हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (Rashtriya Swayamsevak Sangh) यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संघाचे सहा प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला विजयादशमी उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.


हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात, दिनांक २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त हा उत्सव संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दामोदर राठोड (सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी) तर प्रमुख वक्ते म्हणून नागेश कल्याणकर (सामाजिक सद्भाव प्रमुख, नांदेड विभाग) उपस्थित राहणार आहेत.


विजयादशमीनिमित्त (Vijayadashami festival) आयोजित कार्यक्रमास तालुक्यातील स्वयंसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कार्यवाह गजानन जाधव तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाढोणा शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.




