HomeनांदेडMahur ; स्व. आमदार प्रदीप जी नाईक यांच्या स्मरणार्थ माहूर शहर राष्ट्रवादी...

Mahur ; स्व. आमदार प्रदीप जी नाईक यांच्या स्मरणार्थ माहूर शहर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने पाणपोई चे उद्घाटन !

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन स्व. आमदार प्रदीप जी नाईक यांच्या स्मरणार्थ माहूर शहर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, टी पॉईंट व बसस्थानक परिसरात प्रवाशी, नागरिकांसाठी व तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर या तालुक्याच्या ठिकानी ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांना व भाविकांची तहान शमवण्या साठी थंड पाण्याच्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.पाणपोईचे उद्घाटन दिनांक ४ मे रोजी जेष्ठ नागरिक मोहन पवार यांच्या हस्ते फीत कापून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांच्याहस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ रंभ करण्यात आला.

सध्याला दिवसे न दिवस वाढत असलेल्या उन्हाचा चटका सर्वांना जाणवत असले तरी उदर निर्वाहासाठी नागरिकांना उन्हात कामानिमित्त घराबाहेर पडणे गरजेचे असते. माहूर परिसराला अनेक गावांचा संपर्क असल्यामुळे, शेतमजूर, कामगार व प्रवाश्यांची सह भाविकांची येथे नेहमी वर्दळ असते.अशा कडाक्याचा उन्हाचा परिस्थितीत प्रत्येकाला थंड पाण्यासाठी बाटली बंद पाणी विकत घेणे परवडत नसल्याने अनेक नगरिकांची तहान अर्थिक परिस्थिती मुळे भागत नाही.

अशा परिस्थितीत एक सामाजिक बांधिलकी जोपासत माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या पुढाकाराने स्व.आमदार प्रदीप नाईक यांच्या स्मरणार्थ परिसरातील नागरिकांसाठी थंड पाण्याच्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,सभापती विजय कामटकर,सभापती प्रतिनिधी माजी नगरसेवक रफीक सौदागर,नगरसेविका प्रतिनिधी इरफान सय्यद,सभापती प्रतिनिधी रणधीर पाटील, नगरसेविका प्रतिनिधी निसार कुरेशी,नगरसेवक प्रतिनिधी सुमित खडसे,राजू सौंदलकर,विक्रम राठोड, अफसर आली,शेख आरिफ, देवी भाऊ पेंटर, जावेद दोसानी,आकाश राठोड,विकास राठोड, यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments