नांदेड| रोटरी क्लब नंदीग्राम आणि नांदेड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दीना निमित्त भव्य रक्तदान शिबीर व फ्री डायबेटिस टेस्ट शिबीर पोलीस मुख्यालय नांदेड येथे याचे आयोजन केले होते.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांनी फित कापून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी पोलिस उप निरीक्षक (गृह) डॉ. श्रीमती अश्विनी जगताप मॅडम आणि राखीव पोलीस निरीक्षक श्री विजय धोंडगे हे उपस्थित होते. एकूण 33 जण रक्तदान केले आणि 200 लोकांचे शुगर आणि ब्लड प्रेशर तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
रोटरी क्लब नंदीग्राम चे अध्यक्ष रो. रेखा गरुडकर, सचिव रो. डॉ. सुरभी राठोड, क्लबचे उप प्रांतपाल रो. मुरलीधर भुतडा , प्रकल्प प्रमुख रो. डॉ. शुभांगी पतंगे, रो. डॉ. करुणा पाटील, रो. डॉ. पुष्पा गायकवाड, रो. डॉ. गायत्री वाडेकर, रो. दुर्गा गिरी, रो. सुनंदा देवणे, रो. जयश्री राठोड, रो. डॉ. अनुराधा राऊत, रो. डॉ. बि. आर. मालू, रो.प्रशांत देशमुख, रो.उमेश गरुडकर, हे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पोलीस दत्तात्रय गायकवाड व सहकारी यांनी खूप मदत केले.