नांदेड| शासनाने बंदी घातलेला गुटखा सप्लाई करताना किशोर प्रल्हादराव देशमुख वय 34 रा. ओमकार इंग्लीश स्कुल चे पाठीमागे कौठा, नांदेड आणि अजीम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली असून, राजनिवास, विमल पान मसाला, मुसाफीर, रजनीगंधा, सिग्रीचर, बाबा 120 तंबाखु, वजीर गुटखा असा एकूण १ लक्ष 18 हजार 732 रुपयाचा गुटख्याच्या मुद्देमालसह एक आरोपी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिक्षक, अबिनाश कुमार नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयावर कारवाई करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. हदीत गुन्हे शोध पथक हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यातील इसम हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला राजनिवास, विमल पान मसाला, मुसाफीर, रजनीगंधा, सिग्नीचर, बाबा 120 तंबाखु, वजीर गुटखा विकत आहे. त्यावरुन आम्ही सदर ठिकाणी जावुन छापा मारला असता वरील विविध कंपनीचा गुटखा असा एकुण 1,18,732/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या साठा मिळुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन पो स्टे ला आणुन पो स्टे नांदेड ग्रामीण येथे गुरनं 907/2024 कलम 123,274,275 भारतीय न्याय संहिता अन्वयें गुन्हा दाखल आहे.
गोपनीय माहितीवरुन दिनांक 08/10/2024 रोजी वेळ 16.40 वा आरोपीचे घरी ओमकार इंग्लीश स्कुल चे पाठीमागे कौठा, नांदेड येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा, यांचे मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रा. महेश कोरे, पोलीस उप निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रा. यांनी पोलीस अंमलदार सत्तार शेख, संतोष जाधव, विक्रम वाकडे, पोकों मारोती पचलिंग, असीफ शेख, माधव माने, शंकर माळगे, ज्ञानेश्वर कलंदर, सुनिल गटलेवार, शिवानंद तेजबंद सर्व नेमणुक गुन्हे शोध पथक पो.स्टे. नांदेड ग्रा. याना घेऊन हि कार्यवाही केली आहे.