नांदेड, अनिल मादसवार| सणासुदीच्या काळात नांदेडहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने एक विशेष एकतर्फी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाने जारी केलेल्या प्रेस नोट क्र. 906 नुसार, हुजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई CSMT) दरम्यान ही गाडी फक्त एक फेरी धावणार आहे.


गाडी क्रमांक: 07611 मार्ग: हुजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत चालविली जाणार असून, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 20.50 वा. (8.50 वाजता) प्रस्थान होईल तर दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 09.30 वा. (9.30 वाजता) आगमन नांदेड स्थानकवर होईल.


हि गाडी प्रवासादरम्यान पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, रोटेगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करेल. एकूण 20 डब्बे असून, या विशेष गाडीत जोडले जाणार असून त्यात 06 स्लीपर कोच 12 जनरल कोच असतील.


ही विशेष गाडी दसरा, दिवाळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मागणी प्रचंड वाढलेली असल्यामुळे उपलब्ध नियमित गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी वाढल्याने अतिरिक्त गाडीची गरज भासली. त्यानुसार प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने गाडीचे सुटणे, थांबे आणि आगमन यांचे वेळापत्रक सोबत जोडले असल्याची माहिती दिली असून, प्रवाशांनी तिकीट आरक्षण आणि प्रवासाच्या नियोजनासाठी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष गाडीमुळे मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, मुंबईकडे होणारा वाढता प्रवासी ताण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


