Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Relief and Rehabilitation Minister Anil Patil’s visit : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा -NNL

Relief and Rehabilitation Minister Anil Patil’s visit : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता राज्यराणी एक्सप्रेसने मनमाड येथून नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 7.40 वाजता शासकीय निवासस्थान नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.50 वाजता शासकीय निवासस्थान नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालस येथून मौजे कासारखेडा, आलेगाव व निळा ता. नांदेडकडे प्रयाण व या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. दुपारी 12.30 ता. वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील....
Kamalkarrao Deshpande passed away : कमलाकरराव देशपांडे यांचे निधन -NNL

Kamalkarrao Deshpande passed away : कमलाकरराव देशपांडे यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर| येथील जेष्ठ नागरीक जि.प.नांदेडचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा समता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कमलाकर दत्तोपंतराव देशपांडे लाठकर यांचे दि.७ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे दवाखान्यात उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यूसमयी ते ७९ वर्षाचे होते. दि. ८ सप्टेंबर रोजी सिडको नांदेड येथील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता त्यांचें पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी मोठ्या शंकेने नागरिक, नातेवाई, मित्रपरिवार उपस्थित झाले होते....
Nanded’s D.B. Forceful action : नांदेडच्या डी.बी. पथकांची जबरदस्त कार्यवाही अंदर बाहेर हारजीत नावाचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर कार्यवाही -NNL

Nanded’s D.B. Forceful action : नांदेडच्या डी.बी. पथकांची जबरदस्त कार्यवाही अंदर बाहेर हारजीत नावाचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर कार्यवाही -NNL

Blog, क्राईम, नांदेड
नांदेड| अंदर बाहेर हारजीत च्या नावाने जुगार खेळणाऱ्या नऊ इसमांवर पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेडच्या गुन्हे शोध पथकाने कार्यवाही केली आहे. यात नागडी रक्कम व साहित्य असे एकूण १० लक्ष ६२ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 'ऑपरेशन फ्लश ऑऊट' अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे. नांदेड सर्व प्रभारी अधिकारी यांना नांदेड शहरातील अवैध धंदयाविरुध्द कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 07/09/2024 रोजी डी.बी. पथकाचे पो. उपनि. विनोद भा. देशमुख सोबत डी. बी. पथकाचे अमंलदार पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमध्ये गजानन महाराज मंदिराचे कमानी जवळ असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, शिवरोड जवळील पावडे रेसिडेन्सी तरोडा खु.नांदेड येथे काही लोक पैसे लावुन अंदर बाहर हार जीत नावाचा जुगार खेळत आहेत. त्यावरुन वरील अधिक...
Prohibition of use of Dolby system during Shree Ganesh Utsav : नांदेड जिल्ह्यात श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध -NNL

Prohibition of use of Dolby system during Shree Ganesh Utsav : नांदेड जिल्ह्यात श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर| जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 7 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक, इतर कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टीम वापरात / चालविण्यास भारतीय सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढला आहे. जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार 7 ते 19 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / चालक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 7 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 19 सप्टेंबर 2024 रोजी 24 वाजेपर्यंत श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील, डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे...
Sarvajna Sri Chakradhar Swami’s : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मोक्षमार्ग सहजासहजी प्राप्त होत नाही – आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा -NNL

Sarvajna Sri Chakradhar Swami’s : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मोक्षमार्ग सहजासहजी प्राप्त होत नाही – आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| महानुभाव पंथाचे महास्थान असलेल्या श्री देवदेवेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव गुरुवार दि.५ सप्टेंबर रोजी भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित धर्मसभेचा अध्यक्षीय समारोप करतांना आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा मोक्षमार्ग हा सहजासहजी प्राप्त होत नसल्याचे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष आचार्य महंत एकोव्यासबाबा, मकरधोकडा निवासी प.पू.न्यायंबासबाबा शास्त्री, महंत मुधोव्यासबाबा, आचार्य रुद्धपुरकरबाबा शास्त्री, आचार्य महंत पाचराऊतबाबा, महंत शहागडकरबाबा, प.पू. अशोक शास्त्री पुणे, हदगाव निवासी योगीराजदादा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या सोहळ्याचे आयोजन माहूर पिठाधिष प. पू. प. म.मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी केले होते. पुढे मार्गदर्शन करतां...
Admission of Lohya Varsha Phulpagar students for MBBS : लोह्याची वर्षा फुलपगार या विद्यार्थ्यानींचा एमबीबीएस साठी प्रवेश -NNL

Admission of Lohya Varsha Phulpagar students for MBBS : लोह्याची वर्षा फुलपगार या विद्यार्थ्यानींचा एमबीबीएस साठी प्रवेश -NNL

नांदेड, करियर
लोहा| ऐंशीच्या दशकात ज्या गल्लीतून जाताना लोक नाकाला रुमाल लावायचे त्याच गल्लीत आज शिक्षणाच्या बळावर ज्ञानाचा सुंगध राज्यात दरवळतो आहे. शहराच्या संत रविदास नगरातील वर्षा बालाजी फुलपगार या विद्यार्थ्यांनीचा एमबीबीएस धाराशिव येथे प्रवेश निश्चित झाला असून समाजात मुलीतून पहिली डॉक्टर होण्याचा मान तिला मिळणार आहे शहरातील संत रविदास नगरात राहणारे बालाजी फुलपगार यांनी अत्यंत गरिबीतून शिक्षण घेतले.ते उपक्रमशील शिक्षक आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे साध्य झाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्याची मुलगी वर्षा हिचे शिक्षण कै विश्वनाथराव नळगे विद्यालयात झाले दहावी बोर्ड परीक्षेचे ९९.८०टक्के गुण मिळाले ते लोह्याच्या राजर्षी शाहू ज्यू .कॉलेज मध्ये बारावी झाली तिने८६.६७टक्के गुण संपादन केले . नीट परीक्षेचे ५६१ गुण मिळविले असून पहिल्याच यादीत तिला धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीब...
One village one Ganpati : हिमायतनगर तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती; एकुण 111 श्री गणेश मंडळाची स्थापना -NNL

One village one Ganpati : हिमायतनगर तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती; एकुण 111 श्री गणेश मंडळाची स्थापना -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविन्यात आली आहे. हि बाब हिमायतनगर तालुक्यासाठी भुशनावह असून, याचा आदर्श सर्व गावातील नागरिकांनी घेवून पुढील वर्षी जास्तीत जास्त गावकर्यांनी लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला एकसंघतेचा उद्देश सफल करावा. असे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी केले. ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात गणेशाची स्थापना केल्यानंतर बोलत होते. गणेश चतुर्थी मुहूर्तापासून हिमायतनगर शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. धार्मिक सन - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास १११ ठिकाणी गणपती स्थापन केलेल्या मंडळाच्या भेटी घेऊन तसेच पोलीस स्थानकात शांतता कमिटीच्या बैठक घेऊन शांततेत उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील हिंदू - मुस्लिम एकतेची परंपरा गेल्या ५३ वर्षांपासून कायम असून, सामाजि...
Nanded Waghala City Municipal Employees Cooperative Credit Society : नांदेड वाघाळा शहर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था, नांदेड यांच्यी यशस्वी वाटचाल -अध्यक्ष दयानंद गायकवाड -NNL

Nanded Waghala City Municipal Employees Cooperative Credit Society : नांदेड वाघाळा शहर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था, नांदेड यांच्यी यशस्वी वाटचाल -अध्यक्ष दयानंद गायकवाड -NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका कर्मचारी पतसंस्थेच्यी यशस्वी वाटचाल चालू असून सभासदांना वाढीव कर्ज, मुलीचे लग्न, उच्च शिक्षण कर्ज यासह विविध माध्यमातून सभासदांना कर्ज देणारी पतसंस्था म्हणून उलेखनीय कार्य करणारी पतसंस्था ठरली असुन, अध्यक्ष दयानंद गायकवाड ८ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे होत असून सभासदाचा गुणवंत पाल्याचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. पतंस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम आहे व संस्थेच्या मुदती ठेवी सध्याच्या घडीला रु. ६ कोटी ५० लाख जमा आहेत व तसेच गतवर्षीच्या ऑडीट मध्ये एवढ्या ठेवी जमा ठेवण्यापेक्षा सभासदांना वाढीव कर्जे देणे योग्य असल्याने त्यानुसार आम्ही तरतुद करुन येणाऱ्या दिवाळीची भेट सभासदांना देणार असल्याची माहिती अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी दिली आहे. सभासदांना वाढीव कर्जे ६ लाख ,मुलीचे लग्न कर्ज २...
Chief Minister Eknath ; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे – NNL

Chief Minister Eknath ; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे – NNL

महाराष्ट्र, नांदेड, राजकीय
मुंबई| गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान स...
Hadgaon police station : हदगाव पोलिस स्टेशनच्या शांताता कमेटीच्या बैठकीत नवीन पायंडा पडल्यामुळे नागरिकांत नाराजी -NNL

Hadgaon police station : हदगाव पोलिस स्टेशनच्या शांताता कमेटीच्या बैठकीत नवीन पायंडा पडल्यामुळे नागरिकांत नाराजी -NNL

नांदेड, क्राईम
हदगाव, शेख चांदपाशा| गणेश उत्सवाच्या,पार्श्वभूमीवर दरवर्षी हदगाव पोलिस स्टेशनद्वरे शांताता कमेटीचे आयोजन करण्यात येते. माञ यावर्षी स्थानिय पोलिस स्टेशनने नवीनच पायंडा घातल्याचे दिसुन आले. दरवर्षी सर्व समाजातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे स्थानिय राजकीय नेते यांना निमंञित करण्यात येते. पोलिस प्रशासना तर्फ उपविभागीय अधिकारी सह पोलिस दलातील वरिष्ठ आधिकारी नगरपरिषद सार्वजनिक बाधकाम अभियता, सरकारी रुग्णालयाचे डाँक्टर, महावितरण कंपनीचे अधिकारी हे शांताता बैठकीला आवर्जून हजर आसतात. विशेष म्हणजे ह्या शांताता बैडकीतच काही नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते व पञकार गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इतर धर्मीयाच्या सणाच्या अनुषंगाने सामाजिक दृष्टिकोनातून सुचना करित असतात. तिथेच संबंधित विभागाकडुन सुचनांचे निरकान होते व कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने पण ह्या सुचना फार उपयोगी...
error: Content is protected !!