नांदेडमहाराष्ट्रमुंबई

100 Days ; शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक

नांदेड। शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेत विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर पाच कार्यालय असून चार कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी या नेत्रदीपक कामगिरी बद्दल या सर्व कार्यालयांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरीत तालुका स्तरीय शासकीय कार्यालयात नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर, तहसिलदार नांदेड, उपअधिक्षक भूमि अभिलेख नांदेड, उपअभियंता म.जी.प्रा. नांदेड, उपअभियंता पाणी पुरवठा भोकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी किनवट या सहा कार्यालयांचा यात समावेश आहे.

द्वितीय क्रमांक उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार, पोलीस निरीक्षक भोकर, वन परिक्षेत्र अधिकारी माहूर, पशुधन विकास अधिकारी नांदेड, शहर उपविभाग 1 नांदेड उपअभियंता महावितरण या पाच कार्यालयांना मिळाला आहे.

तर तृतीय क्रमांक दुय्यम निबंधक उमरी, तालुका वैद्यकिय अधिकारी मुदखेड, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, मुख्याधिकारी नगरपरिषद देगलूर या कार्यालयांना मिळाला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button