नांदेड| सर्वसामान्य नागरिकांचे सातत्याने प्रश्न सोडवून लोकसभेत कामकाज करताना प्रभावीपणे काम करून आपले नावलौकिक करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्यावतीने दि. 20 जुलै रोजी नांदेड शहरातील तुलसी कन्फर्ट येथे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कदम बोलत होते.
या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री कमलकिशोर कदम तर सत्कारमुर्ती खा. वसंतराव चव्हाण,खा. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती. तसेच,व्यासपीठावर एकनाथ मोरे,माजी उप महापौर आनंद चव्हाण,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,प्रकाश मारावार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे, प्रमोद खेडकर, बबन बारसे, सुभाषराव कदम, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर,माजी उपमहापौर अब्दुल गफार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे, विठ्ठल पावडे,मसूद खान, शमीम अब्दुल्ला, महेश खेडकर, रऊफ जमिनदार, मुन्ना आब्बास, कल्पना डोंगळीकर, सिंधूताई देशमुख,प्रांजली रावणगावकर, प्रा. मजरोद्दीन, महेश देशमुख,यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या शुभहस्ते नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण व हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले की, कै.बळवंतराव चव्हाण हे माझे सहकारी होते.त्यांचा मुलगा वसंतराव चव्हाण हे खासदार झाले.तसेच,कै.बापुराव पाटील आष्टीकर हे देखील माझे सहकारी होते. त्यांचेही चिरंजीव नागेश पाटील आष्टीकर हे खासदार झाले.ही बाब अत्यंत आनंदाची आहे. भारताच्या लोकसभेमध्ये त्यांनी प्रभावीपणे नेतृत्व करून आपल्या भागाचा विकास करावा. सर्वांना सोबत घेऊन विकास झाला पाहिजे, असे म्हणत त्यांनी पद्मश्री शामरावजी कदम यांनी 150 संस्थेचे अध्यक्षपद सांभाळून प्रभावी काम केले. आता नांदेड जिल्ह्यात सक्षमपणे नेतृत्वाने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय – खा.आष्टीकर
राष्ट्रवादीसोबत पुर्वीपासून आमचे स्नेहाचे संबंध असून माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी एकेकाळी शंकरराव आणि अशोकराव चव्हाण यांना राजकारणामध्ये पुरून उरले होते, असे अनुभवी नेते ते आहेत.त्यांच्यासोबत कै. बापुराव पाटील आष्टीकर,कै.बळवंतराव चव्हाण यांची देखील साथ होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने प्रभावी काम केले. पैशाने सगळ्या गोष्टी होत नाहीत, ही बाब या निवडणुकीतून सिद्ध झाली म्हणूनच धनशक्तीविरुद् जनशक्तीचा विजय झाला माझ्यासह इंडिया आघाडीने मोठे यश संपादन केल्याचे यावेळी खा.नागेश पाटील आष्टीकर म्हणाले..
अशोक चव्हाण भाजपात गेले नसते तर मी खासदार झालो नसतो – खा. चव्हाण
माझे वडिल कै.बळवंतराव चव्हाण आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आपल्याला राजकारणाचे बाळकडू दिले.पद्मश्री शामरावजी कदम आणि शंकरराव चव्हाण यांचे दोन गट त्यावेळी राजकारणात सक्रिय होते.आम्ही पद्मश्रींसोबत होतो. पुर्वीपासूनच आपले राष्ट्रवादीसोबत स्नेहाचे संबंध आहेत.या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी प्रचार केला. त्यामुळे यश संपादन करता आल्याचे स्पष्ट करुन काॅग्रेसचे तत्कालीन नेते अशोक चव्हाणांनी भाजपामध्ये प्रवेश केला नसता तर त्यांनी मला खासदार होण्याची संधी उपलब्ध करून दिली नसती.ते भाजपात गेल्यामुळेच आपण खासदार झालो असे खा. वसंतराव चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच,अंतकरणाने लोकांनी प्रेम दिले,त्यामुळे खासदार झालो. माझ्या पहिल्या सभेचे मानकरी माजी मंत्री कमलकिशोर कदम हे होते. त्यांचे सहकार्य विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत समन्वय आवश्यक -डॉ. सुनील कदम
यावेळी प्रास्ताविकातून भूमिका विषद करतांना आयोजक डाॅ.सुनिल कदम म्हणाले की,लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे काम केले.त्यामुळे नांदेडमध्ये खा. वसंत चव्हाण यांचा विजय झाला.तर, हिंगोलीमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रभावी काम केले, त्यामुळे खा.नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाले.महाविकास आघाडीचा धर्म राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाळला.आता आगामी विधानसभा निवडणूक लढविणार्या उमेदवारांची संख्या वाढत आहे. नेते मंडळींनी योग्य निर्णय घेऊन पुढील उमेदवार ठरवावे,महाविकास आघाडीमध्ये समन्वय ठेवावा असेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार राज्यात आवश्यक असून नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व कमलकिशोर कदम यांनी करून 16 तालुक्यांमध्ये इंडियाची आघाडीची टीम तयार करावे, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी.जांभरूणकर यांनी केले तर,आभार शहर सरचिटणीस गणेश तादलापूरकर यांनी मानले. यावेळी सतिशराव शिरुरकर,हंसराज पाटील, बाळासाहेब महागांवकर, डाॅ.पार्डीकर,संजयराव कदम,धोंडिबा भालेराव,गोवर्धन पाटील,दिगांबरराव पोपळे, शिवाजीराव जाधव,माजी सभापती संजय बेळगे, धनंजय सुर्यवंशी,गजानन पांपटवार, भास्कर भिलवंडे,तातेराव पाटील आलेगावकर,लक्ष्मण भवरे,डॉ.मुजाहिद खान,नरहरी वाघ, गंगाधर कवाळे पाटील, जयेंद्र पाटील, बालासाहेब मादसवाड, सय्यद मौला,नाना पोहरे,प्रकाश मुराळकर,दत्ता पाटील तळणीकर,गजानन वाघ,राहुल जाधव,शिवानंद शिपरकर,सुभाष गायकवाड, डाॅ.परशुराम वरपडे, जर्नेलसिंघ गाडीवाले,अजिंक्यराजे देशमुख, मारोती चिवळीकर,गंगाधर महाजन,श्याम चोंडे,अमित कांबळे,माणिक देशमुख,गजानन पवार,माधव कोरे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.