Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Hritika jannawar Gold medal ; कु. हृतिका जन्नावार हिचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान -NNL

Hritika jannawar Gold medal ; कु. हृतिका जन्नावार हिचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान -NNL

करियर, नांदेड
नांदेड/पुणे,गोविंद मुंडकर। कुमारी हृतीका प्रशांत जन्नावार हिसने LLM (एल एल एम) मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. तिनं सिंबोईसिस कॉलेज पुणे येथून  शिक्षण पूर्ण केले असून, हिमायतनगर तालुक्यातुन उच्च पदवी मिळविणारी पहिली विद्यार्थिनी आहे. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पदवीदान सोहळा संपन्न झाला. त्यात तिला गोल्ड मेडल व पदवी प्रदान करून गौरविण्यात आले आहे. तिच्या यशाबद्दल नातेवाईक व सर्व क्षेत्रातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. कु.हृतीका ही डॉ. प्रशांत कुमार जन्नावार यांची द्वितीय कन्या असून, डॉ. प्रशांत हे स्व. डॉ कुमार जन्नावार यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांचे मूळ गाव हिमायतनगर असून, सध्या ते अलिबाग येथे स्वतः चे हॉस्पिटल चालवीत आहेत. तसेच इंजिनियर प्रवीण कुमार जन्नावार हे त्यांचे धाकटे भाऊ असून, कुटुंबातील सर्व सदस्य उच्चशिक्षित आहेत. प्रवीण यांचा मुलगा अभिजीत M...
Awarded to Balaji Venkatarao Sadulwar : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी बालाजी व्यंकटराव सादूलवार यांना पुरस्कार प्रदान -NNL

Awarded to Balaji Venkatarao Sadulwar : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी बालाजी व्यंकटराव सादूलवार यांना पुरस्कार प्रदान -NNL

करियर, नांदेड
छत्रपती संभाजीनगर | आदर्श शिक्षक सावित्रीबाई सन्मान पुरस्कार सोहळा दि.5/9/2024 रोजी तेजस्विनी इंग्रजी शाळा शिवराणा वाचनालय पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी 4 वाजता थाटात संपन्न झाला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी हदगाव येथील शिक्षक बालाजी व्यंकटराव सादूलवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२४ साठी नागरी विकास सेवाभावी‌ संस्था वतीने राज्यातील शिक्षक, प्राध्यापक यांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड करण्यात आली होती. या गौरव पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांच्या प्रमुख अतिथी/ व्यक्ते/ हस्ते मा.अँड आनदसिंग बायस सा. विज्ञीतज्ञ हायकोर्ट, मा.अँड मिलिंद पाटील, सा. अध्यक्ष जिल्हा न्यायालय वकील संघ छत्रपती संभाजीनगर, मा. भरत घुनावत साहेब, मा.दिगंबर बंगाळे यांच्या हस्ते संस्थेतर्फे सन्मान पुरस्कार प...
Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

नागपूर, करियर, देश विदेश
नाशिक| मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असलेले प्रा. किरणकुमार जोहरे यांना मुंबई व नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद यांचा शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल सन २०२३-२४ चा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे "महाराष्ट्रभूषण जीवन गौरव " पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान अलर्ट व माहिती प्रा. जोहरे हे पुरवतात. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पीक नियोजनाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत करून दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीने राष्ट्रीय उत्...
Honoring Jairam Kendra : जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान -NNL

Honoring Jairam Kendra : जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| पंचायत समिती माहूर येथील कनिष्ठ सहाय्यक तथा कर्मचारी युनियनचे तालुकाध्यक्ष जयराम केंद्रे यांच्या कार्यालयीन कामाची दखल घेऊन दैनिक समीक्षा, मंथन ग्रुप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्कृष्ट व गुणवंत अधिकारी कर्मचारी व शिक्षकांचा सन्मान सोहळा दिनांक 5 सप्टेंबर रोजी हॉटेल राजयोग नांदेड येथे उत्साहात संपन्न झाला. याच कार्यक्रमांमध्ये जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांच्या हस्ते जयराम केंद्र यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी श्री शिवानंद मिनगिरे (सहा. आयुक्त समाज कल्याण), श्री प्रवीण टाके (जिल्हा माहिती अधिकारी),श्री केशव घोणसे पाटील (मुख्य संपादक, दैनिक गोदातीर),...
Why is it so sour when the safe is shaking? तिजोरीत खडखडात असतांना उगाच खटाटोप कशाला? -NNL

Why is it so sour when the safe is shaking? तिजोरीत खडखडात असतांना उगाच खटाटोप कशाला? -NNL

लेख, नांदेड
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड, यांच्या वतीने योजना माहिती केंद्र सर्व शासकीय कार्यालयात राबविण्यात येत आहेत, परंतु लोकांना माहित असलेल्या व कार्यान्वित असलेल्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही हे वास्तव परिस्थिती आहे. याकडे शासन आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. संजय गांधी निराधार योजना, रमाई आवास योजना,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,श्रावणबाळ योजनासह विविध योजना आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत दोन दोन महिने उशीरा मिळतात, सोईनुसार विधवा, परितकत्या महिलांची नावे पात्र केली जातात किंबहुना पीडित महिलांचा अवमान केला जातो. गरजू व बेघर व्यक्तींना रमाई आवास योजनेचा लाभ वेळेवर दिला जात नाही. त्यांना आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ येते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी विध्यार्थ्यांना त्यांच्या श...
Fake government decision in Shinde-Fadnavis regime..! अहो आश्चर्यम्…..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय -NNL

Fake government decision in Shinde-Fadnavis regime..! अहो आश्चर्यम्…..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| अहो आश्चर्यम्……..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय काढल्याचे उघड झाले. याबाबत मंत्रालयातून गुन्हा नोंद करण्याचे पत्र एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांना देण्यात आले असल्याची माहिती कार्यालयीन सुत्रांनी दिली. यात अनेक दिग्गज अधिकारी आणि संस्थाचालक गुंतले असल्यामुळे तब्बल चार महिने उलटूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणी एकात्मिक आदिवासी प्रकल्पाधिकारी कावलि मेघना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाच्या कार्यालयातून सविस्तर माहिती उपलब्ध होईल असे सांगितले. संस्थाचालक, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मिळून नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद येथे चक्क अनाधिकृत शाळा सुरू केली. ही शाळा सुरू करण्यासाठी चक्क शिंदे-फडणवीस शासनाचा ‘शासन निर्णय आदिवासी विकास विभागाचा’ दि. 14 मर्च 2024 चा बनावट शासन निर्णय काढण्...
Mp. Ajit Gopchade : संघटित झाल्याशिवाय लिंगायत समाजाची प्रगती नाही – खा. अजित गोपछडे -NNL

Mp. Ajit Gopchade : संघटित झाल्याशिवाय लिंगायत समाजाची प्रगती नाही – खा. अजित गोपछडे -NNL

नांदेड, राजकीय, लातूर
लातूर/नांदेड| राज्यात व देशात लिंगायत समाजाची मोठी ताकद आहे.समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे.हा संपूर्ण समाज एकत्र आल्याशिवाय प्रगती होणे शक्य नाही,असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केले. खा.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा गुरुवारी( दि.५)भक्तीस्थळ राजूर येथे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिवादन करून शुभारंभ झाला*.या सन्मान यात्रेचा २१ सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे समारोप होणार आहे. समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी ही सन्मान यात्रा आयोजित केली असल्याचे खा. अजित गोपछडे यांनी यावेळी सांगितले.वीरशैव लिंगायत समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या जवळपास दीड कोटी असून या समाजाला राजकीय क्षेत्रात वाटा मिळाला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मी भारतीय जनता पक्षाचे चाळीस वर...
Dr. Kranti Kamble : सरसमच्या डॉ. क्रांती कांबळे यांची परदेशात शैक्षणिक क्रांती; डेनमार्क येथिल ‘पोस्ट डॉक्टरेट फेलो’ पदी नियुक्ती -NNL

Dr. Kranti Kamble : सरसमच्या डॉ. क्रांती कांबळे यांची परदेशात शैक्षणिक क्रांती; डेनमार्क येथिल ‘पोस्ट डॉक्टरेट फेलो’ पदी नियुक्ती -NNL

नांदेड, करियर, देश विदेश
हिमायतनगर। तालुक्यातील सरसम येथिल माहेर नांदेड येथे सासर असलेल्या डॉ. क्रांती यांची शैक्षणिक प्रगती पाहता त्यांची परदेशात डेनमार्क येथे डॉक्टरेट फेलो पदी नियुक्ती झाल्याच तेथिल संस्थेन कळवल आहे, यामुळे त्यांनी केलेल्या मेहनतीच चीज झाल्याच समाधान आई वडील नातेवाईकांना आहे. सरसम येथिल शेतकरी सदाशिव कांबळे , माजी सरपंच सयाबाई कांबळे यांची मुलगी डॉ क्रांती ह्यांच शिक्षण १ली ते ७ वी जि. प. कन्या शाळा भोकर, ८ ते १० सरस्वती विद्या मंदिर भोकर, ११ वी ते १२ वी शाहु महाराज ज्युनियर कॉलेज भोकर, बिटेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन एसजीएस कॉलेज नांदेड, एमटेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन व्हीजेटीया कॉलेज मुंबई, पिएचडी इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन व्हीएनआयटी कॉलेज नागपुर येथे पुर्ण करून त्यांनी यशस्वी शिक्षणा नंतर परदेशात मुलाखत दिली. त्यानंतर त्यांची डेनमार्क देशातील पोस्ट डॉक्टरेट फेलो पदावर निय...
Hadgaon-Himayatnagar assembly elections : हदगांव-हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा रहाणार -NNL

Hadgaon-Himayatnagar assembly elections : हदगांव-हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा रहाणार -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगांव-हिमायत्तनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर दि ३१ आगस्ट रोजी हिमायत्तनगर येथे आदिवासी समाज बांधवाची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या हदगाव व हिमायतनगर विधानसभा निवडणुकी आदिवासी समाज बांधव उच्चं शिक्षित व सक्षम असा एक आदिवासी उमेदवार उभा करणार आहे. यावर एकमताने बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, यासही तालुक्यात आदिवासी समाज बांधव तयारीला लागले आहेत. आदिवासी समाजाने घेतलेल्या हा एकजुटीचा निर्णय मात्र अनेक भावी आमदाराचे स्वप्न भंग करणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. हदगाव हिमायत्तनगर तालुक्यात आदिवासी समाजाचे एकगठ्ठा मतदान हे निर्णायक आहे. आदिवासी समाज ज्यांच्या पाठीशी तो उमेदवार विजयी असे समीकरण आत्तापर्यंत अमलात आले असल्याचे बोलले जात आहे. असे असताना देखील निवडणून आलेला उमेदवार हा आदिवासी समाजाच्या प्रमुख गरजांकड...
Honorable teachers : शिक्षक दिनी केला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान -NNL

Honorable teachers : शिक्षक दिनी केला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| 5 सप्टेंबर 24 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिडको केंद्रांतर्गत शाळातील सर्वच शिक्षकासह उत्कृष्ट कार्य करणारे व विद्यार्थ्यांना घडविण्यात ज्या शिक्षकांचे मोलाचे हातभार आहेत असे सर्व गुण संपन्न असे शिवकुमार पंतुलवार, दत्ता धोंडीबा शिंदे ,बालाजी कवटीकवार व सौ. धनश्री देशपांडे अशा चार शिक्षकांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायेगाव येथे सिडको केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब मटके यांच्या संकल्पनेतून व संयोजनातून केंद्रातील सर्वच शिक्षकांचा मान सन्मान व प्रेरणा देण्यासाठी केंद्रातील वरील चार शिक्षका सोबतच सर्व शिक्षकांना शाल पुष्पगुच्छ व हार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब मटके होते तर प्रमुख उपस्थिती नांदेड तालुक्याचे गटशिक्षण धिकारी नागराज बनसोडे साहेब तसेच सिडको बीटचे शिक्षण विस्ता...
error: Content is protected !!