Special train ; नांदेड ते मुंबई विशेष गाडीची घोषणा – प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय
नांदेड, अनिल मादसवार| सणासुदीच्या काळात नांदेडहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने एक विशेष एकतर्फी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाने जारी केलेल्या प्रेस नोट क्र. 906 नुसार, हुजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई CSMT) दरम्यान ही गाडी फक्त एक फेरी धावणार आहे.
गाडी क्रमांक: 07611 मार्ग: हुजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत चालविली जाणार असून, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 20.50 वा. (8.50 वाजता) प्रस्थान होईल तर दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 09.30 वा. (9.30 वाजता) आगमन नांदेड स्थानकवर होईल.
हि गाडी प्रवासादरम्यान पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, रोटेगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करेल. ...
