नांदेड| विमानतळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणत मोठा यश संपादन केलं आहे. या कारवाईतून सुमारे ₹10,00,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकुण 5 गुन्हयात्तील 82 ग्रॅम सोन्याचे दागीणे व एक पल्सर मोटर सायकल मुद्देमाल जप्त केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मागील गुन्हे उघडकीस आणण्याचे पाहीजे असलेल्या फरारी आरोपीचा शोध घेणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.30/07/2025 रोजीचे 21.00 वाजेच्या सुमारास विमानतळ हद्दीतील फिर्यादी उर्मीला लक्ष्मणराव सोनटक्के, वय ५५ वर्षे,रा नाईक नगर नांदेड या त्यांचे मुली सोबत शतपावली करीत असतांना दोन अनोळखी इसमांनी पल्सर मोटर सायकल वर येवुन फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची चैन जबरीने चोरुन नेली.

यावरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुर नं गुर.न. २८९/२०२५ कालम ३०९ (४) मा.न्या.सा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेबुन पो स्टे विमानतळ येथील पोलीस निरीक्षक सितांबर कामठेवाड यांनी पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी अंमलदार यांना सदर गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश देवून हद्दीत रवाना केले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयासंबंधाने सि सि टी व्ही फुटेज तपासले. तांत्रीक मदत घेत तपास करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की, आसना ब्रिज खाली दोन इसम हे संशयीतरित्या थांबलेले आहेत. त्यावरुन पथकाने सदर ठिकाणी जावुन त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली.


यामध्ये ।) महेश बबन देवकत्ते, वय 26 वर्ष रा. आंवानगर सांगवी, नांदेड 2) सय्यद जाकेर सय्यद जफर, वय 28 वर्षे, रा.महेबुब नगर नांदेड असल्याचे सांगीतले त्यांच्या ताब्यात असलेल्या पल्सर मोटार सायकल च्या कागदपत्रा बाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशयावरुन सदर दोन्ही आरोपीना विमानतळ येथे आणून त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली. सदर दोन्ही आरोपींनी गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयात अटक करुन न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयांनी आरोपींना दोन दिवसांचा पिसी आर दिला.

आरोपीकडे अधीक तपास केला असता आरोपींकडून गुन्हयातील गेला माल सोन्याचे दागौणे एकूण 82 ग्रॅम वजनाचे व गुन्हयात वापरलेली पल्सर 220 मोटर सायकल असा एकुण 10,00,000/-रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सुरु असून आरोपीकडून इतर काही गुन्ह उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरील पोलोस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

