नांदेड| येथील नाईक नगर भागातील रहिवासी तथा संगणक अभियंता महेंद्र गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दिनांक 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे खासगी उपचारादरम्यान निधन झाले .
ते संपूर्ण मित्र परिवारात प्रथितयश संगणक अभियंता म्हणून ओळखले जात त्यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून कायम अव्वल क्रमांक पटकावित एक हुशार संगणक अभियंता पदापर्यंत मजल मारली होती, त्यांनी राज्य शासनाच्या अनेक संगणकीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी आपल्या कारकिर्दीत केली होती त्यांच्या जाण्याने जुन्या काळातील संगणकीय अभियंत्यांच्या वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथील गोवर्धन घाट समशानभूमी दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 9 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, मुलगा , मुलगी व पत्नी असा मोठा परिवार आहे