नवीन नांदेड l तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे 20ते 27फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून 27 फेब्रुवारी रोजी हभप शैलेश महाराज कामठेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे.


सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमीत्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे दि. 20 दि. 27 फेब्रुवारी पर्यंत ह.भ.प. राजेजी महाराज, हनुमान मंदिर पुजारी, विष्णुपूरी यांच्या कृपाशिर्वादाने तसेच ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजीत केलेला आहे.

दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन सकाळी 7 ते 9 शिवलिलामृत पारायण, सकाळी 11ते 12 गाथा भजन सायं. 6 ते 7हरीपाठ व रात्री 8 ते 10 हरी किर्तन,किर्तनकार,ह.भ.प. शिवशंकर महाराज डेरलेकर ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, ह.भ.प. सुधिर महाराज पळशीकर, ह.भ.प. राम महाराज सुगावकर,ह.भ.प. पवन महाराज येस्तास्कर, ह.भ.प. भगवान महाराज सेंद्रेकर,ह.भ.प. वैजनाथ कागदे (बापू) महाराज उमरीकर ह.भ.प. शैलेश महाराज कामठेकर (काल्याचे किर्तन व महाप्रसाद) रात्री 8ते 10 व सकाळी 8 ते 10 बुधवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वा. अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर , काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या हस्ते श्री काळेश्वर भगवानचा महाअभिषेक होईल. तसेच रात्र ते पहाटे या वेळेत इतर सर्वांचे नोंदणी पद्धतीने अभिषेक होतील,संगीत भजन रात्री 11 ते पहाटे होणार आहे.

या सप्ताह मध्ये पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील भजनी मंडळ सहभागी होणार आहेत . या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन अध्यक्ष माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर उपाध्यक्ष सौ.अमिता ताई चव्हाण सचिव शंकरराव हंबर्डे कोषाध्यक्ष: उत्तमराव हंबर्डे सदस्य मोहनराव हंबर्डे, रावसाहेब हंबर्डे, धारोजीराव हंबर्डे, गणेश धनमणे, बालाजीराव हंबर्डे, सतिश भेंडेकर समस्त गावकरी मंडळी, विष्णूपूरी ता. जि. नांदेड यांनी केले आहे.
