Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
सप्तरंगी साहित्य मंडळाकडून वृक्षभेट देऊन कविंचा सन्मान ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी -NNL

सप्तरंगी साहित्य मंडळाकडून वृक्षभेट देऊन कविंचा सन्मान ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वृक्षभेट देऊन साहित्य चळवळीतील कविंचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने मंडळाचे कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, राज्य कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, ज्येष्ठ कवी थोरात बंधू, आंबेडकरी कवी मुक्तीघोष सुर्यंकर, पत्रकार कुलदीप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. काव्यपौर्णिमा मालेतील जुलै २०२४ महिन्याची ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. यात अनुरत्न वाघमारे, पांडुरंग कोकुलवार, प्रज्ञाधर ढवळे, शरदचंद्र हयातनगरकर, थोरात बंधू, ...
District Health Officer Dr. Sangita Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांची मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट -NNL

District Health Officer Dr. Sangita Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांची मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी शनिवार दिनांक 3 आँगस्ट रोजी भोकर तालुक्यातील मातुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या भेटीत त्यांनी आरोग्य केंद्राच्या कार्याची पाहणी केली आणि आरोग्य कर्मचारी व रुग्णांसोबत संवाद साधला. डॉ. देशमुख यांनी आरोग्य केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले. यावेळी प्रसूत झालेल्या मातेस भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी त्यांनी मातांचे आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या माता बालसंगोपन कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण शिक्षण, स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि मानसिक आधार अशा विविध सेवांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा आ...
D.M. Khandare : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्र-संचालकपदी डॉ. डी.एम. खंदारे यांची निवड -NNL

D.M. Khandare : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्र-संचालकपदी डॉ. डी.एम. खंदारे यांची निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी यापूर्वी डॉ. दिगंबर नेटके हे होते. ते नियत वयोमानानुसार दि. ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे वरिष्ठ प्राध्यपक डॉ. डी.एम. खंदारे यांची प्र-संचालकपदी निवड केली आहे. डॉ. डी. एम. खंदारे यांनी यापूर्वी विद्यापीठाचे प्र-वित्त व लेखाधिकारी, क्रीडा विभागाचे संचालक म्हणूनही यशस्वीरित्या काम पहिले. डॉ. खंदारे यांना शैक्षणिक आणि प्रशासनातील प्रदिर्घ अनुभव असून त्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील उत्तम मार्गदर्शक म्हणुन नावलौकिक मिळविले आहे. या दरम्यान त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील अनेक समित्यांमध्ये काम केले आहे. सध्या ते वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. या त्यांच्या निवडीबद्दल विद्या...
Mp. Ashoka Rao Chavan : कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी – खा.अशोकराव चव्हाण -NNL

Mp. Ashoka Rao Chavan : कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी – खा.अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| सोशल मिडियावर येणारे बहुतांश मजकूर सध्या नकारात्मक दृष्टिने टाकले जातात, त्याकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून कार्यरत रहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या नंदेड दक्षिण ग्रामीण विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोमवारी मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खा.अजि. गोपछडे, आ. जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, आ. तुषार राठोड, माजी आ. राम पाटील रातोळीकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले, विरोधकांनी सुरु केलेल्या खोट्या व नकारात्मक प्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. बेरोजगारांना काम मिळावे यासाठी नांदेड शहरात रोजगार मेळावे घेण्याची गरज आहे, अशा मेळाव्यात युवकांच्या हाताला काम मिळेल. याश...
Defense of OBC reservation : भोकर येथे १८ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन -NNL

Defense of OBC reservation : भोकर येथे १८ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन -NNL

नांदेड, सोशल वर्क
भोकर। नांदेड जिल्हा सकल ओबीसी समन्वय समितीच्या वतीने भोकर येथे दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोज रविवारी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते मा.प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती दि.५ ऑगस्ट रोजी भोकर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ओबीसी समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली. यावेळी ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड, माधवराव अमृतवाड, सतीश देशमुख,अॅडो. शेखर कुंटे,संदीप पाटील गौड, अॅड.परमेश्वर पांचाळ,सुरेशराव बिल्लेवाड,विठल फुलारी, बि.आर.पांचाळ, निळकंठ वर्षेवार,संतोष मारकवार,आनंदराव डांगे,संजय घंटलवार, सुभाषराव नाईक,आप्पाराव राठोड, दिलीपराव सोनवडे,पांडुरंग वर्षेवार,मोहन लिंगमपल्ले, श्रीकांत दरबस्तवार, रामदास सोनवडे आदिसह अनेकांची उपस्थिती होती....
लोटस् हॉस्पिटल राष्ट्रीय आरोग्य अभियान व बाल स्वास्थ्याच्या सूचित…! NNL

लोटस् हॉस्पिटल राष्ट्रीय आरोग्य अभियान व बाल स्वास्थ्याच्या सूचित…! NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा एक महत्त्वाचा उपक्रम नॅशनल हेल्थ मिशन द्वारे राबविण्यात येत असून या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण ३६ जिल्ह्यामधील जन्मापासून तर १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ४ 'डी' म्हणजे जन्माच्या वेळी दोष, कमतरता, रोग, अपंगत्वासह, विकास विलंबन आदींसह त्यांच्यातील या विकृती कमी करून त्या मुलांचे जीवनमान सुधारुन त्यांना सामान्यपणे जगण्यासाठी निरोगी बनविणे हे आहे. या उद्देशामध्ये हातभार लावण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोटस हॉस्पीटल ने समोर येत शहरात पहिले राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सूचीबद्ध रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे त्यामुळे या योजनांचा चा लाभ घेण्यासाठी पालकांची व चालक रुग्णांची सुलभ सुव्यवस्था झाली आहे. आता या सेवांसाठी ईथल्या पालकांना मुंबई -पुणे या यासारख्या ठिकाणी जाऊन प्रतिक्षा करण्यात वेळ दव...
DIG Shahaji Umap : कर्तव्यदक्ष डीआयजी शहाजी उमाप यांनी पाठविलेला संदेश समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी  – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

DIG Shahaji Umap : कर्तव्यदक्ष डीआयजी शहाजी उमाप यांनी पाठविलेला संदेश समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी  – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून ३० जुलै रोजी माननीय शहाजी उमाप साहेबांनी पदभार स्वीकारला. ही बातमी नांदेडकराना सुखद धक्का देणारी निश्चितच होती. आणि समाज विघातक कारवाया करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारी होती.उमाप साहेबांकडून सर्वसामान्य जनतेला खुप अपेक्षा आहेत. तसे पहिले तर मागील एक ते दीड महिन्यापासून साहेबांच्या येण्याची प्रतीक्षा नांदेडरांना होतीच. परंतु कार्यालयीन अडचणीमुळे थोडा वेळ लागला. मी साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड डॉ.अण्णा भाऊ साठे जिल्हा जयंती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने जयंती चांगली होऊन नवीन पायंडा पडावा यासाठी प्रयत्नशील होतो. जिल्ह्यातील अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विशेष अतिथी म्हणून मुख्य कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.त्यामध्ये जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. अबीना...
On the first Monday, the devotees took darshan of the Lord : ७१ वर्षाने आलेल्या श्रावण महिन्याच्या पहील्या सोमवारी 30 हजार भवीकांनी घेतले परमेश्‍वराचे दर्शन – NNL

On the first Monday, the devotees took darshan of the Lord : ७१ वर्षाने आलेल्या श्रावण महिन्याच्या पहील्या सोमवारी 30 हजार भवीकांनी घेतले परमेश्‍वराचे दर्शन – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| ओम नमः शिवाय....हर हर महादेव ...जय भोलेनाथच्या गजरात सकाळी ४ वाजता हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणा वासीयांचे श्रध्दास्थान हरिहर आणि शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीला पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत अभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ब्रम्हांडनायक, देवाचे देव मानल्या जाणऱ्या श्री भोळ्या शंकराच्या दर्शनासाठी श्रावणी सोमवाराचं व्रत करनाऱ्यासह हजारो पहिला- पुरुष भक्तांनी दर्शनासाठी गर्द्दी केली. सायंकाळ पर्यन्त जवळपास ३० हजार भावीकांनी दर्शन घेतल्याची माहीती मंदीर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सर्वाधिक सण उत्सव याच महिन्यात येत असल्याने या महिन्याला व्रत वैकल्याचा महिना असेही म्हंटले जाते. पवित्र श्रावण मासाची सुरवात दि.०५ सोमवार पासुन झाली असून, पहील्या सोमवारी हजारो भावीकां...
Himayatnagar police arrested three accused in the robbery : हिमायतनगर पोलीसांनी दरोडयातील तीन पाहीजे असलेले आरोपीतास केले अटक – NNL

Himayatnagar police arrested three accused in the robbery : हिमायतनगर पोलीसांनी दरोडयातील तीन पाहीजे असलेले आरोपीतास केले अटक – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| मागील अडीच महीन्यापुर्वी हिमायतनगर पोलीस ठाणे हध्दीत दरोडयाचा गुन्हया घडला होता. यापुर्वी त्या गुन्हयातील दोन आरोपीतास अटक करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना पाहिजे असलेले चार आरोपीतांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी तीन आरोपीताना दिनांक 03 ऑकटोबर 2024 रोजी अटक करून त्यांचे ताब्यातुन मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, प्रल्हाद भाऊराव मिरासे, वय 38 वर्षे, रा. वडगाव खु. ता. हिमायतनगर नांदेड हे दिनांक 17 मार्च 2024 रोजी रात्रीच्या सुमारास हिमायनगर ते भोकर जाणारे रोडवर सरसम येथील खव्वा सेंटरच्या पुढील वळणावर मोटार सायकने जात असतांना चार इसमांनी फिर्यादीची मोटार सायकल अडवुन त्यंना चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा 12.000/- रू किमतीचा मोबाईल व नगदी 13,000/-रू दरोडा घातला. तसेच पुढे...
नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन -NNL

नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात शहिद झालेले जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे आणि गौतम वाघमारे यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने उद्या रविवारी दुपारी तीन वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील आयटीआय चौक जवळील हॉटेल ताज पाटील येथे उद्या रविवार दि.४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक आर. बी.मादले हे राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून के. एस. हरिदास आणि दिगंबर मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी शामदादा गायकवाड, अॅड. गोपाळ भगत ( मुंबई ), पँथर चंद्रकांत ठाणेकर ( देगलूर ), डॉ. संजय अपरांती ( नाशिक), अरविंद सोनटक्के (आयआरएस ), भिमपुत्र टेक्सास गायकवाड ( पुणे ), माधवराव जमदाडे (नांदेड )...
error: Content is protected !!