नांदेडमहाराष्ट्र

Neglect of wildlife safety! वन्यजीवांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष ! पुन्हा एका हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील निसर्गसमृद्ध डोगर परिसरात वन्यजीवांचे रस्त्यावर चिरडून मृत्यू होण्याच्या घटनांना आळा बसण्याचे नावच घेत नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वी गर्भवती हरीणी व तिच्या पाडसाचा दुर्दैवी मृत्यू हदगाव शहराजवळील राज्य महामार्गावरअज्ञात वाहनाच्या धडकेने झाला होता. त्या दु:खद घटनेची आठवणी ताजी असतानाच पुन्हा एकदा अशीच हृदयद्रावक घटना समोर आली असून, पुन्हा एका हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर हदगावपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर शिवदरा गावाजवळ एका नर हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. ही घटना तीन दिवसांपूर्वी सकाळी ७ ते ८ दरम्यान घडल्याची माहीती मिळाली आहे. ही मृत्यूची मालिका थांबण्याचे काहीही चिन्ह दिसत नसल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन शवविच्छेदना करिता पशुवैदकीय अधिकाऱ्याला ( मनाठा) पाचरण केल्याचे समजते.

मात्र, यापुढे या प्रकरणाचा तपशील काय झाला, याची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. आणखीन विशेष म्हणजे असे अपघात झाले की, वनपरिक्षेत्र विभाग फक्त कागदपत्रे कारवाई करण्यात येते. घडल्या घटनेवर काय..? उपाययोजना करता येतात काय…? जनजागृती करता येते का..? याबाबत काहीही करण्यात येत नाही. हे तालुक्याच्या प्रशासकीय दृष्टीने फार दुर्दैवी आहे जेकी असे अधिकारी तालुका लाभलेले आहे.

किमान बोर्ड तरी लावा….!
ज्या महामार्गांवर वन्यप्राण्यांचा वावर आहे, त्या ठिकाणी तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मुख्य रस्त्यावर या भागात “प्राण्यांचा वावर आहे – वाहने हळू चालवा” असे सूचना फलक लावणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वनविभाग इतके सुस्त आहे की…? हे साधे बोर्ड लावण्याचे काम ही केले जात नाही. काही वन्यप्रेमींनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन व मेसेजद्वारे हे कळवले, तरीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू स्वार्थ असलेल्या कामाकडे अधिकचे लक्ष दिले जात असल्याचे वन्यप्रेमी नागरिक बोलून दाखवीत आहेत.

आमदारांनी लक्ष द्यावे संतप्त वन्यप्रेमींची मागणी….!
वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर यावे लागते आणि तेथे त्यांचा जीव जातो, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. अनेक वेळा वनप्रेमींनी वनविभागाला सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही गंभीर बाब असून, प्रशासनिक उदासीनता नक्की कोठून येते, याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता खुद्द आमदारांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी तीव्र मागणी वन्यप्रेमीं जनतेमधून होतांना दिसून येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button