हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वामनराव पाटील वडगांवकर यांची निवड झाल्यानंतर पक्ष संघटना विस्ताराला वेग आला आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे विविध पक्षातील युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत.


अशाच पार्श्वभूमीवर राजू किसनराव गायकवाड, तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना, यांनी दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक लुटे, तालुकाध्यक्ष वामनराव पाटील, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, तसेच रवी राठोड (जिल्हा सरचिटणीस ओबीसी विभाग) उपस्थित होते.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मराठवाड्याचे लोकनेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसेच विधानसभा अध्यक्ष एकनाथराव पाटील बोरगावकर यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन राजू गायकवाड यांनी पक्षप्रवेश केला.


ते म्हणाले, “हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन. शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि गोर-गरिबांना न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय असेल.” नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी बळ देणारा ठरणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

तालुकाध्यक्ष वामनराव पाटील म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात आहे — आगे आगे देखो होता है क्या! आणखी अनेक पक्षातील मातब्बर कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रताप पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र लढवून सत्ता काबीज करेल. यात शंका नाही — आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हात अधिक बळकट होतील.”


