Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्‍यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL

Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्‍यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL

नांदेड, कृषी, देश विदेश
नवी दिल्ली| शेतकर्‍यांच्या दैनंदिन कामात सुधारणा घडवून कृषी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जलवायु अनुकूल कृषि तंत्रांचे शेतकर्‍यांना समर्पक प्रशिक्षण दिले जाणे अत्यावश्यक असून त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत खा. डॉ.अजित गोपछडे यांनी सभागृहात मांडले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधनविषयक चर्चेत सहभाग घेताना खा.डॉ.अजित गोपछडे यांनी स्पष्ट केले की,आयसीएआरच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हितासाठी सरकारकडून घेतले जाणारे हे पाऊल, ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा निर्माण करेल आणि भारतीय कृषि क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यास मदत होईल. यावेळी खा.डॉ.गोपछडे यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी सांगितले की, भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधन प्रयत्नांना सुधारण्यासाठी ...
Soybean subsidy : सोयाबीन अनुदानसाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पहाणी करुन तात्काळ यादीमध्ये नोंद करा -NNL

Soybean subsidy : सोयाबीन अनुदानसाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पहाणी करुन तात्काळ यादीमध्ये नोंद करा -NNL

नांदेड, कृषी
नवीन नांदेड़ | नांदेड तालुक्यातील ,मौजे भायेगाव ता. जि. नांदेड येथील शेती ई पीक पहाणी करुन सुध्दा यादीत नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ईपिक पहाणी करण्याची मागणी भायेगाव सरपंच सौ.सविता बालाजी खोसडे यांनी नांदेड नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात २३ आगस्ट २३ या दिवशी ई पीक पहाणी केलेले आमच्याकडे फोटो प्रत असून सुध्दा वरील प्रमाणे पीकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषीत करत आहे. पुर्ण ई पीक पहाणी झाल्यानंतर पीकाची माहिती साठविली असून ती अपलोड सुध्दा झालेली आहे. इतके करुन सुध्दा आमच्या शेतातील ई पीकाची पेरा हा ७/१२ उत्ताऱ्यावर आजपावेतो आलेला नसून त्याचे ई पीक पहाणीच्या यादीमध्ये भायेगाव गावातील काही शेतकऱ्यांचे नाव सुध्दा ई पीक पहाणीच्या यादीमध्ये आमचे नाव आलेले नाही. सोयाबीन अनुदानासाठी आमची शासन स्तरावर दखल घेण्यात यावी,अशी मागण...
Shiva Mahapuran story : शिवमहापुराण कथेच्या मंडपात भाविकांनी ठोकला 48 तासांपुर्वीच मुक्काम -nnl

Shiva Mahapuran story : शिवमहापुराण कथेच्या मंडपात भाविकांनी ठोकला 48 तासांपुर्वीच मुक्काम -nnl

नांदेड, धार्मिक
नांदेड | पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या मंडपात 48 तासांपुर्वीच भाविकांनी मुख्य मंडपात मुक्काम ठोकला आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून भाविक आले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान, उत्तरप्रदेश येथून भाविक येतील, असे सांगण्यात आले. 23 ते 29 अॉगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी मैदान कौठा येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत आंतरराष्ट्रीय कथा वाचक, भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कथेला महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून भाविक येणार आहेत. सभास्थळी 50 बाय 100 फूट विशाल शाही मंडप उभारण्यात येत आहे. 375 बाय 800 फूट तीन वॉटर फ्रूप मंडप उभारण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन 5 हजार स्वंयसेवक नियुक्त केले आहेत. पंडित प्रदीप मिश्रा यांचे देशासह 156 देशात अनुयायी आहेत. नांदेडसह महाराष्ट्रात मोठ्या संख्येने अनुयाय...
Atul Deshmukh met the Chief Minister : सोलार तज्ञ अतुल देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

Atul Deshmukh met the Chief Minister : सोलार तज्ञ अतुल देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शहरातील सोलार क्षेत्रातील अव्वल वितरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोही सोलारचे संचालक श्री अतुल देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर दि.१८ ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट घेतली व सोलर संदर्भातल्या .विविध विषयावर चर्चा केली यावेळी त्यांनी सोलार वितरकांच्या तांत्रिक अडचणींकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. आरोही सोलार ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील सात वर्षापासून सर्वात उत्कृष्ट पद्धतीने सोलार प्रोजेक्ट कम्पलेट करणारी एकमेव एजन्सी आहे आणि मराठवाड्यातील पहिली सोलर मेंटनस एजन्सी आहे ज्याठिकाणी सोलार ग्राहकांना अनेक अडचणीवर त्वरीत तत्परतेने सेवा दिली जाते व त्याबरोबरच सोलार संदर्भातील विविध समस्यांवर तातडीने निराकारण केले जाते. आरोही सोलर एजन्सीचा सोलार क्षेत्रामध्ये सक्सेस रेट शत प्रतिशत असून लुम सोलार या भारतातील सर्वात मोठ्या सोलार कंपनीचे सोलार अ...
Vinayak Patil Shinde : विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांची विधानसभेसाठी मागणी – NNL

Vinayak Patil Shinde : विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांची विधानसभेसाठी मागणी – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/नायगांव l आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, राज्याचे माजी मंत्री आ. राजेश टोपे यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात नुकतीच भेट घेऊन नायगांव विधानसभा मतदार संघातून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्ष श्रेष्ठींकडे निवडणुक उमेदवारींसाठी अर्ज सादर केला . नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कलचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा हुस्सा येथील रहिवासी विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी नायगाव तालुक्यातून २००७ मध्ये कॉंग्रेस कडून जि.प.लढवली तसेच २००५ ते २०१० या कालावधीत नायगाव तालुका सरपंच संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत ह...
P. Pu. Child Yogi Venkatesh Maharaj : नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते – प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज – NNL -NNL

P. Pu. Child Yogi Venkatesh Maharaj : नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते – प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज – NNL -NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| कलियुगात संसाररूपी मायेच्या विषामुळे मनुष्य जीवन जखडलं गेलं आहे. हे विषारी वलय बाहेर काढून फेकायचं असेल आणि मानसिक समाधान मिळवायचं असले तर "ओम नमः शिवाय" नामाचा अथवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका भगवंताच्या नामाचा जाप करणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी प्रत्येक मनुष्याने नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते. असे अमृतमय विचाराचा संदेश श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थांन पिंपळगावचे मठाधिपती प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांनी उपस्थित भाविक भक्तांना दिला. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांच्या सूचनेवरून पवित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून "ओम नमः शिवाय" नामजप यज्ञाला सुरुवात झाली आहे. यज्ञाच्या सोळाव्या दिवशी म्हणजे दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी अचानक स्वामीजींनी भेट दिल्यानंतर उपस्थित भाविकांना...
मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 26 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन  – NNL

मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 26 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये चालू खरीप हंगामामध्ये निविष्ठा 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. यासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदतवाढ देण्यात आली आहे.  शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in - farmer login या वेबसाईटवर 26 ऑगस...
Mahatma Jyotirao Phule Farmers Grant ; महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी अनुदान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी – NNL

Mahatma Jyotirao Phule Farmers Grant ; महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी अनुदान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 योजनेअंतर्गत 33 हजार 602 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 75 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) केले नाही. त्यामुळे सदर शेतकरी अद्याप शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 892 तर एचडीएफसी बँकेचे 39 कर्जदार शेतकरी समाविष्ट आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 या योजनेचे ऑनलाईन पोर्टल ऑगस्ट अखेरपर्यंत चालु असुन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. तरी आधार प्रमाणीकरण (ई केवायसी) न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन...
Nana Patole ; बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’: नाना पटोले – NNL

Nana Patole ; बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर च...
Distribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप – NNL

Distribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप – NNL

करियर, नांदेड
नांदेड| येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष उत्तम कुंटूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी कै. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या ४० व्या स्मृतीदिनानिमित्त कर्मशाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. नांदेड येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत दिव्यांगांना विविध व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येवून दिव्यांगांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणवेश व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रमेश मस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी खंडागळे, वाडेकर,बिजमवार, पेंडलवार, गोदगे,कलीम, इरफान अली, सौ. भुरेवार, श्रीमती वाघमारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच...
error: Content is protected !!