लोहा l जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये आतकवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या हल्ल्यात पंचवीसहून अधिक पर्यटकांची हत्या केली त्या निषेधार्थ लोहा शहरात “आज शनिवारी ( ता २६ ) सर्व पक्षीय बंदची हाक देण्यात आली असून तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे .व्यापारी व जनतेनी बंद मध्ये सहभागी व्हावे व शांततेत बंदपाळावा असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांनी केले आहे


पहलगाम (काश्मीर) येथे आतकवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करुन पर्यटकांची निर्घृण हत्या केली।. त्यांना धर्म विचारला .या अमानवीय घटने नंतर देशभरात असंतोष पसरला आहे.


या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज शनिवारी सर्व पक्षीय लोहा बंद”चे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व व्यापारी बंधु, सर्व असोसिएशन व सर्व शाळा, ट्युशन व सर्वच लोहा बंद मध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, भाजपाचे उत्तर मंडळाध्यक्ष शरद पवार, काँग्रेस।पक्षाचे माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे ,शिवसेना उबाठा सुरेश हिलाल, शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण, मारुती पाटील बोरगावकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार, दिनेश तेललवार , राम पाटील सुधाकर पाटील।यासश कार्यकर्ते उपस्थित होते




