नांदेड| महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, गुजराती हायस्कूल नांदेडचे इयत्ता पाचवी मधुन तब्बल ५० विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी ८ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत तर इयत्ता आठवी मधून तब्बल ४४ विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी १६ विद्यार्थी हे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत यात चि. अथर्व रामदास इसानकर (206 गुण) ,कु. गुंजन गजेंद्र गजेंद्र गुंडाळे (202 गुण) , चि. ऋषभ संजीवन मोरे (196 गुण), चि. अद्वैत अतुल नागरगोजे (192 गुण ) ,चि. कृष्णा विलास जाधव (186 गुण) , कु. भूमी दिनेश मारकड (184 गुण) ,कु. सौम्या सचिन कारले (182 गुण) ,चि. वेदज्ञ संतोष कुलकर्णी (180 गुण)आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
यासोबतच इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी खालिल प्रमाणे आहेत यात चि. सर्वज्ञ संतोष कुलकर्णी (256 गुण), कु. सृष्टी बालाजी बंबरुळे ( 214 गुण), चि. रुद्र विठ्ठल मारकड (214 गुण ), चि. शौर्य बालाजी वानखेडे (214 गुण), चि. शैलेश संगम नागठाणे ( 210 गुण गुण ), चि. श्रीवर्धन साहेबराव जगताप (208 गुण ), चि. ओमकार गणेश कुलकर्णी (200 गुण) ,कु. प्रिया प्रभाकर भस्के (200 गुण), कु. इबितवार अक्षरा संतोष (198 गुण),चि. हर्ष चंद्रकांत सुर्यवंशी (192 गुण), कु. अनुष्का माधव दाचावार (190 गुण) , कु. साक्षी रावसाहेब राणे (188 गुण), कु. श्रेया संतोष डोनगावे (186गुण), अभिषेक शिवराज पाटील (184 गुण), चि. यथार्थ बालाजी हुलकाने (182 गुण) व चि. सर्वेश प्रदीप सोमाणी (180 गुण) या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे गुजराती शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री केतनभाई नागडा, सचिव श्री दिपकभाई दामा तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुमठानकर सर, उपमुख्याध्यापिका सौ . मेघा जोशी मॅडम, पर्यवेक्षक श्री नायक सर, सहाय्यक पर्यवेक्षक श्री बालाजी सर यांनी अभिनंदन केले आणि सत्कार केला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्री फुलसे सर आणि इयत्ता आठवीला शिकविणारे सर्व शिक्षक यांचे तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्री सावंत सर तसेच इयत्ता पाचवीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.