नांदेड| रक्षाबंधन हा एक शब्द नसून बहिण भावाचं अधिक घट्ट करणारा,भावनात्मक नाते वृध्दिंगत करणारा उत्सव होय. हा उत्सव बहिणीचे रक्षण करण्याची जाणीव करुन देत कुठल्याही दुःखात, संकटात भाऊ पाठिशी खंभीर उभा आहे.



याच बळ देणारा हा उत्सव. बहिण भावाच्या नात्याचा भावस्पर्शी उत्सव म्हणजे रक्षाबंधन. या उत्सवा निमित्त अक्षर परिवार वाजेगाव अंतर्गत वाजेगाव, वांगी, ब्राम्हणवाडा,फत्तेपूर ,सिध्दनाथ, वाडिपुयड,पुणेगाव, नागापूर याशाळेसह तेरा शाळेत केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या प्रेरणेने जात-पंत धर्म विसरुन सामाजिक बंधुता समतेचा संदेश देत शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या शाळेतील,वर्गातील सहकारी बंधुंना राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला.



तसेच अक्षर परिवारातील शिक्षिका भगिनींनी सौ वैशाली कुलकर्णी, सौ धम्मदीना सोनकांबळे, सौ अनिता कल्याणकर, श्रीमती वर्षा पटणे यांनी आपल्या सहकारी शिक्षक बंधुना राखी बांधुन बहिण भावाच नात हे रक्ताचच नातं नसून ते भावनांचे नाते आहे. रक्ताच्या नात्या पेक्षाही मानलेली नाती श्रेष्ठ असतात.हे अक्षर परिवारातील रक्षाबंधन उत्सवातून दिसून आले.या बदल साहित्यिक व्यंकटेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे यांनी अभिनंदन केले.





