HomeनांदेडChandatai Tiwari : संत मीराबाई यांच्या भजनांमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक...

Chandatai Tiwari : संत मीराबाई यांच्या भजनांमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम – चंदाताई तिवारी -NNL

नांदेड| संत मीराबाई यांच्या भजन रचनेमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम असून, मध्ययुगीन काळातील त्या श्रेष्ठ संत आहेत. पाचशे वर्षानंतरही मीराबाईंची भजने गाताना स्वर्गसुख प्राप्त होते. असे गौरवोद्गार संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध भारुड गायिका चंदाताई तिवारी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काढले.

विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलात संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संगीत नाटक अकादमी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत सुप्रसिद्ध भारुड गायिका चंदाताई तिवारी यांनी मार्गदर्शन केले. गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत संत मीराबाई यांच्या अभंगांशी एकजीव करत चंदाताई तिवारी यांनी प्रशिक्षण दिले. नृत्यांगना संध्या साखी, उमराव वागज, रामचंद्र सुतार यांनी त्यांची सोबत केली.

कार्यशाळेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक प्रो. डॉ. पृथ्वीराज तौर अध्यक्षस्थानी होते. चंदाताई तिवारी यांच्या समवेत सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. विश्वाधार देशमुख, भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. अविनाश कदम, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नरंगले, डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयीका डॉ. योगिनी सातारकर, नाट्यसमीक्षक डॉ. दुर्गेश रवंदे, संयोजक प्रा. किरण सावंत, डॉ. शिवराज शिंदे, संध्याताई साखी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यशाळेत ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोप सोहळ्याप्रसंगी संध्या साखी आणि संकुलातील विद्यार्थीनी मीनाक्षी आडे यांनी संत मीराबाई यांच्या रचनांचे नृत्य सादरीकरण केले.

WhatsApp Image 2024 12 18 at 12.58.16 PM Chandatai Tiwari : संत मीराबाई यांच्या भजनांमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम - चंदाताई तिवारी -NNL

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवराज शिंदे यांनी केले तर शेवटी प्रा. प्रशांत बोंपिलवार यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. दीप्ती उबाळे, निशिकांत गायकवाड, गजानन हंबर्डे यांनी परिश्रम घेतले.

ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे विद्यार्थी नाट्य, चित्रपट, संगीत, नृत्य या कलाक्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहकार्यातून विद्यार्थ्यांसाठी विविध संसाधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी संकुलाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकडून स्वयंस्फूर्तीने दशलक्ष रुपयांचा निधी उभा केला जात आहे. अशी माहिती संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments