Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Training on child sexual abuse prevention : बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध, उपाययोजनेवर प्रशिक्षण -NNL

Training on child sexual abuse prevention : बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध, उपाययोजनेवर प्रशिक्षण -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नांदेड व अर्पण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल विसावा येथे 'बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध व उपाययोजना' या विषयावर आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन श्रीमती रूपाली रंगारी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणास बालकांच्या विविध विषयांवर काम करणारे अधिकारी, कर्मचारीवर्ग, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये बालकांसोबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, बालके अनुचित, अडचणीच्या परिस्थितीमध्ये आहेत हे कसे ओळखावे, त्यांच्यावर होणारा अन्यायाला वेळीच पायबंद कसा घालावा, बालकांचे व पालकांचे समुपदेशन कशापद्धतीने करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अधिकारी, कर्मचारी वर्गाची संवेदनशीलता, ज्ञान, कौशल्य वृद्धिंगत करणे व बालकांशी संबंधित विषय कौशल्याने हाताळणे व...
Toll waiver for Ganesha devotees going to Konkan : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी -NNL

Toll waiver for Ganesha devotees going to Konkan : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई| गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दि.१४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे...
Chief Minister Eknath Shinde : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लातूर| लातूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुसकान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. केंद्रीय सामाजिक न...
Dr. Ganesh Joshi : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड -NNL

Dr. Ganesh Joshi : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची निवड शिर्डी येथील अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तर नांदेड जिल्ह्याचे मावळते अध्यक्ष श्रीनिवास भोसले यांची राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून प्राचार्य डॉ. गणेश जोशी हे संघटनेचे काम प्रभावीपणे करत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दि. 1 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांची निवड प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मराठवाडा विजय चोरडीया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व ...
Bunty Lanage : बंटी लांडगे यांच्याकडून पुरग्रस्तांना अन्नदान -NNL

Bunty Lanage : बंटी लांडगे यांच्याकडून पुरग्रस्तांना अन्नदान -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| गोदावरी नदीपात्राजवळ असलेल्या देगावचाळ परिसरातील अनेक नागरिकांचे पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. येथील पुरग्रस्तांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्याकडून अन्नदान वाटप करण्यात आले. नांदेड शहरामध्ये जोरदार पाऊस झाला. गोदावरीला पूर आल्यामुळे येथील अनेक कुटूंबाचे संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचे बंटी लांडगे यांनी देगावचाळ, गंगाचाळ, भीमघाट, पंचशीलनगर आदी भागातील नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तेथे अन्नदान केले व पुरग्रस्तांच्या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी सचिन सिरशीला, आरेफ खान, चांदू पंडीत, अशोक इंगोले, भालचंद्र गवारे, अबू उमेर, सुदर्शन राजभोज, देवराव गोडबोले, दीपक पंडीत, आकाश डाकोरे, दीपक डाकोरे, शेख फारूख, बुद्धभूषण धोतरे, चेतन पंडीत आदी जणांची उपस्...
Maharashtra New Model of Women Empowerment : महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू -NNL

Maharashtra New Model of Women Empowerment : महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू -NNL

नांदेड, महाराष्ट्र, लातूर
उदगीर| राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. त्याच राज्यात शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन, निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दांमध्ये देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीक...
For the second day in a row in the flood-affected areas : पूरग्रस्त भागात सलग दुसऱ्या दिवशी पाचशे नागरिकांना लायंसचे डबे -NNl

For the second day in a row in the flood-affected areas : पूरग्रस्त भागात सलग दुसऱ्या दिवशी पाचशे नागरिकांना लायंसचे डबे -NNl

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| पूरग्रस्त भागात सलग दुसऱ्या दिवशी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एनटीसी मिल परिसरात पाणी घुसलेल्या घरात लायन्स परिवारातील सदस्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाचशे नागरिकांना लायंसचे डबे दिल्यामुळे बाढपिडीतांना दिलासा मिळाला. मंगळवारी दुपारी दिलीप ठाकूर,लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील,सचिव गौरव दंडवते,कोषाध्यक्ष दिपेश छेडा, संतोष भारती, सुरेश शर्मा, विलास वाडेकर,सुरेश बाबानी यांनी नल्लागुट्टा चाळ, देगाव चाळ, मार्कंडेय मंदिर परिसरात घराघरात जाऊन जेवणाचे डबे वाटप केले. अनेक घरात गुडघ्या इतके पाणी साचले असल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. एकाही घरात अन्न शिजले नव्हते. त्यामुळे वरण भात ,भाजी चार पोळी असलेला लायन्सचा डबा मिळाल्यामुळे पूरग्रस्तांनी पोटभर जेवण केले.व्यंकटेश पंजाला, अनिल गाजूला, तुम्मा भास्कर, शिवरात्री सत्यम, एलगंटी गोविंदा, गणेश शेट...
The Godavari river at Rahegaon : राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला -NNL

The Godavari river at Rahegaon : राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील राहेगाव किक्की येथे महसूल प्रशासनाने बोट ऊपलब्ध करून दोन दिवसात १५० महिला नागरीक, युवक यांच्या बोटीच्या सहाय्याने सुटका केली असून नांदेड जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांच्या आदेशानुसार नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी सहकार्य केल्याने व मंडळ अधिकारी, तलाठी यांना तात्काळ आदेश देऊन पाण्याने नुकसान झालेले शेतीच्ये पंचनामा केले. नांदेड तालुक्यातील व दक्षिण विधानसभा मतदार संघातील राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेला महापुरामुळे राहेगाव किक्की रस्त्यावरील पुलावर बॅक वॉटर आलेल्या पाण्याने शेतकरी बांधवाच्या शेतीसह पिकासह अतोनात नुकसान झाले तर नागरीकाच्या संपर्क तुटल्याने तात्काळ नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी ३ व ४ सप्टेंबर रोजी गावातील नागरिकांसाठी बोट ऊपलब्ध करून दिल्याने गावातील प्रसुती महिला, यासह आजारी नागरीक व इतर १५० ग्रामस्थांना बोटीच्या सहाय्याने गावाब...
Draupadi Murmu took darshan : तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन -NNL

Draupadi Murmu took darshan : तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतीश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय...
BJP district general secretary Gajanan Tuptewar : हदगाव हिमायतनगर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या – भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार -NNL

BJP district general secretary Gajanan Tuptewar : हदगाव हिमायतनगर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या – भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| हदगाव - हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कोणत्याही प्रकारचे पंचनामे करणे करता हदगाव हिमायतनगर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड अतिवृष्टी झाली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला. या पुराच्या पावसामुळे शेती पिकात पाणी साचून राहिल्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, हळद आदींसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल...
error: Content is protected !!