Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Nagnath Aylan ; नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने – NNL

Nagnath Aylan ; नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने – NNL

Blog, सोशल वर्क
नवीन नांदेड| नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी नवीन नांदेड़ सिडको येथील महावीर चौक परिसरातील नटराज गणेश मंदिर येथे शांतता समिती बैठकीत केले. सिडको परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता रमाई आंबेडकर चौकात झालेल्या आईस्क्रीम विक्रेता यांच्या वर व हडको भागात झालेला दुध विक्रेत्यांवर तलवार हल्ला,या घटनेने परिसरात भयभीत वातावरण झाले होते,तात्काळ ग्रामीण पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन माळाकौठा परिसरात हवेत गोळीबार करून तिन आरोपींना तलवारी व चार चाकी वाहनांसह ताब्यात घेतले . घटनेचा अनुषंगाने 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी नटराज गणेश मंदिर सिडको परिसरात शांतता समीती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी नागरिक याना मार्गदर्शन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे,गुन्हेगाराचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी...
Honored with Banswate  ; सिडको ऊपडाकघर येथील बंसवते ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित – NNL

Honored with Banswate ; सिडको ऊपडाकघर येथील बंसवते ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित – NNL

Blog, करियर, नांदेड
नवीन नांदेड| सिडको ऊपडाकघर येथील ब्रॅच पोस्ट मास्टर तुप्पा येथील सुनिल बंसवते यांच्या छत्रपती संभाजी नगर येथे ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने १५ आगस्ट रोजी जनरल पोस्ट मास्टर अदनान अहमद यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्य पोस्ट कार्यालय नांदेड डाक घर अंतर्गत २१ ऊत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली होती यात सिडको ऊपडाकघर अंतर्गत असलेले तुप्पा येथील ब्रॅच पोस्ट मास्टर सुनिल बसवंते यांच्यी निवड करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे १५ आगस्ट रोजी ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्या बदल सिडको डाकघर शिवाजीराव हंबर्डे,डि.बी. नागरगोजे, कर्मचारी नागेश वाघमारे, विशाल पारडे, ऋषीकेश शिंदे, बापुसाहेब येलमेकर, बालाजी नाईके,व्यंकट भोसले, साईनाथ पांचाळ, सय्यद रऊफ यांनी अभिनंदन केले ...
MLA Mohanrao Hambarde ; नांदेड दक्षिण मतदार संघातील लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अनुदान द्या – NNL

MLA Mohanrao Hambarde ; नांदेड दक्षिण मतदार संघातील लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अनुदान द्या – NNL

Blog, कृषी, नांदेड
नांदेड| कापुस आणि सोयाबिन पिकासाठी सन २०२३ च्या खरीप हंगामातील मिळणारे पीक विमा अनुदान नांदेड दक्षिण मतदार संघातील वंचित लाभार्थी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आ. हंबर्डे यांनी या निवेदनात नमूद केले आहे की राज्य शासनाकडून सन २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबिन आणि कापुस पिक घेणा-या शेतक-यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्यात येत आहे. यासाठी कृषी सहाय्यकांमार्फत संबंधित पिकांचा पिक पेरा असलेल्या शेतक- यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु माझ्या मतदार संघातील अनेक गावांमध्ये ज्या शेतक- यांनी मागील सन २०२३ च्या खरीप हंगामातील पीक सोयाबिन व कापुस हे पिक घेतले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे शेतक-यांना ई-पिक पाहाणी करण्यात व्यत्यय आला असल्यामुळे त्यांची लाभा...
Bhavsar society – भावसार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न – NNL

Bhavsar society – भावसार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न – NNL

Blog, करियर, नांदेड
नांदेड | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करून यात गुणवंत विद्यार्थ्यांचा व कन्यारत्न प्राप्त मातापित्यांचा सत्कार सोहळा भाऊसाहेब रंगार गल्ली नांदेड येथील विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतिरीक्त उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.लक्ष्मीकांत पेंडकर (बालरोगतज्ञ), नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणी अध्यक्ष गंगाधरराव बडवणे, कार्याध्यक्ष गिरीश बुलबुले, सचिव सुरेश गोजे, भावसार समाज प्रगती महिला मंडळ अध्यक्षा विनाताई माळवतकर, विश्वस्त गोविंदराव मेहेत्रे व्यासपीठावर उपस्थित होते . नांदेड जिल्ह्यातील भावसार समाजातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील दहावी बारावी पदव्युत्तर व पदवी पदविका तसेच सीईटी नीट जेईई व तत्सम शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या व समाजातील कन्यारत्न प्राप्त झाले...
Talathi B. T. Shelke – निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! – NNL

Talathi B. T. Shelke – निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड | संजय गांधी निराधार योजनेच्या शहरी विभागात वशिलेबाजीने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले तलाठी बी.टी.शेळके यांची हकालपट्टी करा आणि मौजे सोमेश्वर ता.जि.नांदेड येथील दलित पीडितांना घरकुल मंजूर करा ह्या मागणीसाठी सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे सह सचिव कॉ.जयराज गायकवाड हे मागील तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत. प्रशासनात जबरदस्त छाप निर्माण करून वशिलेबाजीने अनेक वर्षांपासून संगायो मध्ये तलाठी या पदावर कार्यरत असलेले बी.टी.शेळके हे आर्थिक माया मिळविल्याशिवाय निराधारांना पात्र ठरवीत नाहीत. किंबहुना कुणाच्याही घरी प्रत्यक्षात जात नाहीत आणि पात्र मान्यता देतात. त्यांच्या विरोधात माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दि.१४ मे आणि ११ जून २०२४ रोजी दोन वेगवेगळ्या लेखी तक्रारी देऊन त्यांची बदली माहूर किंवा किनवट येथे करण्याची मागणी केली होती....
धम्मचळवळीत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महत्वपूर्ण – पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचे प्रतिपादन  -NNL

धम्मचळवळीत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महत्वपूर्ण – पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचे प्रतिपादन -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात श्रामणेरांच्या दीक्षाभूमीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर कार्य होत आहे. धम्मचळवळीत हे केंद्र मैलाचा दगड ठरले असून या परिसरात उपासक उपासिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो आणि भिक्खू संघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात श्रावण पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, भोजनदान आदी कार्...
प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत नल जल मित्र; प्रकल्‍प संचालक नारायण मिसाळ यांची माहिती -NNL

प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत नल जल मित्र; प्रकल्‍प संचालक नारायण मिसाळ यांची माहिती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक पातळीवर जल मित्रांची निवड सर्व ग्रामपंचायतींनी करण्याचे आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील तीन कौशल्यांवर आधारित प्लंबर/गवंडी, मेकॅनिक/फिटर, इलेक्ट्रिशन/पंप ऑपरेटर प्रति 3 कौशल्‍य व्‍यक्‍ती याप्रमाणे एकूण 9 व्यक्तींची निवड करावी. निवड झालेल्या व्यक्तींना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे ते पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीत सक्षम होतील. यासाठी ग्रामपंचायतीने 9 उमेदवारांचे नामनिर्देशन करावे, ज्यांमधून तीन कुशल व्यक्तींची अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या 9 उमेदवार ग्रामपंचायतीच्‍या ठरावासह गट विकास विकास अधिकारी यांच्‍या मार्फत उमेदवाराचे आधार कार्ड नंबर, मोबईल नंबर,...
come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी इस्लापूर परिसरात विकासात्मक कामाचा झपाटा लावला असून तब्बल एक कोटी 75 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी इस्लापूर या ठिकाणी देण्यात आली. त्यामध्ये समाज मंदिर रस्ते असे विविध कामे आमदार निधी व इतर योजनेच्या माध्यमातून टाकण्यात आली. विशेषतः गेल्या 35 ते 40 वर्षापासून ग्रामस्थांकडून सातत्याने जिल्हा परिषद शाळेकडे गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या मागणी पाठपुरावा केला होता पण अद्याप पर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने या बाबतीत लक्ष केंद्रित केले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य रस्ता सोडला तर कुठल्याही रस्त्याने शाळेला जाता येत नव्हते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर सारखी वर्दळ असायची त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले होते. सदरील कामावर प्रत्यक्ष जाऊन आमदाराने जातीने लक्ष वेधून या कामाची पाहणी केली. या रस्त्याव...
शरद सोनटक्के यांच्या तत्परतेने मनोरुग्ण महिलेची रुग्णालयात तर तिच्या बाळाला केले शिशुगृहात दाखल -NNL

शरद सोनटक्के यांच्या तत्परतेने मनोरुग्ण महिलेची रुग्णालयात तर तिच्या बाळाला केले शिशुगृहात दाखल -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे| शहरातील डॉक्टर लाईन भागामध्ये सार्वजनिक रस्त्यावर एक मनोरुग्ण महिला गोंधळ घालून तिच्याकडील एका लहान बाळाला मारहाण करत असल्याची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस कर्मचारी शरद सोनटक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे जाऊन सदर महिलेस ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात तर तिच्या बाळाला शिशुगृहात दाखल केले आहे. सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त शहरात आज सर्वत्र महिलांचा पवित्र सण असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू होती. यातच डॉक्टर लाईन भागात एक महिला गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना सांगण्यात आली. त्यांनी लगलीच कर्तव्यावर दक्ष असलेल्या पोलीस कर्मचारी शरद सोनटक्के यांना व महिला कर्मचाऱ्यांना तिथे पाठवले. पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आ...
Bhagyashree Jadhav honored as Indian flag bearer : पॅरिस येथील पॅरालिंम्पिक स्पर्धेत भाग्यश्री जाधवला भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान -NNL

Bhagyashree Jadhav honored as Indian flag bearer : पॅरिस येथील पॅरालिंम्पिक स्पर्धेत भाग्यश्री जाधवला भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| पॅरिस येथे २८ ऑगस्ट २०२४ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या पॅरालिंम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री जाधव व हरियाणाचा खेळाडू सुमित अंतिल यांना मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिने जपान मधील कोबे येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदक पटकावले. त्यामुळे तिची निवड पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाकडून ३२ महिलांसह एकूण ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत ध्वजवाहकाचा मान हा अत्यंत महत्त्वाचा सन्मान समजल्या जातो. यंदाचा हा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्राची लेक तथा अष्टपैलू आंतराष्ट्रीय दिव्यांग खेळ...
error: Content is protected !!