नांदेड| अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या महातपस्वी ष.ब्र.१०८ श्री सद्गुरू पंचाक्षर शिवाचार्य यांचा ११८ वे जन्मोत्सव २०२५ सोहळ्यात युवा भूषण वैजनाथ स्वामी यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव दि. १७ जानेवारी रोजी केला जाणार आहे.
महातपस्वी ष.ब्र.१०८ श्री सद्गुरू पंचाक्षर शिवाचार्य यांचा ११८ वे जन्मोत्सव २०२५ सोहळ्याचे आयोजन अकोला येथे करण्यात आले असून, श्री श्री श्री १००८ श्रीमद् काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्यात दि. १७ जानेवारी २५ शुक्रवार सकाळी ८.३० वा. अकोला येथे जगदगुरूंचे भव्य मिरवणुक व धर्मसभा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहेत.
अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय सचिव प्रवक्ते असलेले संबंध महाराष्ट्रात आपल्या सामाजिक कार्याची छाप सोडणारे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त वैजनाथ स्वामी यांचा या सोहळ्यात जगद्गुरु व अनेक मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक
सद्गुरू ष.ब्र.१०८ श्री. सदगुरू डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र मन्मथधाम संस्थान यांनी वैजनाथ स्वामी यांना समितीच्या वतीने निमंत्रण दिले आहे. वैजनाथ स्वामी यांचे सामाजिक आरोग्य शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.स्वामी यांना अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले असून १७ जानेवारी रोजी होणाऱ्या गौरव सत्कारासाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.