Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL
उस्माननगर| दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिनी पंढरपूर म्हणून वारकरी सदभक्त मंडळींचे श्रध्दास्थान असलेल्या येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु.)ता.लोहा येथील श्री. संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज संस्थान यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी रथ प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१७ जूलै २०२४ रोजी सकाळी ६ वा. महापुजा / व अभिषेक, त्यानंतर सकाळी ८ वा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत मोतीराम महाराज मंदीरा पासून ते कलंबर खु., भोपाळवाडी. फाटा ते परत मंदीराकडे पायी रथ प्रदक्षिणा करून अगमण होईल. दुपारी ३ ते ४ दरम्यान ह.भ.प. बापुराव महाराज सोनखेडकर यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर चहा, फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी, भजनी मंडळ यांनी पायी रथ प्रदक्षिणा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक यांन...
