seek help from Yeta Sankat Balakawari ; येता संकट बालकावरी 1098 मदत करी चाईल्ड हेल्पलाईनची मदत घेण्याचे आवाहन – NNL

नांदेड | आपल्या आजुबाजुला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैगिंक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत मिळण्यासाठी 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे.


अशा बालकांना कोठून व कशी मिळवून देता येईल, या करीता कोठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. हा संभ्रम न ठेवता 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अश्या संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत / संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. सदर सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24/7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध् आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वत:घेवू शकतो किंवा इतर कोणतीही सदर सेवेव्दारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. या निवेदनाव्दारे 1098 या टोल फ्रि क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मत करावी असे अवाहन आयुक्त महिला व बाल विकास डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.





