Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Overcome Disability : जन्मानंतर अल्पावधीत निदान झाले तर उपचाराने अपंगत्वावर मात करता येते -खल्लाळ -NNL

Overcome Disability : जन्मानंतर अल्पावधीत निदान झाले तर उपचाराने अपंगत्वावर मात करता येते -खल्लाळ -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| पालकांनी बाळाच्या आरोग्याप्रती सजग असले पाहिजे. जन्मानंतर अल्पावधीत जर अपंगत्वाचे निदान झाले तर तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर उपचार करून त्यावर मात करता येते असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन नांदेड ,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड, आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवडा 2024 निमित्त एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा अंतर्गत शहरातील श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अभिजित राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ बोलत होते व्यासपीठावर उपजिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय पेरके, तहसीलदार संजय वरकड, निवासी वैद्यकीय अधिकारी ड...
Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL

Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड,अनिल मादसवार| नांदेडकरांना विविध प्रकारची संगीत नृत्याची सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन दिवसांमध्ये करण्यात आले आहे. आठवा सांस्कृतिक महोत्सव येत्या 14 ते 16 ऑगस्ट 2024 दरम्यान नांदेड येथील कुसुम सभागृहात होणार आहे. अशी माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सप्तरंग सेवाभावी संस्था त्यासोबत लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स व संस्कृती मंत्रालय भारत सरकार जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या सहाय्याने सदरील महोत्सव आयोजित होत आहे या महोत्सवामध्ये भारतातील सुमारे 12 राज्यातील 500 कलावंत आपली कलाकृती सादर करण्यासाठी नांदेड नगरीत येणार आहेत. सदरील महोत्सवाची विभागणी दोन भागात करण्यात आली असून त्यात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपा...
Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन नुकसानीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने अर्थसहाय्य म्हणून ५ हजराची मदत देण्यासाठी इ-पीक पाहणीची अट टाकली आहे. ही जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन केली आहे. अन्यथा शासनाला न परवडणारे शेतकऱ्यांचे आंदोलन हदगाव तालुक्यात होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिनांक 13 तारखेला हादगाव येथील तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात डॉ.रेखाताई चव्हाण यांनी म्हटले आहे की, सण २०२३ - २४ या खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीन, कापूस या पिकाने मोठ्या नुकसानित आणले आहे. तत्पूर्वी...
Flag hoisting by Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन -NNL

Flag hoisting by Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूच...
Change in date of Home Guard registration : होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल -NNL

Change in date of Home Guard registration : होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेला होमगार्ड अनुषेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे केले होते. कार्यालयाच्या प्रशासकीय कारणास्तव या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. कागदपत्रे पडताळणी व शारीरीक क्षमता चाचणीसाठी अर्ज क्रमांकानुसार उमेदवारांना पोलीस मुख्यालय येथे बोलाविण्याचे सुधारित वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१php या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. के.ए.धरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे....
Mukhya Mantri Annapurna Yojana : महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” -NNL

Mukhya Mantri Annapurna Yojana : महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” -NNL

नांदेड, लेख
फार पूर्वीपासून चुलीवर स्वयंपाक करण्याची पध्दत होती व अजूनही काही ठिकाणी आहे. यासाठी जंगलातील, रानातील लाकूड-फाटा गोळा करुन किंवा वृक्षतोड करुन इंधनाची व्यवस्था केली जाते. यातून महिलांना धुरांचा खूप त्रास होवून अनेक आरोग्याबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांपासून महिलांची सुटका व्हावी. तसेच इंधनासाठी त्यांना वणवण भटकावे लागू नये यासाठी शासनाने यापूर्वीही अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा होऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 पासून सुरु केली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील पात्र कुटूंबाना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी घेतलेले तसेच, या योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभा...
Meritorious students felicitated : सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -NNL

Meritorious students felicitated : सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -NNL

करियर, नांदेड
नांदेड| भावसार समाज सिडको नांदेड ,युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन सिडको नविन नांदेड ,भावसार महिला मंडळ सिडको नविन नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षातील भावसार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश सितावार हे तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद सूत्रावे, शशिकांत ढवळे,प्रभारी कुल सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड, अनिरुद्ध दांडगे ,संजय घोगरे, प्रमोद टेहरे राजु लांडगे, राजेंद्र देवनिकर, संजय काचावार ,रामदास पेंडकर आदी मान्यवर व्यासपीठावर हे होते. यावेळी बालवाडी ते दहावी,बारावी ,पदवी , पदव्युत्तर पास , पाचवी व आठवी स्कॉलरशिप , एन. एम. एम. एस.,नवोदय , एन.टी. एस, व ईतर समकक्ष परीक्षा, सर्व व्यवसाय प्रशिक्षण,विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्...
Himayatnagar to Siranjani road : आयटीआय मार्गे हिमायतनगर ते सिरंजनी रस्त्याला नंबर देऊन मजबुतीकरण करा -NNL

Himayatnagar to Siranjani road : आयटीआय मार्गे हिमायतनगर ते सिरंजनी रस्त्याला नंबर देऊन मजबुतीकरण करा -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातून औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडून सिरंजनी बायपास अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या अंतर्गत रस्त्यावरून मानव विकास मिशनची बससेवा चालविणे जीवघेणे ठरत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे तात्काळ लक्ष देऊन ४५ वर्षांपासून खितपत पडलेल्या या रस्त्याला शासन नियमानुसार नंबर देऊन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून रहदारीची वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी सिरंजनी येथील बालिका पंचायत व सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विगाग व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना देण्यात आलेल्या निवेदनात बालिका पंचायतच्या विद्यार्थिनी व सरपंच सौ करेवाड यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर पळसपूर रोड व हिमायतनगर, सिरंजनी रोड यामधील जोडरस्ता हा सिरं...
Strict ban on use of plastic for national flag : राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन -NNL

Strict ban on use of plastic for national flag : राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा ...
Hoisting of the flag in Hujpa : हुजपामध्ये उपप्राचार्य लक्ष्मण डाके सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न – NNL

Hoisting of the flag in Hujpa : हुजपामध्ये उपप्राचार्य लक्ष्मण डाके सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न – NNL

नांदेड, करियर
हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळेत उपप्राचार्य लक्ष्मण डाके सर यांच्या शुभ हस्ते आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 07 वाजून 55 मिनिटांनी ध्वजारोहण संपन्न झाला. सदरील कार्यक्रम हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा उच्च माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस दोन दिवसावर येऊन ठेपला असून, हार घर तिरंगा अभियान सर्वत्र राबविला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा उच्च माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 12 रोजी शहरातून श्री परमेश्वर मंदिरापर्यंत रैली काढून हर घर तिरंगा अभियान राबविण्याचा संदेश देण्यात आला. त्याचं अनुषंगाने आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी उपप्राचार्य लक्ष्मण डाके सर यांच्या हस्ते सकाळी 07 वाजून 55 मिनिटांनी ध्वजारो...
error: Content is protected !!