Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Maha Aarti, thousands of devotees thronged the story site : कथास्थळी महाआरती, कथेच्या आशेपोटी हजारो भाविकांनी केली गर्दी -NNL

Maha Aarti, thousands of devotees thronged the story site : कथास्थळी महाआरती, कथेच्या आशेपोटी हजारो भाविकांनी केली गर्दी -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवमहापुराण कथास्थळी पाणीच पाणी साचल्यामुळे शनिवार दि.24 ऑगस्ट रोजीचे कथावाचन रद्द करण्यात आल्यानंतरही मोदी मैदानावर कथा होईल, या आशेने शिवभक्तीत तल्लीन झालेले हजारो भाविक पाण्याची, चिखलाची पर्वा न करता ठाण मांडून बसले होते. काहीही झाले तरी जागा सोडायची नाही या निर्धाराने बसलेल्या भाविकांना अखेर पंडित प्रदीपजी मिश्रा यांनाच व्यायपीठावर येवून मंडप खाली करण्याचे आवाहन करावे लागले. महाआरती करून आजची कथा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. शुक्रवारी रात्री अचानक वादळी-वार्‍यासह मुसळधार पावसाने नांदेड शहर व परिसराला अक्षरशः झोपडून काढले. शिवमहापुराण कथेचा शुक्रवारचा पहिला दिवस असल्याने भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळाली. कथेच्या समाप्तीनंतर पावासला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कथास्थळी सर्वत्र पाणीच पाणी साचले. बाहेर गा...
Annabhau Sathe: शिक्षणाने माणूस तर अण्णाभाऊंच्या साहित्याने समाज घडला – प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड -NNL

Annabhau Sathe: शिक्षणाने माणूस तर अण्णाभाऊंच्या साहित्याने समाज घडला – प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर| शिक्षणाने माणूस घडतो , आणि साहित्याने समाज घडतो. तर साहीत्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य लेखनीने सुसंस्कृत समाज घडला असे मत प्रा.डॉ.वैजनाथ अनमुलवाड (. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा शास्त्र विभाग) यांनी आपले मनोगतातून व्यक्त केले. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे दि .२२ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न ,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी छ.शिवाजीमहाराज, क्रांतीविर उस्ताद लहूजी साळवे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर क्रांतीध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार निल्लप्पा शिवपुजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जयंती मंडळाकडून मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथ...
Grand Kavad Yatra organized : मुखेड येथे दि. 26 रोजी श्रावण सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन -NNL

Grand Kavad Yatra organized : मुखेड येथे दि. 26 रोजी श्रावण सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
मुखेड/नांदेड| मुखेड शहरात श्री विरभद्र मंदीर पासुन ते श्रावण कावडी पर्यंत दि. 26 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 7 वाजता भव्य कावड यात्रेचे आयोजन श्रावणकावडी देवस्थान व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. ही कावड यात्रा मुखेडचे नगरीचे कुलदैवत श्री विरभद्र मंदीर पासुन सकाळी 7 वाजता सुरु होणार असुन शहरातील विविध भागातून ही कावड यात्रा जाणार आहे. शहरापासुन जवळच असलेल्या ऐतिहासिक रामायणकालीन श्रावणकावडी देवस्थान येथे या कावड यात्रेचा समारोप होणार आहे. तत्पुर्वी श्रावण चलम्यातील जल घेऊन श्रावण कावडी येथील महादेवास जलाभिषेक भक्तांच्या कावडने होणार आहे. श्रावण कावडी येथे मागील एक वर्षापासुन लोकहभागातून श्रावणबाळ व त्यांच्या आई वडीलाच्या मंदीराचे जिर्णोध्दार होत असुन मंदीराचा खुप कायापालट झालेला आहे. श्रावणबाळ,त्यांचे आई वडील, संत गाडगेबाबा व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाक...
MLA Mohanrao Hambarde ; शिवपुराण कथास्थळी अडकलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आमदार मोहनराव हंबर्डे धावले – NNL

MLA Mohanrao Hambarde ; शिवपुराण कथास्थळी अडकलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आमदार मोहनराव हंबर्डे धावले – NNL

Blog, राजकीय
नांदेड| शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड कौठा भागात सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथा श्रवणासाठी बाहेर गावाहून आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कथास्थळी घाव घेऊन तेथे अडकलेल्या हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलविले. शुक्रवारी शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस होता. कथा संपतात शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मोदी मैदान येथील कथा मंडपात पाणीच पाणी साचले होते. बाहेर गावाहून आलेल्या व तिथे आश्रय घेतलेल्या भाविकांना रात्र कशी काढावी या चिंतेने ग्रासले होते. योग्य नियोजनाभावी महाशिवपुराण कथास्थळी मंडपात गुडघाभर पाणी साचले. होते. मंडपात बाहेर गावांतील हजारो भक्त मंडळी मुक्कामी थांबले होते. ही बाब समजतातनांदेड दक्षिणचे धडाडीचे आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे यांन...
Mukband protest ; शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेधार्थ तोडांला काळया फिती लावून मुकबंद आंदोलन – NNL

Mukband protest ; शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेधार्थ तोडांला काळया फिती लावून मुकबंद आंदोलन – NNL

Blog, राजकीय
नवीन नांदेड| बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार निषेधार्थ व घटनेतील आरोपींना तात्काळ कठोर कारवाई करावी यासाठी शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी तोडांला काळी फित लावून मुकबंद आंदोलन केले. महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार निषेधार्थ राज्यभर आंदोलन आज दिनांक २४ आगस्ट रोजी शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने सिडको शिवसेना शहर प्रमुख अजितसिंग ऊर्फ जितुंसिग टाक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण समन्वयक दिलीप भागिले,भारतीय कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख ब्रिजलाल ऊगवे,जिल्हा ऊपप्रुमुख व्यंकोबा येडे, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे,माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिकंलवाड, माजी नगरसेवक शाम जाधव. महिला संघटक निकिता शहापुरवाड ,कृष्णा पांचाळ, दिपक देशपांडे, संतोष खैरे,...
municipal administration  ; मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेत कथा मंडपात साचलेले पाणी जेसीबी चा सहायाने केला निपटारा, भक्तांना सुरक्षित स्थळी हालवले – NNL

municipal administration ; मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेत कथा मंडपात साचलेले पाणी जेसीबी चा सहायाने केला निपटारा, भक्तांना सुरक्षित स्थळी हालवले – NNL

Blog, महाराष्ट्र
नवीन नांदेड| नवीन कौठा भागात सुरू असलेल्या प्रदिप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिव पुराणकथेचा पहिल्या दिवशी कथा संपल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने मंडपात चोहोबाजूंनी साचलेल्या पाण्याचा प्रवाह तात्काळ मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु यांनी तात्काळ मनपा बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे व कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांनी सात ते आठ जेसीबी साहायाने चारही बाजुने मोठ्या प्रमाणात नाली खोदून पाण्याचा प्रवाह बाहेर काढला तर स्वच्छता विभाग साफ सफाई महिला पुरुष कर्मचारी यांच्या सह मनपा प्रशासनाने साफ सफाई करून पाण्याचा निपटारा व चिखल भागातून अनेक भाविक भक्तांची सुटका केली. २३ ते २९ आगस्ट दरम्यान नवीन नांदेड भागातील मोदी मैदान येथे शिव पुराण कथेचे आयोजन दि...
Venkatesh Chaudhary ; व्यंकटेश चौधरी यांचे विक्रमी रक्तदान : २८ वर्षात केले तब्बल ५४ वेळा रक्तदान – NNL

Venkatesh Chaudhary ; व्यंकटेश चौधरी यांचे विक्रमी रक्तदान : २८ वर्षात केले तब्बल ५४ वेळा रक्तदान – NNL

Blog, सोशल वर्क
नांदेड | येथील प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आजवर ५३ वेळा रक्तदान केले आहे. २५ ऑगस्ट रोजी ते वयाच्या ५८व्या वर्षात पदार्पण करत असून जन्मदिवसाच्या निमित्ताने ते विक्रमी म्हणजे ५४ वे रक्तदान करणार आहेत. काही माणसांना दानाचं वेड असतं म्हणतात. इतरांच्या जीवनामध्ये उजेड पेरणं हा अशा अवलियाचा छंदच असतो जणू. १९९६ साली त्यांनी पहिल्यांदा मित्राच्या मुलीसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये रक्तदान केले होते. तिथून त्यांची रक्तदानाची चळवळ सुरू झाली. पहिले दहा अकरा वर्षे त्यांनी वर्षातून चार वेळा रक्तदान केले. मग त्यासाठी त्यांना कोणताही मुहूर्त नसायचा. स्वतःचा वाढदिवस, लेकरांचा वाढदिवस, मित्रांचा वाढदिवस, देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, थोर नेत्यांचे जन्मदिवस इतकेच नाही तर तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर रस्त्यात कुठे रक्तदान शिबिर दिसले की तिथेही त्यांनी रक...
Ravneet Singh’s  ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा – NNL

Ravneet Singh’s ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | केंद्रीय रेल्‍वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 25 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. गुरूद्वारा साहिब नांदेड येथे भेट. दुपारी 12 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे विशेष रेल्वेला झेंडी दाखवतील. दुपारी 2 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. येथील विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. सायं. 5.40 वा. नांदेड येथून विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील....
Gram Gita ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे केले स्वागत – NNL

Gram Gita ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे केले स्वागत – NNL

धार्मिक
नांदेड | केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दिल्ली येथून आगमन झाले होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले. स्वागतानंतर ही ग्रामगिता मी वाचणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती....
create attractive litter boxes from waste materials : शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून निर्माण केल्या आकर्षक कचरा पेट्या -NNL

create attractive litter boxes from waste materials : शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून निर्माण केल्या आकर्षक कचरा पेट्या -NNL

नांदेड, करियर
नांदेड| मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कचरा पेट्या तयार करून एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना बालवयातच ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व समजावून देणे हा होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील उपलब्ध टाकाऊ वस्तूंपासून दोन कचरापेट्या तयार केल्या. एकात ओला कचरा तर दुसऱ्यात सुका कचरा टाकण्यासाठी या पेट्या वापरण्यात येणार आहेत. शाळेच्या आवारात या कचरापेट्यांची प्रदर्शनी भरवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कचरा पेट्या केवळ शाळेपुरत्या मर्यादित न राहता त्यांनी आपल्या घरांमध्ये आणि परिसरातही या पेट्यांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनीही ओला आणि...
error: Content is protected !!