नांदेड| हिमायतनगर शहरातील चाकू हल्ला प्रकरणी दोन्ही जखमींवर नांदेड येथे उपचार सुरु असल्याने पोलिसांनी खागजी रुग्नालयात जाऊन दोघांचे जवाब घेऊन दिलेल्या फिर्यादीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. एकूणच हिमायतनगर शहरात घडलेल्या चाकू हल्ल्याचा प्रकार तुम्ही आमची बदनामी का…? करता आणि जुन्या राजकीय वादावरून घडली असल्याचे पोलीस डायरीवरील नोंदीवरून समोर आले आहे. दरम्यान आज माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परमेश्वर मंदिरासमोर जमा होऊन मुख्य रस्त्याने मोर्चा काढून पोलीस ठाण्यात तासभर ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन पोलिसांना दिले.


याबाबत सविस्तर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी कि, चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कुणाल पि. रामराव राठोड वय 40 वर्ष व्यवसाय आरामशीन रा. बाजार चौक, ता. हिमायतनगर जि नांदेड मो क्रंमाक ९४२२४३०९७७ यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार दि.02/07/2024 रोजी 23:30 वाजताचे सुमारास परमेश्वर मंगल कार्यालयासमोर स्कुटीवर बसुन मोबाईल बघत आसताना आरोपी राम संजय सुर्यवंशी रा. हिमायतनगर, जि नांदेड हा फिर्यादी समोर येवून म्हणाला की, तुम्ही आमची बदनामी का..? करता असे म्हणला यावेळी फिर्यादी म्हणाला की, आम्ही तुमची बदनामी कशाला कराव. या कारणावरून आरोपीने त्याचे हातातील चाकू (खंजीर) ने फिर्यादीचे उजव्या मांडीवर मारून गंभीर जखमी केले.


तसेच शिवीगाळ करून त्याचे हातातील पंचने फिर्यादीचे डावे कानावर मारून जखमी केले. यातील साक्षीदार हा भांडण सोडवण्यास गेला आसता त्यालापण शिवीगाळ करूण जिवेमारण्याची धमकी दीली. अश्या प्रकारचा जबाब दिल्यावरून हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या आदेशाने गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 147/2024 कलम 118 (2), 352,351(2),351(3) बी. एन. एस. सहकलम 4/25 आर्म अॅक्ट अनुसार बुधवारी रात्री 23:53 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करून पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदे यांचेकडे दिला आहे.


तर दुसरा जखमी फिर्यादी राम संजय सुर्यवंशी वय 21 वर्ष व्यवसाय शेती रा. हिमायतनगर जी.नांदेड मो. 9922041444 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.02/07/2024 रोजी 23:30 वाजताचे सुमारास फिर्यादी हा शेतातून परमेश्वर मंदीर मंगल कार्यालय परीसरात आला आसता त्यास आरोपी – कुणाल रामराव राठोड रा. हिमायतनगर यांने आवाज देवून थांबविले व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. फिर्यादी म्हणाला की. मला का ..? शिवीगाळ करतो असे म्हणता मादर चोदा तुझ्या ………. असे म्हणाला आणि जुन्या राजकीय वादावरून फिर्यादीस थापडबुक्याने मारहाण केली.

तसेच तुला खतम करून टाकतो असे म्हणून त्याचे जवळील चाकु काढून फिर्यादीचे उजवे दंडावर मारून जखमी केले. असा जबाब दिल्यावरून पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या आदेशाने गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 148/2024 कलम 118 (1).351(2) (3), 296. बी.एन. एस. अनुसार रात्री उशिरा 23:53 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हिमायतनगरच्या बिट जमादार कोमल कांगणे या करीत आहेत. या घटनेत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करताना तीन नवीन फौजदारी कायद्याच्या अम्मलबवणीनुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हिमायतनगर मध्ये राजकीय मतभेद समोर येऊ लागले असून, यातून अश्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीच्या काळात हिमायतनगर शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्यात रिक्त पदे भरून पोलीस बळ वाढवावे. पोलीस निरीक्षक पदी कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकाऱ्याची येथे नेमणूक करून पुन्हा अश्या घटना होणार नाहीत यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य नागरीकातून व्यक्त केले जात आहे.
चाकू हल्ला घटनेच्या निषेधार्थ बाजार पेठ दुपारपर्यंत बंद; तात्काळ अटक करण्याची मागणी
हिमायतनगर येथील माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी बाजार पेठ दुपार पर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. श्री परमेश्वर मंदिर परिसरात सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिक जमून परमेश्वर मंदिर ते पोलीस ठाणे या दरम्यान मोर्चा काढून हल्लेखोरास तात्काळ अटक करावी, हद्दपार करण्यात यावे आणि 307 कलम लावण्यात यावी. तसेच माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड राठोड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर या मागणीचे सामूहिक निवेदन पोलिसांना देण्यात आले.


