Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Recruitment of military children in hostels | सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती -NNL

Recruitment of military children in hostels | सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती -NNL

नांदेड
नांदेड| सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक/अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येणार आहेत. स्वयंपाकी (महिला) या एका पदासाठी पात्रता किमान एक वर्ष अनुभव तर वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे आवश्यक आहे. अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 25 जुलै 2024 पर्यंत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे....
youth’s self-immolation warning | जि.प. नांदेड च्या उदासीन धोरणाला कंटाळून युवकाचा आत्मदहन ईशारा -NNL

youth’s self-immolation warning | जि.प. नांदेड च्या उदासीन धोरणाला कंटाळून युवकाचा आत्मदहन ईशारा -NNL

Blog, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद हे आपल्या अनेक करणाम्यामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यात अनेक छोटे मोठे प्रकरण सपशेल दाबण्याचा हातखंडा येथील कर्मचारी आणि अधिकारी यांना चांगलाच जमतो हे अनेक प्रकरणातून सिद्ध झाले आहे. असाच काहीसा अजब प्रकार हदगाव तालुक्यातील मौजे मनाठा येथील युवक संतोष रामराव डवरे याच्या सोबत घडल्याने त्याने चक्क १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त संभाजी नगर, जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, २००८ साली पार पडलेल्या अनुसूचित जमाती उमेदवारासाठी कंत्राटी ग्राम सेवक पद भरतीत अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने सदरील युवकाने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागवली. परंतू आपल्या जिल्हा परिषदेची नाहक बदनामी होव...
Balaji Ambore Elected । प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उपमहानगर प्रमुख पदी बालाजी अंबोरे यांची निवड -NNL

Balaji Ambore Elected । प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उपमहानगर प्रमुख पदी बालाजी अंबोरे यांची निवड -NNL

नांदेड
नांदेड। निराधार दिव्यांगाचे हृदय सम्राट मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने नांदेड जिल्हा कार्यकारणी मजबूत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतपाल सिंग साहू यांनी सामाजिक कार्यकर्ते बालाजी अंबोरे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उप महानगर पदी नियुक्ती करून पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. दिनांक 16 जुलै रोजी प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मंगनाळे त्यांचे दिनांक 9 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या परिवारासह जिल्हाभरातील दिव्यांगांमध्ये शोककळा पसरली या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेतील प्रहार संघटनेच्या कार्यालयामध्ये श्रद्धांजलीपर कार्यक्रमांमध्ये नांदेड जिल्ह्यातील काही तालुकाप्रमुखांची निवड करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा परिषद येथील प्रहार संघटनेच्या कार्याल...
Yalgar march | जिल्ह्यातील विविध कार्यालयावर क्रांतीदिनी दिव्यांगांचा यलगार मोर्चा व तिव्र आंदोलन – राहुल साळवेने दिला इशारा -NNL

Yalgar march | जिल्ह्यातील विविध कार्यालयावर क्रांतीदिनी दिव्यांगांचा यलगार मोर्चा व तिव्र आंदोलन – राहुल साळवेने दिला इशारा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिव्यांगांच्या प्रलंबित विविध न्याय मागण्यांसंदर्भात परत दिव्यांगांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य यलगार मोर्चा काढून तिवृ स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळुन 76 वर्ष पूर्ण झाले तरी दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून आजही वंचितच रहावे लागत असल्याचे राहुल साळवे आणि चंपतराव डाकोरे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, RPWD ACT - 2016 व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 ची जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी झाली नाही.सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांसह आमदार खासदार यांच्या कडील दिव्यांगा...
With artificial intelligence | महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ -NNL

With artificial intelligence | महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ -NNL

लेख
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे. मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्ध...
A workshop was held on floriculture and good agriculture | फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न -NNL

A workshop was held on floriculture and good agriculture | फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न -NNL

नांदेड
नांदेड| सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क( मॅग्नेट )प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड व प्रकल्प संचालक,आत्मा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय फुलशेती उत्तम कृषी पद्धती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, भाऊसाहेब बराटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक,आत्मा,नांदेड महादेव बरडे, प्रकल्प उपसंचालक,मॅग्नेट लातूर, गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट, लातूर, हेमंत जगताप, मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल,शिवाजीनगर , गजेंद्र नवघरे , कन्सल्टंट , मॅग्नेट प्रकल्प, लातूर, अक्षय हातागळे, GESI अधिकारी,मॅग्नेट, लातूर* इत्यादी मान्यव...
Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर -NNL

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कॅम्प ( शिबीर ) लावण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेतील या कॅम्पमध्ये सर्व पात्र महिलांनी अर्ज दाखल करावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे. जिल्हाभरातील आपल्या महिला भगिनींसाठी आज जाहीर करण्यात आलेल्या एका व्हिडिओ संदेशामध्ये त्यांनी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या,मध्यस्थाच्या आमिषाला बळी न पडता कोणाला एक पैसा ही न देता सरळ सरळ ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या कॅम्पमध्ये महिलांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 11 ते 2 या वेळेमध्ये अंगणवाडी सेविका सर्वांचे अर्ज स्वीकारणार आहे.त्यामुळे सर्वांनी या काळात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपल्या अर्ज ऑफलाइन पद्धतीने द्यावे. अर्ज भरण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असून...
Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

नांदेड
हदगाव| हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक येथील प्रतिष्ठित नागरिक शेख मुसा शेख चांद उर्फ मूसा सेठ यांचे आज दि.२० जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षी होते. त्यांच्या पार्थिव देहावर सुमारास हदगाव शहरातील कब्रस्तान येथे मुस्लिम रीतीरीवाज प्रमाणे अंत्यविधी करून अंत्यसंस्कार पार पडले. हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक स्थित असलेले शेख मुसा सेठ हे शहरासह तालुक्यात परिचित होते कोणत्याही समाजाचे कोणतेही काम असो ते त्यांना योग्य सल्ला देत होते. किंवा अंमलबजावणी करण्यास भाग पाडत होते. तसेच अणखी विशेष म्हणजे निजामकालीन महसुल च्या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास होता तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक बाबतीत त्याचे बरेच योगदान असुन, त्याचे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळचा संबध होता. पण त्यानी कोणत्या ही राजकीय पक्षाचे कधी ही सदस्यत्व स्विकारले नाही म्हणून त...
Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पद्धतीने -NNL

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पद्धतीने -NNL

नांदेड
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड परिसरात जवळपास 300 झाडांचे वृक्षारोपन मियावाकी पध्दतीने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अधिष्ठाता यांनी मियावाकी वृक्षलागवड ही पध्दत जपानमधील वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. अकीरा मियावाकी यांनी शोधून काढली असुन मियावाकी पध्दतीने वृक्षारोपन केल्यामुळे कमी जागेत जास्त झाडे लावता येतात ज्यामुळे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी वृक्षांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांची वाढ जोमाने होते. या पद्धतीमुळे जैवविविधता जोपासण्यास हातभार लागुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते व आपल्या भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असे मत व्यक्त केले. तसेच अधिष्ठाता यांनी वृक्षांचे संगोपन हा फार महत्त्वाचा भाग असल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वड, कडूनिंब, ...
Committee to Protect Journalists | पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हास्तरीय गुरू गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन -NNL

Committee to Protect Journalists | पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हास्तरीय गुरू गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड
धर्माबाद| प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुध्दा यशवंत, गुणवंत, किर्तीवंत, विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आदर्श उद्योजक पुरस्कार, आदर्श प्रशासक पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार व स्कूल किट वाटप सोहळा माहेश्वरी भवन धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समिती धर्माबादच्या वतीने भव्य जिल्हास्तरी पुरस्कार दि. २५ जूलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटक कैलासभाऊ गोरठेकर, अध्यक्षस्थानी प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, मुख्य मार्गदर्शक मारोतराव कवळे गुरुजी प्रमुख पाहुणे मंगेश कदम, महेंद्र गायकवाड, शशिकांत गाडे, माॅन्टीसिंग जहागीरदार, बाळूभाऊ जाधव, शंकर बोलमवाड हे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार संरक्षण समिती धर्माबादच्या वतीने तालुक्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या शैक्षणिक साहित्यामध्य...
error: Content is protected !!