मुक्त संचार – NNL

Free movement of cattle and donkeys | जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात गुरांचा आणि गाढवांचा मुक्त संचार – NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट शहरातील जुन्या नगर परिषदेचे प्रांगण आणि समोरच्या रस्त्यावर नेहमीच मोकाट गुरं, गाढवांचा आखाडा तर आहेच शिवाय गाड्या पार्कींगची व्यवस्था नसल्यामुळे दुकानांसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गाड्या लावल्यामुळे रस्त्यावर लोकांची कोंडी होत आहे. तहसिल चौकातही यापेक्षा भयावह स्थिती आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने यावर तोडगा काढून वाहनांची कोंडी होणार नाही अशी कार्यवाही करावी, अशी त्रस्त झालेल्या नागरीकांची मागणी आहे. शहराच्या मध्यभागी व्यापारपेठेतील छ.शिवाजी महाराज पुतळा चौक, स्टेट बॅंक आॅफ इंडिया, पोस्ट आॅफीस, बसस्थानक परिसर, अशोकस्तंभ, तहसिलचौक अशा लोकवर्दळीच्या ठिकाणीच नेमका ज्यांना वाली नाही अशी गुरं आणि ज्यांना वाली असूनही लावारीश सोडलेल्या गाढवांचा आखाडा आहे. आता या जनावरांपासून प्रत्येकांना त्रास सहन करावा लागतो. यांना थांबण्याची नगर परिषदेने व्यवस्था करायला...
Holy Shravana Mass | पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन – NNL

Holy Shravana Mass | पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन – NNL

नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान वाढोणा (हिमायतनगर) च्या वतीने पवित्र श्रावण मासानिमित्त येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या २१ दिवस कालावधीत संगीतमय भागवत कथा, ज्ञानेश्वरी भावकथा आणि संगीतमय भागवत कथा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. याची सुरुवात संगीतमय शिवपुराण कथेने दि.07 ऑगस्ट बुधवार पासून होणार आहे. शिवपुराण कथेचे प्रवचन हभप. भागवताचार्य विदर्भ केशरी स्वामी सारंग चैतन्यजी महाराज रा. अमरावती यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. भगवान शिवशंकर भोलेनाथांच्या विवि...
Ashadhi Ekadashi Vitthal Rukmai and Shri Parameshwar Darshan | आषाढी निमित्ताने वाढोण्याच्या मंदिरात विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वर दर्शनासाठी सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी – NNL

Ashadhi Ekadashi Vitthal Rukmai and Shri Parameshwar Darshan | आषाढी निमित्ताने वाढोण्याच्या मंदिरात विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वर दर्शनासाठी सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| पाऊस पाणी चांगला पडू दे.. शेतकऱ्यांची घरे धनधान्याने भरू दे... सर्वाना सुख समृद्ध ठेव असे साकडे घालत आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरातील विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वराचं दर्शनासाठी सकाळपासून हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायातील महिलां - पुरुषांसाठी आनंदाची पर्वणी आहे. साक्षात विठू माऊलींचे दर्शन घेऊन जीवन सफल करण्याच्या उद्देशाने लाखो भक्त पंढरपूरला रवाना होतात. आणि देव शयनी एकादशीच्या पावन पर्वावर उपवास धरतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत " पंढरीची वारी " या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील सभागृहात दुपारी 2 ते 4.30 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
A person was arrested for demanding a bribe of 400 | शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी एकास अटक -NNL

A person was arrested for demanding a bribe of 400 | शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी एकास अटक -NNL

क्राईम, लातूर
लातूर| तक्रारदार यांच्याकडून आरोपी जयप्रकाश बालाजी बिराजदार, वय 45 वर्षे, पद प्रयोगशाळा सहायक, वर्ग-3, नेमणूक पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर यांनी तक्रारदार यांच्या बहिणीस तिचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी म्हणून 400/- रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.16/07/2024लाच स्वीकृती व हस्तगत करताना रंगेहात पकडले आहे. लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांची बहीण ही इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी सन 2012-13 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर मध्ये शिक्षण घेत होती. सन 2013 मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर तेव्हापासून ती मौजे मालेवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे सासरी राहण्यास आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या म...
Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

नांदेड
नवीन नांदेड| श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,सिडको 2 नवीन, नांदेड या आमच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी विठ्ठल , रुक्मिणी व वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून शालेय परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. मिरवणुकीनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रभातफेरीची सांगता करण्यात आली. १७ जुलै आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी शिवाजी विघालय हडको ने परिसरातील भागातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून विठ्ठल रुक्मिणी, वारकरी वेशभूषा,तुळशी घेतलेल्या व टाळ विणा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेशजी महागावे ,मु.अ. बिरादार,स.शि.पवार ,मजरे श्रीमती मिरकुटे,भोसले, डांगे, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडकोने मुलांत रूजवला वृक्षारोपनाचा अमुल्य संस्कार आषाढी महोत्सवाचा आनंद द्विगुणित करत कुसुमताई माध्यमिक विद्यालयाने मुलांसमोर ...
Gurupurnima Account: 2 | गुरूपौर्णिमा लेखांक : २ गुरूंचे खरे स्वरूप -NNL

Gurupurnima Account: 2 | गुरूपौर्णिमा लेखांक : २ गुरूंचे खरे स्वरूप -NNL

नांदेड, लेख
१. शिष्याचा विश्वास : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे. भावार्थ : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे’, यातील गुरु हा शब्द बाह्यगुरूंविषयी वापरलेला आहे. गुरूंवर विश्वास असेल तरच गुरु हे ‘गुरु’ म्हणून कार्य करू शकतात. ‘गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे’, यातील गुरु हे अंतर्यामी असलेले गुरु होत.’ २. गुरुतत्त्व एकच : सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. ज्याप्रमाणे गायीच्या कोणत्याही आचळातून सारखेच शुद्ध आणि निर्मळ दूध येते, त्याचप्रमाणे प्रत्येक गुरूंमधील गुरुतत्त्व एकच असल्याने त्यांच्याकडून येणार्‍या आनंदलहरी सारख्याच असतात. समुद्राच्या लाटा जशा किनार्‍याकडे येतात, तसेच ब्रह्म / ईश्वर यांच्या लाटा, म्ह...
A thorough investigation into the Vishalgarh riots | विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा:नसीम खान -NNL

A thorough investigation into the Vishalgarh riots | विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा:नसीम खान -NNL

नांदेड
मुंबई| विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच विशाल गडावर मोर्चा काढणार याची पोलीसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशाळ गडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. विशाळगड दंगल प्रकरणी माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार भाई जगताप, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार युसुफ अब्राहनी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, भरत सिंह भरत...
Create public awareness | अतिसार रोखण्यासाठी तसेच ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी गाव स्‍तरावर मोठया प्रमाणात जनजागृती करा -NNL

Create public awareness | अतिसार रोखण्यासाठी तसेच ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी गाव स्‍तरावर मोठया प्रमाणात जनजागृती करा -NNL

नांदेड
नांदेड| अतिसार रोखण्यासाठी तसेच ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी गाव स्‍तरावर मोठया प्रमाणात जनजागृती करावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्टॉप डायरिया अभियान तसेच स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा ही मोहिम सुरू असून या माहिम गतिमान करण्‍यासाठी आज मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात जिल्‍हास्‍तरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्‍यात आली. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ सलमा हिराणी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता वाडिकर, जिल्‍हा पाणी ...
The security guard stole ten thousand from the donation box | सुरक्षारक्षकानेच दानपेटीतून चोरले दहा हजार; श्री रेणुका देवी मंदिरातील प्रताप -NNL

The security guard stole ten thousand from the donation box | सुरक्षारक्षकानेच दानपेटीतून चोरले दहा हजार; श्री रेणुका देवी मंदिरातील प्रताप -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील श्री रेणुकादेवी मंदिराच्या सुरक्षा रक्षकाने दानपेटीतून अंदाजे दहा हजार रुपये चोरी केले. या प्रकरणी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुरक्षा रक्षक याचे विरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री रेणुका देवी मंदिरात दि.२७ जून ते १ जुलै या कालावधीत रात्र पाळीवरील किशोर सुभाष जाधव या सुरक्षा रक्षकाने १० रु,५० रू,१०० रु,५०० रू या दराच्या नोटा काडीच्या साह्याने काढत असल्याचे सी.सी.टि.व्ही फुटेजची पाहणी केली, असता दिसून आले. असे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनी पालसिंग ब्राह्मण हे करीत आहेत....
error: Content is protected !!