HomeनांदेडChariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त...

Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL

उस्माननगर| दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिनी पंढरपूर म्हणून वारकरी सदभक्त मंडळींचे श्रध्दास्थान असलेल्या येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु.)ता.लोहा येथील श्री. संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज संस्थान यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी रथ प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१७ जूलै २०२४ रोजी सकाळी ६ वा. महापुजा / व अभिषेक, त्यानंतर सकाळी ८ वा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज मंदीरा पासून ते कलंबर खु., भोपाळवाडी. फाटा ते परत मंदीराकडे पायी रथ प्रदक्षिणा करून अगमण होईल. दुपारी ३ ते ४ दरम्यान ह.भ.प. बापुराव महाराज सोनखेडकर यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर चहा, फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी, भजनी मंडळ यांनी पायी रथ प्रदक्षिणा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments