Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे शोषण सत्तेच्या विरोधात होते -NNL

Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे शोषण सत्तेच्या विरोधात होते -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून प्रस्थापित धर्मसत्तेच्या विरोधात बंड पुकारले. आंबेडकरवाद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. समाजाची पुनर्रचना ही अण्णाभाऊंच्या साहित्याची अपेक्षा होती.‌ राजसत्ता हाती घेतल्याशिवाय दलितांची प्रगती होणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले होते. ते समाजातील विविध प्रकारच्या शोषण सत्तांच्याही विरोधात होते, असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी विचारवंत बाबुराव कोकरे यांनी केले. ते भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या (बीपीएसएस) वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. शहरातील शिवाजी नगरच्या हाॅटेल विसावा पॅलेस काॅन्फरन्स हाॅल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, बीपीएसएसचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप काठोडे, राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, सुप्रसिध्...
Shivajirao Jogdand : जिल्हाधिकारी यांनी केला शिवाजीराव जोगदंड यांचा सन्मान -NNL

Shivajirao Jogdand : जिल्हाधिकारी यांनी केला शिवाजीराव जोगदंड यांचा सन्मान -NNL

नांदेड, करियर
अर्धापूर| येथील नायब तहसीलदार शिवाजी बाळाजी जोगदंड यांचा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सन्मान केला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियतकालमर्यादेच्या आत लोकसेवा दिल्याबद्दल अर्धापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि प्रशसंनिय कार्याबद्दल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित्य सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची यावेळी उपस्थिती होती. अर्धापूर येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड यांचे अभिनंदन...
Nana Patole : तिरंगा देशाची शान, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले -NNL

Nana Patole : तिरंगा देशाची शान, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| हजारो शूरविरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला आणि देश संपन्न झाला. ७८ वर्ष हा तिरंगा डौलाना फडकत आहे पण आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी ख...
Acne secondary mineral theft from the roots of tambi : गौण खनिज चोरांकडून रात्री आणि सुट्टीच्या दिवशी पोखरला जातो टेंभीचा माळ -NNL

Acne secondary mineral theft from the roots of tambi : गौण खनिज चोरांकडून रात्री आणि सुट्टीच्या दिवशी पोखरला जातो टेंभीचा माळ -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| सामाजिक वनीकरण आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित व स्वार्थी कारभारामुळे हिमायतनगर टेभी रत्स्यावर असलेल्या पांडवकालीन अबाबकरच्या माळातून सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांची मोड - तोड करून जेसीबी मशीन व ४ ते ५ ट्रेकटर व टिप्परच्या सहाय्याने रात्रीला मुरुमाचे उत्खनन करून सुरु असलेल्या रस्ताकामावर टाकले जात आहे. या अवैद्य गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोंचत असून, इतिहासकालीन माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिमायतनगर शहरापासून दक्षिनेस असलेल्या टेभी, आंदेगाव, दरेसरसम, पवना रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासकालीन आबाबकरचा माळ आहे. सदर माळातुन पांडवकालीन युगात माहूर गडाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला होता असे जुन्या जाणकारातून सांगितले जाते. त्यामुळे या माळाला इतिहासकालीन महत्व असून, आजही अनेक जण या माळावर पूजा - अर्चना क...
Independence Day is celebrated : उस्माननगर परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

Independence Day is celebrated : उस्माननगर परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर| उस्माननगर व परिसरात मोठ्या उत्साहाने भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा ( अमृत महोत्सव) वर्धापन दिन विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी पोलीस स्टेशन येथे सपोनि चंद्रकांत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव बालमुकुंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी , कमलाकरराव देशपांडे, अरूण देशपांडे , प्रदीप देशमुख , आदी संस्थेचे संचालक मंडळासह मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड , पर्यवेक्षक राजीव आंबेकर , शिक्षकवृंद , प्राध्यापक वृंद , गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार उपस्थित होते. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवर मंडळी यांच्या...
Decorated with tricolor on dams : सजली धरणे, इमारती आणि घराघरावर तिरंगा -NNL

Decorated with tricolor on dams : सजली धरणे, इमारती आणि घराघरावर तिरंगा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या “हर घर तिरंगा” अभियानाला नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. शहराच्या छतावर तिरंग्याचे राज्य तर वाहने, इमारती, धरणे, प्रकल्प, सभागृह सगळ्यांच्या शिरपेचात तिरंग्याने गेली तीन दिवस आपले स्थान निश्चित केले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “हर घर तिरंगा अभियान” घराघरात मनामनात राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक घरावर या काळात तिरंगा अभिमानाने फडकत होता. ध्वजसंहितेमध्ये शिथिलता आणल्यानंतर अनेक घरांमध्ये, कार्यालयामध्ये तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सजावट करण्यात आली. 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य समारोहामध्ये प्रवेशद्वारावरील भव्य रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तर जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या 2 दिवसांपासून तिरंगी प्रकाशझोताने सजविण्यात आले होते. रात्री या...
I don’t know what the school : शाळा कसली असती हे माहीत नाही..लेखक…. राजीव तिडके -NNL

I don’t know what the school : शाळा कसली असती हे माहीत नाही..लेखक…. राजीव तिडके -NNL

नांदेड, लेख
शाळा कसली असती हे माहीत नाही....पेन वहीच्या तर आई वडिलांनाही कधी संबंध आला नाही... शिकलेल्या माणसाजवळ बसायचीही हिंमत (लायकी) नाही. असं स्वतःला समजणारी माणसे नंदीवाले समाजाची तेलगू भाषिक आहेत. आणि महादेवावर श्रध्दा ठेवणारी आहेत... परंतु इतर समाजाची लोक कधी रागावतील या भितीपोटी ती महादेवाच्या मंदिरातही कधी दिसली नाहीत. तर मग शाळेत तरी कसे दिसतील... चोरी चपाटी, गुंडगिरी अशा गोष्टींपासून कोसो दूर राहणाऱ्या वस्तीतील दोन बायका रस्त्यात पाणी पिऊन रिकाम्या बिसलेरी बाॅटल वेचत असताना त्यांची ही मुलगी दुर्गंधीयुक्त नालीजवळ गडबडा लोळत असतांना पाहिलो आणि थबकलो.. शाळेत जाते का? आम्हाला कशाची शाळा असते...? शाळेत आली तर ही पोलिस होऊ शकते. पण आम्हाला कोण शिकवणार शाळा? मी आहे की... कुठे रहाता? बालाजी मंदिराजवळ .... अजून कुणी लेकरं हाईत का शाळेत न जाणारी? हाईत की ८-९ तुमची शाळा कुठं हाय? त्या जु...
journalism award announced : महेंद्र गायकवाड यांना “तुफानातले दिवे” पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

journalism award announced : महेंद्र गायकवाड यांना “तुफानातले दिवे” पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून तुफानातले दिवे हा पत्रकारितेतील पुरस्कार पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार महेंद्र गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एकवीस वर्षांपासून महेंद्र गायकवाड यांचे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आयोजक संजय निवडंगे यांनी दिली आहे. बिलोली सारख्या ग्रामीण भागातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महेंद्र गायकवाड यांनी गेल्या एकवीस वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी त्यांचा लढा नेहमीच असतो.यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मान...
Prayers at temples and dargahs : खा. वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीसाठी मंदिर व दर्गाहात प्रार्थना -NNL

Prayers at temples and dargahs : खा. वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीसाठी मंदिर व दर्गाहात प्रार्थना -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान त्यांची तब्येत लवकरात लवकर ठिक व्हावी यासाठी काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे प्रभारी बापूसाहेब पाटील यांच्या वतीने, शहरातील बर्फी चौक येथील दर्गाह शरीफ हजरत यतीम शाह वली खादरी येथे चादर उडवून दुवा करण्यासह हडको येथील श्री दत्तमंदिर येथे बुधवार (ता.१४) रोजी विशेष पुजा आराधना करण्यात आली. मतदारसंघातील सततच्या कार्यमग्नतेमुळे खा. वसंतराव चव्हाण यांची मंगळवार (ता.१३) रोजी अचानक तब्येत बिघडली होती, यानंतर पुढील उपचारासाठी, त्यांना हैदराबाद येथे नेण्यात आले. दरम्यान खा. वसंतराव चव्हाण यांच्या उत्तम प्रकृतीसह दीर्घायुष्यासाठी काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे प्रभारी बापूसाहेब पाटील यांच्या वतीने, शहरातील बर्फी चौ...
Saptarang Cultural Festival : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात झाले उदघाट्न -NNL

Saptarang Cultural Festival : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात झाले उदघाट्न -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| सप्तरंग सेवाभावी संस्था, लयस्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ,जिल्हा प्रशासन नांदेड ,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्च्या उपस्थितीमध्ये उदघाट्न झाले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे कक्षाधिकारी मा. श्री प्रदीप जेठवा, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर सान्वी जेठवाणी व आजच्या स्पर्धेचे माननीय परीक्षक श्रीमती तमन्ना नायर श्री ऋषिकेश पोहनकर व श्री कुशल भट्टाचार्य यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे उद्घाटन करण्यात आले. पुढील दोन दिवस देखील दोन रंगमंचांवर दिवसभर हा भव्य महोत्सव सादर होणार आहे. या रंगमंचांना पंडित बिरजू महाराज रंगमंच व छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच असे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रंगमंचावरती पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील कन्याकोपऱ्यात...
error: Content is protected !!