किनवट, परमेश्वर पेशवे| डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अंतर्गत आदित्य चव्हाण यांना आपलिकेशन ऑफ जीआय एस अँड रिमोट सेन्सिंग ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट पैनगंगा अभयारण्य सेंचुरी यवतमाळ महाराष्ट्र या विषयावरील प्रबंधासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भवन विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेऊन तेथे प्रादेशिक अस्मिता दसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांनी प्रबंध पूर्ण केला.


त्यावेळी बाह्य परिषद म्हणून डॉक्टर विनायक दिलीप संचालक प्रति विज्ञान विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी काम पाहिले यावेळी पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर एमबी मुळे अधिक स्थानी होते. आदित्य चव्हाण यांच्या यशाबद्दल त्यांना किनवट येथील सरस्वती भवन विद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.


यावेळी प्राध्यापक गजानन सानप व्यवस्थापन परिषद सदस्य हे उपस्थित होते कार्यक्रमाला निवृत्त प्रोफेसर डॉक्टर नाईक डॉक्टर शंकरवार सहयोग प्रोफेसर महाडेकर डॉक्टर महाडेकर प्राध्यापक दासे ओंकार जोगदंड यांनी सहकार्य केले. आदित्य चव्हाण हे प्राध्यापक जयवंत चव्हाण यांचे पुत्र आहेत. त्यातच किनवट मधील अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.




