Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ पत्रकार संघटनेचे शिर्डी येथे आज ३१ ऑगस्ट पासून दोन दिवस शिखर अधिवेशन -NNL

‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ पत्रकार संघटनेचे शिर्डी येथे आज ३१ ऑगस्ट पासून दोन दिवस शिखर अधिवेशन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे आज ३१ ऑगस्ट व उद्या १ सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबांबाच्या नगरीत भरणार आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या, प्रश्नांवर चर्चा, ठराव होणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांत पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे, बौध्दिक व सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजनही करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील जवळपास १०० पत्रकार या अधिवेनात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचे सकाळी ११ वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोन्हे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित,...
Golla Golewar Samaj Sangathan ; बाबाराव जरगेवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा कडून जाहीर सत्कार -NNL

Golla Golewar Samaj Sangathan ; बाबाराव जरगेवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा कडून जाहीर सत्कार -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर। गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष व हिमायतनगर गोल्ला गोलेवार समाज संघटणा यांच्या मार्फत दि.31रोजी गोल्ला गोलेवार समाज बांधव बाबाराव जरगेवाड व‌ अभिषेक बकेवाड यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन चालू आहेत. याच ओबीसी आंदोलनात हिमायतनगर तालुक्यातील गोल्ला गोलेवार समाज बांधव युवा, तरूण तडफदार,कुशल संघटक व नैतृव गून संपन्न असणारे तरूण बाबाराव जरगेवाड हे हिमायतनगर तालुका ओबीसी अध्यक्ष असुन यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर तालुक्यात अनेक ओबीसी आंदोलन केले आहे. हिमायतनगर तालुक्याच्या ईतिहासात ओबीसी संघटणेच्या माध्यमातून, ओबीसी आरक्षणासाठी हिमायतनगर शहर बंद करणारे बाबाराव जरगेवाड हे एकमेव ओबीसी संघटनेचे अध्यक्ष ठरले आहेत. भोकर येथे ओबीसी योद्धे लक्ष्मनजी हाक्के साहेब यांच्या सभेला नांदेड जिल्ह्यां...
27.51 lakh voters in the district for the assembly ; विधानसभेसाठी जिल्हयात 27.51 लक्ष मतदार – NNL

27.51 lakh voters in the district for the assembly ; विधानसभेसाठी जिल्हयात 27.51 लक्ष मतदार – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| 20 ऑगस्टपर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 30 हजार 218 मतदारांची वाढ झाली आहे. काल 30 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आकडेवारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी मतदार यादी तयार झाली आहे. जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघात एकूण पुरुष मतदारांची संख्या 14 लक्ष 14 हजार 727 आहे तर महिला मतदारांची संख्या 13 लक्ष 36 हजार 740 आहे तृतीयपंथीयांची संख्या 171 आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघाच्या मतदारांची अंतीम यादी ३० ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द झाली आहे. या नऊ मतदार संघातील मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. 83 –किनवट मतदार संघ एकूण 2 लाख 74 हजार 638 तर 84- हदगाव मतदारसंघात 2 लाख 95 हजार 083, 85–भो...
EVM voting machines ; विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार – NNL

EVM voting machines ; विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत. दिनांक 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 या दरम्यान मतदान यंत्रे तयार करण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम ,MIDC, ढवळे कॉर्नर नांदेड येथील जिल्हा वेअर हाऊस येथे चालू होते. सदरील कामकाज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण पूर्ण करण्यात आले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने BU 7010, CU 3922, VVPAT 4231 इतके मतदान यंत्रे जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आली आहेत. सदरील कामकाज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडले.त्यामध्ये नायब तहसीलदार भोसीकर मुखेड, नायब तहसीलदार विजयकुमार पोटे, ...
Deen Dayal Sparsh Scholarship Scheme ; डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात – NNL

Deen Dayal Sparsh Scholarship Scheme ; डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात – NNL

नांदेड, करियर
नांदेड| दीनदयाल स्पर्श योजना हा दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेला देशव्यापी शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. दीनदयाल स्पर्श योजना 2024-25 या वर्षाकरिता 30 सप्टेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यत जवळच्या पोस्ट ऑफिसला अर्ज सादर करावा, असे आवाहन नांदेडचे अधीक्षक डाकघर मोहमद खदिर यांनी केले आहे. दीनदयाल स्पर्श योजना हा दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेला देशव्यापी शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांमध्ये फिलाटली, टपाल तिकिटांचा अभ्यास आणि संकलनाचे आवाहन व्यापक करणे आहे. स्पर्श योजना, ज्याचा अर्थ स्टॅम्प्समध्ये अभियोग्यता आणि संशोधनाच्या प्रोत्साहनासाठी शिष्यवृत्ती आहे. ज्या सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट आणि फिलाटलीमध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना व...
E-counting ; नांदेड जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ई-मोजणी आज्ञावली कार्यान्वित – NNL

E-counting ; नांदेड जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ई-मोजणी आज्ञावली कार्यान्वित – NNL

नांदेड, कृषी
नांदेड| नांदेड जिल्ह्यात ई-मोजणी Ver-ll आज्ञावली ही पहिल्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख अर्धापुर, दुसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख हदगाव,मुदखेड व तिसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख  नांदेड, बिलोली व लोहा कार्यालयात कार्यन्वित करण्यात आली आहे . तसेच उर्वरित सर्व तालुक्यात उद्या ०१ सप्टेंबर २०२४ पासून कार्यन्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख व कर्मचारी यांना आज प्रशिक्षण देण्यात आले आहे.ई-मोजणी Ver-ll आज्ञावली मधे नागरिकाना घरबसल्या ऑनलाइन मोजणी अर्ज करता येतो तसेच अर्जदार यांना अंक्षास व रेखांश आधारे नकाशा पुरविण्यात येणार आहे .त्यामुळे मोजणी कामात पारदर्शकता येणार आहे. सदर प्रशिक्षण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सीमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  आज नियोजन भवन नांदेड येथे घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणास हजर होते.सद...
Chief Minister Eknath Shinde : आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर| मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी  आज नागपूर येथे 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग मैदानावर आज मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशा...
National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार -NNL

National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार -NNL

करियर
नवी दिल्ली| शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवडलेल्या 50 शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके आणि कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांचा समावेश आहे. :: मंतैय्या बेडके विषयी :: श्री. मंतैय्या बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक ...
Mp.Ashokrao Chavan : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याला कायम प्राधान्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

Mp.Ashokrao Chavan : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याला कायम प्राधान्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना कायम प्रयत्नशील आहे. आता निवडणुका जवळ आल्याने व्यक्तिगत विरोधातून काही लोक काहीही बोलतात. मात्र त्यातील सत्यता तपासून घ्या असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना केले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव आणि डोंगरकडा युनिटची ३१ वी सर्वसाधारण सभा आज देगाव इथल्या कारखान्याच्या आवारात पार पडली.या सर्वसाधारण सभेला चेअरमन गणपतराव तिडके , व्हाईस चेअरमन नरेंद्र चव्हाण , युवानेत्या श्रीजया चव्हाण , लक्ष्मण जाधव, दिलीपराव देशमुख , श्यामराव टेकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संजय लहानकर, बालाजी गव्हाणे, गोविंदराव शिंदे नागेलीकर ,कार्यकारी संचालक श्याम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याच्या या सर्वसाधारण सभेला सभासदासह ऊस उत्पादक शेतक-यांनी मोठी गर्दी केली ...
Cyber ​​search of unknown accused : अर्धापूर येथील दाखल गुन्हयातील इन्सटाग्रामवरील अज्ञात आरोपीचा सायबरकडून शोध -NNL

Cyber ​​search of unknown accused : अर्धापूर येथील दाखल गुन्हयातील इन्सटाग्रामवरील अज्ञात आरोपीचा सायबरकडून शोध -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हयातील अर्धापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. सदर गुन्हा हा संवेदनशील असल्याने गु.र.न. व पिडीतीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. ***/2024 कलम 354 (अ) भारतीय दंड संहिता सहकलम 67, 67 (अ) आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी नामे विशाल गजभारे याने फिर्यादीचे नावाने बनावट इन्सटाग्राम अकाऊंट बनवून इन्सटाग्रामवर मॉर्फ करुन फिर्यादीचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल केले होते. सदर तक्रार सायबर पोलीस स्टेशन येथे प्राप्त होताच अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथील पोलीस निरीक्षक धिरज दत्तात्रय चव्हाण, पो.हे.कॉ. / राजेद्रं राजलिंगराव सिटीकर, पो.हे.कॉ. दिपक रघुनाथ ओढणे, पो.कॉ./ किशोरकुमार सुभाष जैस्वाल, पो.कॉ./ ज्ञानेश्वर पांडूरंग यन्नावार यांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन वरील नमूद आरोपीची पूर्...
error: Content is protected !!