Vaijnath Swami : युवा भूषण वैजनाथ स्वामी यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव – NNL
नांदेड| अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या महातपस्वी ष.ब्र.१०८ श्री सद्गुरू पंचाक्षर शिवाचार्य यांचा ११८ वे जन्मोत्सव २०२५ सोहळ्यात युवा भूषण वैजनाथ स्वामी यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव दि. १७ जानेवारी रोजी केला जाणार आहे.
महातपस्वी ष.ब्र.१०८ श्री सद्गुरू पंचाक्षर शिवाचार्य यांचा ११८ वे जन्मोत्सव २०२५ सोहळ्याचे आयोजन अकोला येथे करण्यात आले असून, श्री श्री श्री १००८ श्रीमद् काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्यात दि. १७ जानेवारी २५ शुक्रवार सकाळी ८.३० वा. अकोला येथे जगदगुरूंचे भव्य मिरवणुक व धर्मसभा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहेत.
अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय सचिव प्रवक्ते असलेले संबंध महाराष्ट्रात आपल्या सामाजिक कार्याची छाप सोडणारे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त वैजनाथ स्...
