हदगांव, शेख चांदपाशा। हदगांव विधानसभा क्षेत्राचे आ. बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी निवडून येताच जाने -2025 ला हदगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रशासकीय आढावा बैठकीनंतर जनता दरबार लावला होता. त्यावेळी हदगाव तालुक्यातील जनतेचे काही प्रमाणात प्रश्न तेथेच निकाली काढण्यात आले होते. जनता दरबारच्या समारोपाच्या वेळी दर तीन महिन्यांनी जनतेच्या तक्रारी ऐकण्यात येतील असं ठणकावून विद्यमान आमदार यांनी सांगितले. त्या अनुषंगाने नागरिक आज जनता दरबारच्या प्रतीक्षेत आहे.
हदगाव शहरात व तालूक्यात सध्या लग्नसराई मौसम व इतर कार्यक्रमाच रेलचेल आहे. बहुसंख्य राजकीय नेते मंडळीची हजेरी लावण्यासाठी धावपळ होत असल्याने हदगाव शहरातील व तालुक्यातील प्रशासनावर त्यांचं वचक असल्याचे दिसुन येत नाही. कारण महसुल, कृषी, वन विभागाच्या वतीने शासनाच्या कोणत्या योजना आहेत ते सांगण्यासाठी तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना वेळ नाही ही वस्तुस्थिती पाहायावास मिळत आहे.
सरलेल्या आठवड्यात हिगोली लोकसभाचे खा. नागेश पा. आष्टीकर यांनी पाणी टंचाईची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला सुमारे 50% अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याची माहिती मिळाली. खासदारांनी वैतागून प्रशासना वर नाराजी व्यक्त केली होती. तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक आपल्या कामाकरिता शहरातील विविध शासकीय कार्यालयमध्ये चकरा माराव्या लागत असल्याच दिसुन येत आहे.
नेत्यांना इतर कामात हजेरी लावण्यासाठी वेळ तारखांचा मेळ घालवयाचा तर हदगाव तालुक्यातील नेते मंडळीना या करिता त्यांची चांगलीच धावपळ होताना दिसुन येत आहे. या लग्नघाईत व इतर अन्य कार्यक्रमाना हजेरी लावतांना माञ जनतेच्या समस्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कारण साध्या हदगांव शहरात केवळ छोट्याशा तांत्रिक अडचणीमुळे जरा तीन ते चार दिवसापासून पाणीपुरवठा शहराला होत नाही. ही वस्तुस्थिती असल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचा वैतागलेले दिसुन येत आहेत. अणखी विशेष म्हणजे शासनाकडे टाकलेल्या सोयाबीनच मोबदल्या करिता एका शेतकरी पत्रकाराला आमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागत आहे.
नैसर्गिक डोगरांनी नटलेलया टेकड्यावर विकास उध्वस्त होताना दिसून येत आहे. प्रशासन किती मुजोर झाले याचा प्रत्यय येतो आहे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या कामाकरिता नेत्यांचे गाव किवा शहराच्या ठिकाणी भेटतील म्हणून अनेक जण चकरा मारत असतांना दिसुन येत आहेत. माञ लोकप्रतिनिधीना फोन लावला त्यांचा फोन कोणी तरी त्यांच्या जवळचा उचलतो सुदैवाने फोन एखादया लोकप्रतिनिधीला लागला तर तुरळक बोलून बोळवण केली जाते अशी सध्या स्थिती दिसून येत आहे.
जनता दरबार हवा…!हदगाव तालुक्यात खरिप हंगाम व शहरातील नागरी समस्याच्या पार्श्वभूमीवर जनता दरबार हवा अशी सर्व सामन्य नागरिक अशी अपेक्षा व्यक्त करतांना दिसून येत आहे.

