Wednesday, May 13

Hadgaon Crime News : हदगाव शहरात मध्यरात्री झालेल्या घरासमोरील वादाचा रक्तरंजित शेवट

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील आझाद चौक, बागवान गल्ली परिसरात मध्यरात्री घरासमोरून सुरू झालेल्या क्षुल्लक वादाचा शेवट थेट प्राणघातक ठरला. जोरजोरात बोलण्यावरून उफाळलेल्या वादातून झालेल्या विटेच्या हल्ल्यात एका फळविक्रेत्याचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 12.15 वाजता काही आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर उभे राहून मोठ्याने बोलत होते. याबाबत जाब विचारल्याने वाद विकोपाला गेला. या वादातून आरोपींनी शेख नयूम शेख इस्माईल बागवान (वय 46, रा. बागवान गल्ली, आझाद चौक, हदगाव) यांच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार केला.

या हल्ल्यात शेख नयूम गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने विष्णुपुरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 29 जानेवारी 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्ह्यातील संबंधित कलमांमध्ये वाढ केली आहे.

या प्रकरणी मृताचे नातेवाईक सुलताना बी शेख नयूम शेख बागवान यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 23/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी शेख आसिफ शेख युसुफ, शेख शोयब शेख युसुफ, शेख आतिक शेख युसुफ, शेख हसन शेख कश्मीरी आणि शेख युसुफ शेख कश्मिरी (सर्व रा. बागवान गल्ली, आझाद चौक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, हदगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्याशी संपर्क साधला असता, उर्वरित आरोपींनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!