नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष नांदेड उत्तर विधानसभेच्या वतीने आयोजित बैठकीत उत्तर विधानसभा कार्यकारिणीचा विस्तार करुन नव्याने काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षामध्ये आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील असंख्य युवकांनी पक्ष प्रवेश केला.


राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत काही निवडी करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी विशाल पोपळे, जिल्हा सरचिटणीस पदी सतिष कदम, जिल्हा सचिव पदी शेख फिरोज व नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष पदी अंबादास पाटील जोगदंड आणि तालुकाउपाध्यक्ष पदी चेतन लबडे या सर्व पदाधिकार्यांच्या निवडी करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..! या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिलजी कदम होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाकार्याध्यक्ष भास्कर दादा भिलवंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी,शहर जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापुरकर, सय्यद मौला, उत्तर विधानसभा अध्यक्ष गजानन वाघ ,


विधानसभा कार्याध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक शेख अब्दुल्ला भाई ,युवक जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, विक्रम नागशेट्टीवार, मार्केट कमिटीचे संचालक नानासाहेब पोहरे, युवक जिल्हाउपाध्यक्ष गणेश जगलपुरे, दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर, अर्धापुर तालुकाध्यक्ष गजानन लढे,मुदखेड तालुकाध्यक्ष केशव पाटील मुंगल, ज्ञानेश्वर कदम, गजानन गोरख यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षप्रवेश कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम,ग्रामीण कार्यध्यक्ष भास्करदादा भिलवंडे, जिल्हासरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर, मार्केट कमिटीचे संचालक नाना पोहरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणे केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अश्विन सरोदे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्ते सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. अश्विन सरोदे यांच्या नेतृत्वात बळीराम ढाने ,शशिकांत सूर्यवंशी,निलेश मोरे, साईनाथ खाणसोळे,आशू गायकवाड, सुयश आवदुते ,योगेश शिखरे, रोहन कावळे,आदित्य सोनकांबळे,स्वराज चावरे,आदित्य भोरगे,अभिषेक वाघमारे,ओम शिकारे, रोहन सरोदे,विनय सरोदे,शंकर जोगदंड,ओंकार राजेगोरे, चक्रधर मुंगल, सतीश कदम,मारोती कदम,प्रशांत कांबळे,प्रतीक बारहाळीकर विश्वजीत सोनकांबळे,सचिन हिलपवाड,बंटी कांबळे,साई शिंदे,सिद्धांत सरोदे यांचा पक्षप्रवेश झाला व यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी भास्करराव भिलवंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी व युवक राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम ,जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर, सय्यद मौला, माजी नगरसेवक शेख अब्दुल्ला भाई , ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी,उत्तर विधानसभा अध्यक्ष गजानन वाघ, विधानसभा कार्याध्यक्ष जयेंद्र पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, विक्रम नागशेट्टीवार, मार्केट कमिटीचे संचालक नानासाहेब पोहरे,आदिनी सत्कार केला.