नांदेड| नांदेडच्या दोन कराटे प्रशिक्षकांनी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. या विजयामुळे नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, नवोदित खेळाडूंना मोठ्या प्रेरणेचा स्रोत मिळाला आहे. दिनांक 21 रोजी कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या वतीने राष्ट्रीय पंच परीक्षत नांदेडच्या एकनाथ पाटील ,आकाश भोरे, कराटे प्रशिक्षकांनी भाग घेऊन यश संपादन केले आहे.


पुण्यात द कल्यानी स्कूल हडपसर येथे घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील सचिव तथा मुख्य प्रशिक्षक एकनाथ पाटील आकाश भोरे यांनी नांदेड जिल्ह्यातून सहभागी झाले होते. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून 260 प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता सर्व प्रशिक्षकांनी लेखी व प्रात्यक्षिक चाचणी उत्कृष्ट कामगिरी करत परीक्षेत कसोटी उत्तीर्ण करत राष्ट्रीय पंच परीक्षेत यश मिळवले.


त्यामध्ये एकनाथ पाटील आकाश भोरे जज A प्रकारात या यशस्वी कराटे प्रशिक्षकांना कराटे इंडियाचे अध्यक्ष हंसी भरत शर्मा यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व बॅच व टाय प्रदान करून गौरविण्यात आले. कराटे डॉ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष सिंहास अलाउद्दीन अंसारी सचिव सिंह संदीप गाडे उपस्थित होते वरील प्रशिक्षकाचे अभिनंदन सिहान विराफ वाचा नांदेड चे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ठोंबरे अनुराधा शिंदे यांनी अभिनंदन केले.




