Vishnupuri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजन
नवीन नांदेड l तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे 20ते 27फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून 27 फेब्रुवारी रोजी हभप शैलेश महाराज कामठेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे.
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमीत्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे दि. 20 दि. 27 फेब्रुवारी पर्यंत ह.भ.प. राजेजी महाराज, हनुमान मंदिर पुजारी, विष्णुपूरी यांच्या कृपाशिर्वादाने तसेच ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजीत केलेला आहे.
दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन सकाळी 7 ते 9 शिवलिलामृत पारायण, सकाळी 11ते 12 गाथा भजन सायं. 6 ते 7हरीपाठ व रात्री 8 ते 10 हरी क...
