Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Administration’s struggle for Mahashivpuran : महाशिवपुराण‌’साठी प्रशासनाचे जीवाचे रान -NNL

Administration’s struggle for Mahashivpuran : महाशिवपुराण‌’साठी प्रशासनाचे जीवाचे रान -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| येथील कौठा परिसरातील मोदी ग्राऊंडवर आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा सोहळ्यात शुक्रवारच्या अतिवृष्टीमुळे मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. मैदानावर पाणी आणि चिखल साचल्यामुळे महाशिवपुराण कथा ऑनलाईन सुरू झाली आहे. मात्र हे मैदान पूर्ववत करून हा कथा सोहळा पुन्हा नियोजित कार्यक्रमस्थळीच सुरू करण्यासाठी प्रशासनानी जीवाचे रान केले आहे. हे कार्यक्रमस्थळ पूर्ववत करण्यासाठी कंबर कसण्यात आली असून निसर्गाने साथ दिल्यास लवकरच पंडित प्रदीप मिश्रा हे लाखो भाविकांच्या साक्षीने महादेव कथेचे वाचन करताना दिसून येतील अशी अपेक्षा आहे. महाशिवपुराण सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अथक प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यआयोजक डॉ. शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार, काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार, संजय कऱ्हाळे ,पिंकू पोकर्णा,संतोष पांडागळे,बालाजी पांडा...
समाजात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य नांदू द्या… NNL

समाजात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य नांदू द्या… NNL

नांदेड, लेख
बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रातील तमाम जनतेचे विशेषतः महिला व मुलींचे मन सुन्न करून टाकले आहे. पोलिसांचा समाजावर असलेला वचक दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित खटल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे सर्वसामान्य जनता पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्था या दोन्हीच्या बाबतीत वारंवार अविश्वास दाखवत असते. तरीही बदलापूरच्या घटनेत न्यायालयाने पोलीस प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले. सद रक्षणायः खलनिग्रहणायः या ब्रीदवाक्याची आठवण करून द्यायची वेळ आली आहे, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलीस प्रशासन आपल्या कामात कुठेतरी कमी पडत आहे, याची जाणीव सर्वांनाच झालेली आहे. उच्च न्यायालय पोलीसांवर ताशेरे ओढत आहे, ही नवी बाब नाही तरी परंतु वारंवार पोलिसांना जागे करावे लागते ही वेळ न्यायालयावर किंवा राज्य शासनावर का येते ? याचा विचार प...
Tirthadarshan Yojana camp ; ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची नांदेड येथे मोठ्या थाटात सुरूवात! – NNL

Tirthadarshan Yojana camp ; ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची नांदेड येथे मोठ्या थाटात सुरूवात! – NNL

लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड मध्ये आज वैद्य रूग्णालय परिसरात मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची मोठ्या थाटा माटात सुरूवात झाली. .नांदेड जिल्हा विधी प्राधिकरणाच्या न्यायमूर्ती मा.दलजितजी कौर जज यांच्या शूभ हस्ते दीप प्रज्वलनाने तथा भारत मातेच्या प्रतिमेस पुष्प माल्यार्पणाने, फेस्काॅमचे मराठवाडा उत्तर प्रादेशिक विभागाध्यक्ष मा.अशोकजी तेरकर यांच्या अध्यक्षतेखाली, नांदेड समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाचे व फेस्काॅम उत्तरविभागाचे निर्माते (संस्थापकाध्यक्ष) मा. सुभाष रावजी बार्‍हाळे व सौ.निर्मलाताई बार्‍हाळे,सर्व श्री माधवराव पवार,जयवंत सोमावाड, रामचंद्रजी कोटलवार,डाॅ.लक्ष्मी पुरण शेट्टीवार,डाॅ.पुष्पा कोकीळ,श्रीमति चौधरी, देगावकर, शिंदे, जिंतूरकर इ. च्या प्रमुख उपस्थितित आणि मोठ्या संख्येनी जमलेल्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या साक्ष...
Badlapur school sexual assault incident protested ; बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार घटनेचा महाविकास आघाडीकडून नांदेडमध्ये निषेध – NNL

Badlapur school sexual assault incident protested ; बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार घटनेचा महाविकास आघाडीकडून नांदेडमध्ये निषेध – NNL

महाराष्ट्र, नांदेड
नांदेड | बदलापूर शाळेमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील व इतर मुलीं व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत आरोपीला त्वरित कार्यवाही करून फाशी देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडी नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि. 24 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मागणी केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बदलापूर व इतर ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील काँग्रेस कार्यालय आणि आयटीआय महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर या घटनेचा हाताला काळ्या रिबीन बांधून तीव्र निषेध नोंदवला. तसेच रेल्वेस्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून या घटनेत न्याय मिळावा, अशी मागणी केली. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून बदलापू...
09 accused gambling in City Symphony Hotel : सिटी सिन्फनी हॉटेलमध्ये जुगार खेळणारे 09 आरोपी विरुध्द कार्यवाही 1 लक्ष 14 हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

09 accused gambling in City Symphony Hotel : सिटी सिन्फनी हॉटेलमध्ये जुगार खेळणारे 09 आरोपी विरुध्द कार्यवाही 1 लक्ष 14 हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| नांदेड शहरातील प्रसिद्ध सिटी सिन्फनी या हॉटेल मध्ये जुगार सुरु असताना विमानतळ पोलिसांनी छापा टाकून 9 जुगाऱ्यासह एकुण 1,14,470/- रुपयाचा मुद्देमाल जुंगराचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. विमानतळ पोलीस नांदेड यांनी केलेल्या या धमाकेदार कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून, हायप्रोफाईल जुगारावर उत्कृष्ठ कार्यवाही केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलिसांचे अभनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरात अवैद्य धंदयावर कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमातळ नांदेड येथील प्रभारी पोलीस अधिकारी गणेश चव्हाण हे गुन्हे शोध पथकातील पो.उप. निरीक्षक साने, पोहेकॉ/ 2166 राठोड, पोहेकॉ / 2403 पठाण, पोकॉ/555 माने, पो.कॉ /480 स्वामी, पो.कॉ/ 774 सुखई, पो.कॉ 3097 शोएब, चालक पो.उप. निरी. भोसीकर, चालक प...
Baswantrao Mundkar : स्वातंत्र्य चळवळीतले “बाप” माणूस- बसवंतराव मुंडकर -NNL

Baswantrao Mundkar : स्वातंत्र्य चळवळीतले “बाप” माणूस- बसवंतराव मुंडकर -NNL

नांदेड, लेख
स्वतःसाठीच तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी ही जगता आलं पाहिजे... आपलंही आयुष्य देश सेवेसाठी परमेश्वराकडे मागता आलं पाहिजे... आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून आपल्या देशासाठी आहे आणि या देहाचा वापर सत्कार्यासाठी लागावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन गोवा मुक्ती संग्रामात धाडसाने झोकून देऊन गोवा मुक्तीसाठी झटलेले स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना त्यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक उपेक्षित स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण व्हावे हा या लेखणाचा शुद्ध हेतू..... भारत स्वतंत्र झाला मात्र गोवा हा पोर्तुगीज यांच्या ताब्यात होता. तेथील हिंदू वरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक ठिकाणी हत्याकांड,जबरदस्ती धर्मांतर या बाबीमुळे अनेकांच्या मनात असंतोष निर्माण केलेले होते . समता, बंधुता आणि न्याय भूमिका अंगी कारणारे तसेच सर्वांसाठी स्वात...
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणी -NNL

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। बदलापूर व महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी बालिका व महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत व गृह मंत्रालय अशा घटनाना आळा घालण्यात व राज्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरल्याने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करा व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे काळ्याफिती लावून जिजामाता चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. बदलापूर व महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी बालिका व महिलांवर लैंगिक अत्याचार च्या घटना झाल्या असून सदर प्रकरणात गृह मंत्रालयाची भूमिका ही संशयास्पद दिसून येत आहे. ज्यामुळे राज्यात अराजक निर्माण झाले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संशयास्पद भूमिका याबाबीस जबाबदार आहेंत. सदर प्रकाराने किनवट तालुक्...
प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियमानुसार नियुक्ती करावी – संध्याताई राठोड यांची सीईओ कडे तक्रार -NNL

प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियमानुसार नियुक्ती करावी – संध्याताई राठोड यांची सीईओ कडे तक्रार -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। 31 ऑगस्ट 2024 रोजी किनवटचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी बने सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा जेष्ठ च्या नियमाला डावलून जिल्हा परिषद प्रशासन घोडेबाजार करून नियुक्ती देण्याच्या विचारात असून सेवा जेष्ठतेच्या नियमानुसारच प्रभारी गटशिक्षणाधिकारी पद, तसेच पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढावा अशी मागणी संध्या राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. किनवट आदिवासी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बने हे 31 ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहे. अशा स्थितीत किनवट तालुक्यात एकूण आठ शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असून त्यांच्या सेवा जेष्ठतेच्या यादीनुसार सहाव्या क्रमांकावर असलेल्या विस्तार अधिकारी यांची किनवट गट प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियमबाह्य नियुक्ती देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडून ...
अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळेतर्फे आ. अमित गोरखे यांचे सिडको परीसरात भव्य स्वागत -NNL

अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळेतर्फे आ. अमित गोरखे यांचे सिडको परीसरात भव्य स्वागत -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड। भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे यांचा वतीने सिडको परिसरात प्रथमच आगमन निमित्ताने भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सतिश बस्वदे यांच्या संपर्क कार्यालय येथे भाजपा जिल्हा अनुसूचित जमातीचे मोर्चा अध्यक्ष नवनाथ कांबळे यांचा हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला तर डॉ. हेडगेवार नामफलक ऊध्दघाटन व जेसीबीव्दारे भव्य सत्कार सोहळा करण्यात आला. भाजपा विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे हे नियुक्ती नंतर प्रथमच नांदेड शहर व सिडको येथे आगमन झाले होते, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे व मित्र मंडळ समाज बांधव यांच्या हस्ते जेसीबी साह्याने भव्य दिव्य सत्कार व ढोलताशांच्या गजरात,फटक्याचा आतिषबाजी ने स्वागत करण्यात आले तर सिडको येथील भाजपाचे युवा नेते सतिश बस्वदे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भाजपा जिल्...
Great response to Mahavikas Aghadi movement : भोकर येथील महाविकास आघाडीच्या आंदोलनास उत्तम प्रतिसाद -NNL

Great response to Mahavikas Aghadi movement : भोकर येथील महाविकास आघाडीच्या आंदोलनास उत्तम प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| भोकर तालुका महाविकास आघाडी कडून कोलकत्ता आणि बदलापूर येथील झालेल्या अन्याय,बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी निषेध दर्शविण्यासाठी शनिवार दि.२४/ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यात तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारीच्या सह महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या. महाविकास आघाडी कडून शनिवार दि. २४ रोजी बंद चे आवाहन करण्यात आले होते. परंतु माननीय उच्च न्यायालयाने राज्यात बंद करता येणार नाही असे काल निर्देश दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथम न्यायालयाचा मान राखत राज्यातील राष्ट्रवादी पक्ष भोकर बंद मागे घेत असल्याची भूमिका घेतल्यावर सर्वच पक्षाने त्या भूमिकेस पाठिंबा दिला. झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता व तहसीलदार भोकर मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यासाठी भोकर ता...
error: Content is protected !!