Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Relief and Rehabilitation Minister Anil Patil : जानेवारी ते मे २०२४ मधील अवकाळीमुळे झालेल्या शेती नुकसानीपोटी ५९६ कोटी रुपये वाटपास मंजुरी -NNL

Relief and Rehabilitation Minister Anil Patil : जानेवारी ते मे २०२४ मधील अवकाळीमुळे झालेल्या शेती नुकसानीपोटी ५९६ कोटी रुपये वाटपास मंजुरी -NNL

कृषी, मुंबई
मुंबई| राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्त...
Everyone should take initiative for organ donation awareness : अवयवदान जनजागृतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा: जिल्हाधिकारी -NNL

Everyone should take initiative for organ donation awareness : अवयवदान जनजागृतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा: जिल्हाधिकारी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| अवयवदान किंवा अंगदान हा विषय फार महत्त्वाचा असून, अवयवदात्याच्या या सर्वश्रेष्ठ दानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते, त्यामुळे या कार्यात सर्वानी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. देशात जगात आज अनेक रुग्ण अवयव प्रत्यापरोपणासाठी प्रतिक्षेत आहेत. त्यांना जीवनदान देण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे आवश्यक आहे. आपल्या मुत्यूपश्चातही आपण अवयवदान करुन समाजाच्या, इतराच्या का...
Mahendra Gaikwad passed away : संगणक अभियंता महेंद्र गायकवाड यांचे निधन.. NNL

Mahendra Gaikwad passed away : संगणक अभियंता महेंद्र गायकवाड यांचे निधन.. NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील नाईक नगर भागातील रहिवासी तथा संगणक अभियंता महेंद्र गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दिनांक 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे खासगी उपचारादरम्यान निधन झाले . ते संपूर्ण मित्र परिवारात प्रथितयश संगणक अभियंता म्हणून ओळखले जात त्यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून कायम अव्वल क्रमांक पटकावित एक हुशार संगणक अभियंता पदापर्यंत मजल मारली होती, त्यांनी राज्य शासनाच्या अनेक संगणकीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी आपल्या कारकिर्दीत केली होती त्यांच्या जाण्याने जुन्या काळातील संगणकीय अभियंत्यांच्या वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथील गोवर्धन घाट समशानभूमी दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 9 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, मुलगा , मुलगी व पत्नी असा मोठा परिवार आहे...
Shravani Monday and Shivamuth (Shivmushtivrat) : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) -NNL

Shravani Monday and Shivamuth (Shivmushtivrat) : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) -NNL

लेख, नांदेड
प्रस्तावना - हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरु होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी 'श्रावणी सोमवार' हे व्रत केले जाते. या वर्षी हे व्रत 5,12,19,26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर या दिवशी असणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे,पूजा करणे, शिवामूठ वाहणे अश्या प्रकारे हे व्रत केले जाते. प्रस्तुत लेखातून 'श्रावणी सोमवार' हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी विवेचन करण्यात आले आहे. सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरु असता...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रति महिना ५००० रु. पेन्शन देण्याचा निर्णय घ्या – ॲड रेवण भोसले -NNL

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रति महिना ५००० रु. पेन्शन देण्याचा निर्णय घ्या – ॲड रेवण भोसले -NNL

राजकीय
धाराशिव/उस्मानाबाद | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील ६० वर्षावरील प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा किमान ५ हजार रुपये पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मंदिर, मज्जिद, चर्च बांधण्यात कसलेही स्वारस्य नसून कर्जबाजारीपणामुळे दिवसेंदिवस होत असलेल्या आत्महत्या थांबवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी व बेरोजगारांना रोजगार देणे तसेच राज्यातील भीषण दुष्काळी स्थिती बाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकीकडे सार्वजनिक क्षेत्रात बोनसचा कायदा लागू झालेला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र बोनस कधी पाहिलेलाच नाही. वर्षानुवर्षे जमिनीमध्ये गाळलेला घाम. केलेले श्रम व आठवलेले रक्त यांचे मूल्य शेतकऱ्या...
Ashatai Shinde met Sharad Chandra Pawar : सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट  -NNL

Ashatai Shinde met Sharad Chandra Pawar : सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी काल दि. 3 ऑगस्ट रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, यावेळी शरदचंद्र पवार यांचा आशाताई शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये लोहा कंधार मतदार संघातील विविध विषयावर सखोल करण्यात आली,आगामी होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये यावेळी तासभर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचं...
Prithviraj Chavan : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले: पृथ्वीराज चव्हाण -NNL

Prithviraj Chavan : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले: पृथ्वीराज चव्हाण -NNL

राजकीय
मुंबई| टोलमाफी वरून काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत 25% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय 20 किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर 50 टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या एक महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास, पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यात यावी, ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आज टोल नाक्याच्या ठि...
Saint Savata Mali One of the greatest Saints of Varkari Sect : संत सावता माळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत – महावीरचंद श्रीश्रीमाळ – NNL

Saint Savata Mali One of the greatest Saints of Varkari Sect : संत सावता माळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत – महावीरचंद श्रीश्रीमाळ – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| कर्तव्य आणि कर्म हीच खरी ईश्वरसेवा आहे. अशी शिकवण देणारे संत शिरोमणी सावता माळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत म्हणून सर्वाना परिचित आहेत. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते... ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले होते असे मी गतवर्षी आपल्या परमेश्वर मंदिरात आयोजित संत चरित्र कथेत ऐकले असल्याचे मत श्री परमेश्वर मंदिर संस्थानाचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दिनांक ०३ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अन्नदानाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मंदिर सभागृहात अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ...
Four trucks loaded with Khaira wood were seized by the forest department in one night and released the next day |खैराच्या लाकडांनी भरलेली चार ट्रक एकाच रात्रीत वन विभागाने पकडले आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिले – NNL

Four trucks loaded with Khaira wood were seized by the forest department in one night and released the next day |खैराच्या लाकडांनी भरलेली चार ट्रक एकाच रात्रीत वन विभागाने पकडले आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिले – NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे|"खैर"प्रजातीचे दूर्मीळ बहूगुणी असलेल्या लाकडाची वाहतूक करणारे चार ट्रक इस्लापूरचे फिरते पथक आणि बोधडी वनपरिक्षेत्राच्या संयुक्त कार्यवाहीत पकडून सावरी डेपोत लावण्यात आली. ही कार्यवाही २ आॅगस्टच्या रात्री १० वाजताचे आसपास जलधरा-इस्लापूर दरम्यानच्या हरीण खरबाजवळ करण्यात आली. पेंडलवाडा आदिलाबाद उनकेश्वर सारखणी किनवट बोधडी हिमायतनगर बोरगडी  येथे हे लाकूड जाणार होते. परंतु तीन ऑगस्ट रोजी सदरच्या गाड्या सोडल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे वाहतूक पासेस होत्या म्हणून सोडल्याचे समजते. मग रात्री पासेस पाहिल्या नंतर वन विभागाचे समाधान झाले नव्हते का ? असा सवाल व्यक्तविला जात आहे.        इस्लापूर-बोधडी वनविभागाने खैराच्या लाकडाची वाहतूक करणारे चार ट्रॅक पकडल्याच्या धाडसाचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात आले परंतू तडकाफडकी गाड्या सोडून दिल्याने पाणीही फेरल्या गेल्याची चर्चा चालू आहे....
खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. दिनांक 02/08/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि/मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदारा कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, रेल्वेस्टेशन परीसरात पोलीस ठाणे उस्मानपुरा औरंगाबाद शहर हद्यीतील खुनाच्या गुन्हयात शिक्षा झालेला व पॅरोल रजेवर येवुन परत कारागृहात न जाता पळुन गेलेला आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर हा रेल्वेस्टेशन, नांदेड येथे आहे अशी माहीती मिळाल्याने स्थागुशाचे पथकाने रेल्वेस्टेशन परीसरातुन फरार आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर वय 29 वर्ष रा. जवळा मुराद ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्...
error: Content is protected !!