लोहा| जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने लोह्यात माजी नगराध्यक्ष मुकदम याच्या निवासस्थानी भेट दिली.पूजाअर्चा झाल्या नंतर मुकदम।परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.


महालक्ष्मी सणाच्या दिवशी लोह्यात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरजकुमार गुरव हे लोह्यात आले होते .प्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉ दिनेश चव्हाण-मुकदम त्याचे मित्र आहेत .लोहा कंधार तालुक्यातील सुसंस्कृत , राजकीय सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या प्रमुख कुटुंबा पैकी मुकदम यांचे एक कुटुंब आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक गुरव यांनी माजी सभापती व माजी नगराध्यक्ष मुकदम याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

महालक्ष्मी सण होता त्यांनी दर्शन घेतले आरती केली .त्यानंतर मुकदम कुटुंबाच्या वतीने सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम -चव्हाण यांनी सत्कार केला. यावेळी सेवानिवृत्त अभियंता नारायणराव चव्हाण, भूविकास बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक माधव मुकदम, प्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉ दिनेश चव्हाण, युवा कार्यकर्ते सचिन मुकदम उपस्थित होते. बंदोबस्तातच्या व्यस्तेतून वेळ काढत एडीशनल एसपी सूरज गुरव हे कौटूंबिक गप्पांत रमले.
