Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Kalash Rohan in Mahadev Temple | सहयोग नगरातील महादेव मंदिरात कलश रोहन सोहळा संपन्न -NNL

Kalash Rohan in Mahadev Temple | सहयोग नगरातील महादेव मंदिरात कलश रोहन सोहळा संपन्न -NNL

नांदेड
नांदेड| येथील राज कार्नर जवळीत सहयोग नगरातील शिव पंचायतन मंदिर (महादेव मंदिर) येथे कळस पूर्नस्थापना सोहळा दि.१४.जुलै,रविवार रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाने सहयोग नगरातून कलश मिरवणूक काढून भजन किर्तनासह श्री. गणेश महाराज मठपती यांच्या शुभहस्ते कलशारोहण व पूजाविधी कार्यक्रम संपन्न झाला तसेच. महाप्रसादाचे वाटप करून कलशा रोहन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सहयोग नगर, येथील शिव पंचायत मंदिर (महादेव मंदिर) असून मंदिराच्या वरिल भागामध्ये १९९५ ला कळस बसविण्यात आला होता. तो स्लॅब पावसामुळे २०२४ सालातील मे महीन्यात तुटुन खाली कोसळ्यामुळे महादेव मंदीराचा कळस ही पडला होता. त्यामुळे प्रभागातील नागरीकांनी एकत्र येत नवीन कळस बसविण्याचा निर्णय घेऊन भव्य सोहळ्याचे आयोजन करत विधीवत कलशारोहन केले. यावेळी परीसरात...
Ms. Ishita Sachin Kasliwal qualified for CE ।  कु.ईशिता सचिन कासलीवाल ठरली सिए साठी पात्र ; प्रतिथयश कासलीवाल कुंटूबिंयातली पहीली चार्टेड अंकाऊंटंट -NNL

Ms. Ishita Sachin Kasliwal qualified for CE । कु.ईशिता सचिन कासलीवाल ठरली सिए साठी पात्र ; प्रतिथयश कासलीवाल कुंटूबिंयातली पहीली चार्टेड अंकाऊंटंट -NNL

नांदेड
नांदेड। शहरातील प्रसिदध व्यावासायिक कुंटूब असलेल्या कासलीवाल परिवारातील कुं इशिता सचिन कासलीवाल हीने स्वयंप्रेरणेतून आणि जिद्दीने चार्टेड अंकाऊंटंट हे क्षेत्र करीअराठी निवडत कासलीवाल कुंटूबियांमधली पहीली वहीली सिए बनन्याचा बहुमान मिळविला आहे तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्याववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रत्येक जण हा काही नव्या गोष्टी शिकत असतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी येईल तो संघर्ष तयार करायची त्या व्यक्तीची काटीबद्धता असते. असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला आपल्या भाविष्याबाबत असे काही संकेत मिळतात की पुढे त्यांचे आयुष्यच बदलून जाते.देशभरातील प्रथितयश परीक्षांपैकी एक गणल्या जाणाऱ्या सीएच्या फायनल आणि इंटर परीक्षेचे निकाल गुरुवारी (दि.११ जुलै) सकाळी जाहीर झाले. यंदा या दोन्ही परीक्षांमध्ये राज्यातील विद्याथ्यांनी मोठा ठसा उमटवला असून कु.ईशिता हीने इंटर परीक्षेत आणि फायनल परि...
Children’s heart disease screening camp today । आज लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन -NNL

Children’s heart disease screening camp today । आज लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड। येथील डॉक्टर लाईन भागातील लोटस हॉस्पिटलमध्ये दिनांक १९ जुलै २०२४,शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजेपासून महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत लहान मुलांच्या हृदयरोगाचे मोफत निदान व उपचार शिबीर व लहान मुलांच्या हृदयातील छिद्र बंद करण्याचे बिना टाक्याचे ऑपरेशन व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची माहिती जिल्ह्यातील सर्व संबंधित मेडिकल ऑफिसर, आर.एच. पी.एस.सी., सब सेंटर, अंगणवाडी केंद्र यांच्या पर्यत पोहचवावी असे आवाहन लोटस चे संचालक डॉ संजय पडलवार यांनी केले आहे .. याबाबत सविस्तर माहिती देतांना डॉ. संजय पडलवार यांनी सांगितले की, डॉक्टर लाईन येथील लोटस हॉस्पिटल येथे दि. १९ जुलै २०२४,शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता लहान मुलाच्या हृदयरोगाचे मोफत निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हैद्राबाद येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. सुदीप वर्मा (पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट) व ना...
Hindu Janajagruti Samiti | विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी -NNL

Hindu Janajagruti Samiti | विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी -NNL

महाराष्ट्र
पंढरपूर/सोलापूर| विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून अन्याय्य कारवाई करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन केली. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार श्री. भरतशेठ गोगावले उपस्थित होते. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. केवळ विशाळगडच नव्हे, तर राज्यभरातील ज्या ज्या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे झाली आहेत, सर्व हटवण्यात येतील, तसेच सर्व गड-दुर्गांचे शासनाकडून संवर्धन अन् विकास करून त्यांचे पावित्र्य राखले जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. छत्रपती ...
‘Arogya Wari, Pandhari Dari’ | ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून 13 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा -NNL

‘Arogya Wari, Pandhari Dari’ | ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून 13 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा -NNL

नांदेड
मुंबई| आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम राबवीत आहे. वारीमध्ये 17 जुलै पर्यंत 13 लाख 96 हजार 072 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला तर लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा...
The Chief Minister’s Beloved Sister Yojana has received a great response from all over | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद – NNL

The Chief Minister’s Beloved Sister Yojana has received a great response from all over | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद – NNL

नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी. तसेच पात्र, अपात्र व त्रुटीच्या अर्जाची वर्गवारी तसेच चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल,महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या शिबिरांचा आढावा घेतला. अर्जाचे वर्गीकरण आणि चावडी वाचन करून योग्य अर्जांची निवड करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ...
Chief Minister Youth Work Training | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

Chief Minister Youth Work Training | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| राज्यातील असंख्य युवकांना आपले शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात वणवण फिरावे लागते. युवकांना विद्या वेतनासह आपण घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या 'महास्वयंम' या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. https://mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना आणि उद्योग- व्यवसायांना, आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे. बारावी पास विद्यार्थ्यां...
Superintendent of Police Shri Krishna Kokate | वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विशेष लक्ष देणार – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

Superintendent of Police Shri Krishna Kokate | वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विशेष लक्ष देणार – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सलग तिन दिवस झालेल्या खूनाचा घटनेनंतर परिसरात व शहरात खळबळ उडाली, या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन तिन्ही घटनेचा आढावा घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय येथुन पाठवुन व शहर वाहतूक शाखा मार्फत विविध भागात रस्ता सुरळीत होण्यासाठी व गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे १८ जुलै रोजी सतत तिन दिवस झालेल्या खूनाचा गुन्हा संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, यांनी भेट घेऊन तिन्ही गुन्हयातील माहिती घेऊन घटनेचा आढावा घेतला व उपस्थित पत्रकार यांना घटनेची माहिती दिली, यावेळी तिन्ही घटनेतील खूनाचा घटनेतील आरोपी तात्काळ अटक केले असल्याचे सांगितले. ...
Murder in rural police station limits for the third day | ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिसऱ्या दिवशीही खुन -NNL

Murder in rural police station limits for the third day | ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिसऱ्या दिवशीही खुन -NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिसऱ्या दिवशी खुनाची घटना बळीरामपुर भागात घडली असुन तिसऱ्या दिवशी अमोल लांडगे या २३ वर्षिय तरूणाच्या खंजरने छातीवर पोटावर व पाठीवर वार करून मारहाण केली यात तो गंभीर जखमी झाला असून उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असून या प्रकरणी तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भेट देऊन तिन्ही घटनेचा आढावा घेतला आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी लिबांजी लांडगे रा.गौतमी नगर बळीरामपुर नांदेड 17 जुलै 24 रोजी सायंकाळी 7.15 वाजताचे सुमारास मी घरी असतांना आमच्या शेजारी राहणा-या छोट्या मुलाने घरी येवुन मला सांगितले की, तुमचा मुलगा नामे अमोल लांडगे यास दोघे-तिघे इसम खंजरने मारत आहे असे सांगितले तेव्हा मी व माझी प...
Circulation in schools of the district | कौशल्य विकासासाठी नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरती परिक्रमा – NNL

Circulation in schools of the district | कौशल्य विकासासाठी नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरती परिक्रमा – NNL

नांदेड
नांदेड| कौशल्य शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी स्कील्स ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत़ लेंड अ हॅन्ड इंडिया ( Lend a hand India) या संस्थेच्या वतीने भारतभर फिरती परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या परिक्रमेचे आगमन झाले असून जिल्ह्यातील १० शाळांना ही परिक्रमा भेट देणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेत या परिक्रमेचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आणि प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, आयोजन सहयोगी विजय मेश्राम, समन्वयक क्रांतीदीप कांबळे, मीनाक्षी अतकुलवार, अजय बॉम्बेकर, प्रशांत सोनावले व तुषार कुचेकर यांची उपस्थिती होती यावेळी संबंधित संस्थेच्यावतीने या उपक्रमाचे सादरीकरण आणि प्रात्यक्षिक करण्यात आले प्रात्यक्षिकानंत...
error: Content is protected !!