Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
One accused of forced theft arrested : जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक; 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

One accused of forced theft arrested : जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक; 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक करुन त्याचे कडुन 44 ग्रॅम सोन्याचे 03 गंठण असा एकूण 3 लक्ष 21 हजार 527 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने हि कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी 'ऑपरेशन फ्लश ऑऊट' अंतर्गत केली आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी 'ऑपरेशन फ्लश ऑऊट' अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 04/09/2024 रोजी डी.वी. पथकाचे पो.उपनि. विनोद भा.देशमुख सोबत डी. बी. पथकाचे अमंलदार पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमधील मालेगाव रोडने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं. 291/2024 कलम 309(4),3(5) बी.एन.एस हा गुन्हा केलेला आरोपी हा मालेगाव ता. अर्धापुर जि.नांदेड येथील नांदेड स्पे...
Cattle going to slaughter caught with two vehicles : कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19,17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त -NNL

Cattle going to slaughter caught with two vehicles : कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19,17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांनी कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19 लक्ष 17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैद्य धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीन अंतर्गत दिनांक 04/09/2024 रोजी पो.स्टे. नांदेड ग्रामीनचे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि महेश कोरे यांना गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती मिळाली की, बोंडार मार्गे धनेगाव एक आयचर ताटपटरी बांधुन आत मध्ये गोवंश बैल घेवुन कत्तलीसाठी जात आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरिष्ठाना देवुन सोबत अंमलदार पोहेकॉ / 1812 शेख सत्तार, पोकों पचलिंग यांना घेवुन टापरे चौक येथे गेले असता समोरूण एक आयचर क्रमांक MH20EL ...
शहरातील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येतील – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सीटूच्या शिष्टमंडळास आश्वासन -NNL

शहरातील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येतील – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सीटूच्या शिष्टमंडळास आश्वासन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील सखल भागातील राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीतील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई पोटी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि ५० किलो ग्रॅमची रेशन किट देण्यात यावी अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्ताना प्रत्येकी दहा हजार रुपये मंजूर केले होते. शहरातील पूरग्रस्तांना नऊ कोटी रुपये मंजूर झाले होते. जुलै २०२३ च्या धरतीवर यावर्षी रुपये २० हजार आणि रेशन किटची मागणी सीटूच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवेदन देण्यासाठी थांबलेल्या बैठक कक्षातील सीटूच्या कार्यकर्त्यांना स्वतः थांबून निवेदन स्वीकारले आणि मागच्या वर्षीसारखे यावर्षी होणार नाही, ...
९ सप्टेंबर सोमवारी पूरग्रस्तांचा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सामूहिक अर्ज भरणार – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

९ सप्टेंबर सोमवारी पूरग्रस्तांचा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सामूहिक अर्ज भरणार – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। ३१ ऑगस्टच्या रात्री पासून ३ सप्टेंबर पर्यंत नांदेड शहरात मुसळधार पावसाने थैमान घालून अतिवृष्टी निर्माण झाली आणि नदी काठावरील व सखल भागात राहणाऱ्यांच्या संसाराचे दोन दिवसात होत्याचे नव्हते झाले. त्या सर्व नुकसानग्रसतांना आणि पीडित पूरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान पोटी २० रुपये आणि १४ जीवनावश्यक वस्तूंची रेशन किट, दोन ड्रेस,दोन साड्या तसेच विद्यार्थ्यांना बाल मदत देण्याची मागणी सीटू संलग्न मजदूर युनियनने २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन केली आहे. त्या निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन,राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त,पोलीस अधीक्षक, तहसीलदार नांदेड आणि वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत. गेल्यावर्...
Why is 52 percent OBC deprived in India? 52 टक्के ओबीसी भारतात वंचित का आहे ? -NNL

Why is 52 percent OBC deprived in India? 52 टक्के ओबीसी भारतात वंचित का आहे ? -NNL

नांदेड, लेख
देशात संख्येने सर्वाधिक असलेला ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय समाज आज सर्व क्षेत्रात वंचित का आहे ? "जिस की जितनी संख्या भारी, उस की उतनी भागीदारी !" असा नारा बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात या नाऱ्याची अंमलबजावणी का केली जात नाही ? याचे उत्तर सोपे आहे, "जिस का शासन होता है, उस का शोषण नही होता है." संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसीने आपले शासन आणून आपले प्रश्न आपण स्वतः सोडवावेत हे साधे सुत्र आहे पण नेमके तेच ओबीसीला जमेनासे झाले आहे. ओबीसी संख्येने जास्त असला तरी तो एकसंघ नाही. विविध पक्ष, संघटना व चळवळीत ओबीसी विभागलेला आहे. आपला दोस्त कोण आणि दुष्मन कोण याची नेमकी ओळख नसल्याने तो बुचकाळ्यात पडला आहे. शिवाय धर्माच्या कचाट्यात तो स्वखुषीने भरडल्या जात आहे. सामाजिक प्रश्नांपेक्षा तो धार्मिक कर्मकांडाला जास्त महत्व देत असतो. नेमक्या याच कमजोरीचा फायदा घेत भार...
MLA’s letter ; आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेन्द्र भारुड यांच्या समर्थनार्थ आमदारांच पत्र -NNL

MLA’s letter ; आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेन्द्र भारुड यांच्या समर्थनार्थ आमदारांच पत्र -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर। सर्व आदिवासी कोळी महादेव समाजाच्या न्याय हक्कासाठी समाज संघटनेची हिमायतनगर येथिल महात्मा फुले सभागृहात दिनांक 04 सप्टेंबर 2024 बुधवारी बैठक झाली, या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेन्द्र भारुड यांनी आदिवासी कोळी समाजाला मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये बोगस म्हंटल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या एका अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आ जवळगावकर यांनी आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन सर्व समाजाची नाराजी ओढून घेतली आहे. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देऊन त्यांच्या पत्रव्यवहार प्रकरणाचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी मोठया प्रमाणावर आदिवासी कोळी महादेव समाजाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेन्द्र भारुड यांच...
Ex. Chief Minister Ashok Chavan : विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण -NNL

Ex. Chief Minister Ashok Chavan : विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| तालुक्यातील भोसी येथे माजी जी. प. सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांन सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जाणता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की मी व माझे कुटुंबिय आणि भोकर तालुका यांचा अगदी जवळच नात असून माझ्या वडिलांना म्हणजेच स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांना देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत आणि मला राज्याचा मुख्यमंत्री बनविण्याची किमया या भोकर मतदारसंघानी केली आहे त्या मुळे या मतदार संघातील जनतेचे आम्ही उपकार विसरू शकत नाही, तेंव्हा या मतदार संघांच्या विकास कामासाठी मी निधी कधीच कमी पडू देणार नाही तेंव्हा आपले गट तट बाजूला ठेवून मतांचे ध्रुवीकरण(विभाजन ) होऊ देऊ नका व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या समोर भारतीय जाणता पार्टीचा उमेदवार म्हणून श्रीजया अशोक चव्हाण येणार असून तिला प्रचंड मताधिक्यानी व...
Summarize major agricultural losses : शेतीचे मोठे नुकसान सरसकट पंचनामे करा; तात्काळ मदत द्या- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Summarize major agricultural losses : शेतीचे मोठे नुकसान सरसकट पंचनामे करा; तात्काळ मदत द्या- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| जिल्ह्यात सर्वच तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी ,तलाठी ग्रामसेवक यांनी मिळून सरसगट पंचनामे करावे .शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. कोणीही वंचित राहू नयेत याची प्रशासनाने काळजी घ्यावी असे आहवान माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे लोहा तालुक्यातील पेनूर शेवडी, पळशी, भेंडेगाव भागातील पिकांच्या नुकसानाची पाहणी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. लोहा तालुक्यात मोठ्या संख्येने मागच्या पावसामुळे मोठे शेतीचे नुकसान झाले त्या संदर्भात आज माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील पळशी भेंडेगाव शेवडी पेनुर सह अन्य गावात त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतक...
Why the readiness of public representatives..? Not visible : पुरग्रस्त शेतक-याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची तत्परता का..? दिसुन येत नाही -NNL

Why the readiness of public representatives..? Not visible : पुरग्रस्त शेतक-याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची तत्परता का..? दिसुन येत नाही -NNL

नांदेड, कृषी
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र केवळ फोटो सेशन पुरते राजकीय नेते काम करत असल्याने गतवर्षीच्या पिकविम्याच्या नुकसान भरपाईसह यंदाच्या अतिवृष्टीच्या मदतीपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहतात कि काय..? असे साध्यतंरी दिसून येत आहे. पुरग्रस्त शेतक-याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची तत्परता का..? दिसुन येत नाही असे खडेबोल शेतकरी बोलून दाखवीत आहेत. हदगाव विधानसभा क्षेञात २०१९ च्या दरम्यान अशीच अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी हिगोली लोकसभाचे सेनेचे खा.हेमत पाटील यांनी हदगाव हिमायनगर तालुक्यात धावती भेट दिली. आणि तात्काळ पुरग्रस्त भागातील नागरिकांना व ञस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देवून हदगाव शहरातील तहसिल कार्यालयात ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार दोन्ही तालुक्यातील सर्व संबधित कर्मचारी प्रमुख अधिकारी, ...
Pralhad Patil : आमदार – खासदाराने पुरग्रस्त शेतकऱ्याच्या पीक नुकसान पीकविमा बाबतीत ठोस भूमिका घ्यावी – प्रल्हाद पाटील -NNL

Pralhad Patil : आमदार – खासदाराने पुरग्रस्त शेतकऱ्याच्या पीक नुकसान पीकविमा बाबतीत ठोस भूमिका घ्यावी – प्रल्हाद पाटील -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव व हिमायनगर तालुक्यात मुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांचे पीकाचे प्रचड नुकसान झाले आहे. तसेच थकीत पीक विमा संदर्भात हदगाव विधानसभाक्षेञाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर व हिगोली लोकसभाचे खा. नागेश पा. अष्टीकर यांनी एकत्र बसुन ठोस निर्णय घ्यावा असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे हदगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी केली आहे. त्यांनी दि.3 सप्टेंबर रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 1सप्टेबर2024 च्या राञीपासुन सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने थैमान घातले. तीन दिवसात नदी नाले यांना पुर येवून शेती पिकाचे प्रचड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यावर प्रचंड प्रमाणात अर्थिक संकट कोसळले आहे. हदगाव व हिमायनगर तालुक्यातील सर्व शेतक-याच्या शेतीचे पंचनामे करुन त्यांना त्वरीत नुकसानीच मोबदला देण्यात येऊन या संकटातून बाहेर काढणे आवश्यक असल्याची मागण...
error: Content is protected !!