नवीन नांदेड l जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हडको येथे सर्व पक्षीय, सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व पत्रकार यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आल्या यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम् घोषणा देण्यात आल्या. जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर काल 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला यात भारतातील महाराष्ट्र सह अनेक राज्यांतील पर्यटक गोळीबारात मृत्यू मुखीं झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाले.


या झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हडको येथे सर्व पक्षीय हडको येथे 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भारत माता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम् घोषणा देण्यात आल्या.


यावेळी संजय पाटील घोगरे,वैजनाथ देशमुख, धिरज स्वामी,डॉ.नरेश रायेवार,डॉ.अशोक कलंत्री,राजु लांडगे, विनोद कांचनगिरे, भि.ना.गायकवाड, सचिन रावका, सम्राट आढाव, गजानन चंदेल,शाहीर गौतम पवार,चंचलसिंग जाट,विठ्ठल गायकवाड,डुमणे,प्रमोद रेवणवार, राजन जोजारे, भुजंग मोरे,विनोद पाटील, यांच्या सह ग्रामीण पोलीस स्टेशन वाचक शाखेचे बालाजी दंतापल्ले, बालासाहेब टरके,पोहेकाॅ मारोती माने यांच्या सह जेष्ठ नागरिक, विविध प्रतिष्ठानाचे नागरीक ,युवक, पत्रकार ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.




